' ‘दहशतीचा एन्काउंटर’ करून भाजपने जिंकली मनं आणि गुजरातमध्ये सुरु झालं ‘BJP पर्व’ – InMarathi

‘दहशतीचा एन्काउंटर’ करून भाजपने जिंकली मनं आणि गुजरातमध्ये सुरु झालं ‘BJP पर्व’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकतंच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या त्यात भाजपच्या वाट्याला ४ राज्यात सत्ता मिळाली. २०१४ सालापासून भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे, आता गुजरात राज्याच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, कधीकाळी काँग्रेसच्या राजवटी खाली असलेले हे राज्य मोदी सत्तेत आल्यापासून भाजपकडे आहे, या राज्यात भाजपने कसे आपले पाय रोवले हे आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

राजकारण, निवडणूक हे बहुतांश भारतीयांच्या आवडीच्या विषयांपैकी एक आहेत. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्याची निवडणूक असलेला भारत हा जगातील एकमेव देश असेल.

कोणत्या निवडणुकांमध्ये कोण जिंकेल? यावर गावातील चावडी पासून ते मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वच जण आपले राजकीय तर्क लावत असतात. काही राज्यांमध्ये निवडणुका या चुरशीच्या होत असतात, तर काही राज्यांमध्ये अगदीच एकतर्फी.

गुजरात हे एक असं राज्य आहे जिथे २१ व्या शतकाच्या सुरुवातीपासून भाजपचं पारडंच जड असलेलं दिसत आहे. “गुजरात म्हणजे भाजप” हे समीकरण लोकांना आता मान्य झालं आहे.

 

bjp inmarathi

 

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा हा बदल घडवून आणण्यात सिंहाचा वाटा आहे हे सर्वश्रुत आहे, पण नेमकी ती कोणती घटना होती? ज्यानंतर गुजराती लोकांनी भाजपला स्पष्ट बहुमत देण्याचं ठरवलं? तंत्रशुद्ध मार्केटिंग सोबत भाजपने असं “काय करून दाखवलं ?” ज्यामुळे गुजराती लोक भाजपवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतात? हे जाणून घेऊयात.

‘अब्दुल लतीफ’ हे नाव आपण कदाचित ऐकलं नसेल. हे त्या अंडरवर्ल्ड डॉनचं नाव आहे, ज्याची १९९५ मध्ये गुजरात मध्ये प्रचंड दहशत होती. खंडणी गोळा करणे, दरोडा टाकणे, अपहरण करणे हे गुजरात मध्ये त्या काळात सर्रास चालायचं.

‘अब्दुल लतीफ’ हा गुजरातमधील दाऊद इब्राहिमचा चेहरा होता असं मानलं जायचं. गुजरात मधील तो काळ हा ‘लतीफ राज’ म्हणून ओळखला जातो, ज्याच्या आयुष्यावर मध्यंतरी आलेला शाहरुख खानचा ‘रईस’ हा चित्रपट आधारित होता.

२००१ साली पोलीस एन्काऊंटर मध्ये ‘अब्दुल लतीफ’चा खात्मा होणं आणि भाजप सत्तेत येणं या दोन्ही घटना गुजरातच्या इतिहासात कायम महत्वाच्या मानल्या जातील. कारण, कोणतीही निवडणूक असली, तरीही भाजप अजूनही लोकांना काँग्रेसच्या काळातील ‘लतीफ राज’ची आठवण करून देत असते आणि गुजरात मध्ये भाजप असण्याची गरज लोकांना पटवून देत असते.

राजकोट सारख्या प्रगत शहरात सुद्धा लोकांना आज जरी तो काळ आठवला तरी अंगावर काटा येतो असं सांगितलं जातं.

 

abdul latif inmarathi

 

४५ वर्ष ‘अब्दुल लतीफ’ या गुंडाने गुजरात मधील हिंदू-मुस्लिम यांच्यातील मतभेदाला खतपाणी दिलं आणि समाजात तेढ निर्माण केली आणि त्या धगधगत्या परिस्थितीत आपली गुन्हेगारी त्याने सुरू ठेवली.

तो काळ असा होता, जेव्हा गुजरात मधील सर्व प्रमुख शहरांवर या गुन्हेगारांचा वचक असायचा. अहमदाबाद हे ‘अब्दुल लतीफ’कडे होतं, तर कच्छ हे ईभला सेठ, सूरत हे ‘मामा सुरती’ या गुंडाकडे होतं.

१९९३ च्या मुंबई बॉम्बलास्टमध्ये आरडीएक्सचा पुरवठा करण्यात सुद्धा अब्दुल लतीफचा सहभाग असल्याचं चौकशी दरम्यान समोर आलं होतं.

१९९२ मध्ये काँग्रेस आणि जनता दल यांच्या पाठींब्यामुळे अब्दुल लतीफ हा खुलेआम एके-५६ ही बंदूक घेऊन अहमदाबाद मध्ये फिरायचा. अब्दुल लतीफनेच त्या काळात गाजलेलं ‘राधिका जिमखाना क्लब खून प्रकरण’ घडवून आणलं होतं, ज्यामध्ये ३५ लोकांचा जीव घेतला होता, ज्यामध्ये १२ पोलिसांचा समावेश होता.

अब्दुल लतीफचा काँग्रेसच्या सत्ताकाळात इतका दबदबा होता, की तत्कालीन मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांना भेटण्यासाठी त्याला कोणत्याही अपॉइंटमेंटची गरज नसायची. ड्रग्जची तस्करी, सोन्याचा काळाबाजार या सर्व घटनांमुळे गुजरातची भूमी अधोगतीकडे खेचल्या जात होती.

“प्रत्येक अंधकारानंतर एक उजेड येत असतो” या उक्तीप्रमाणे नरेंद्र मोदी, शंकरसिंग वाघेला आणि केशुभाई पटेल हे तीन लोक आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी एकत्र आले आणि त्यांनी परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला.

स्लीपर घालणारे, सायकल, स्कुटरवर फिरणाऱ्या या भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये हा विश्वास केला की, “तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही ‘लतीफ राज’ मधून तुमची सुटका करू.”

 

abdul latif inmarathi1

 

भाजपच्या या घोषणेनंतर अब्दुल लतीफच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. जनमत हे काँग्रेसकडून भाजपकडे जाण्यास सुरुवात झाली होती.

सप्टेंबर ९६ मध्ये एक वेळ अशी होती, जेव्हा गुजरात मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. येणाऱ्या काळात बदलणाऱ्या परिस्थितीची ही नांदी होती.

१९९८ च्या विधासभा निवडणुकीत केशुभाई पटेल यांच्या नेतृत्वात भाजपला ‘अब्दुल लतीफ’ बद्दल केलेल्या घोषणेमुळे स्पष्ट बहुमत मिळालं. शंकर सिंग वाघेला हे त्यावेळी गुजरातचे गृहमंत्री होते.

आपण जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी अब्दुल लतीफचं एन्काऊंटर घडवून आणलं आणि गुजरातमधील दहशतवादाचा अंत झाला.

डीएसपी जडेजा यांनी हे एन्काऊंटर केलं होतं. आपल्या अहवालात त्यांनी असं सांगितलं होतं, की “आमच्या तावडीत असलेल्या अब्दुल लतीफने पळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आम्हाला त्याचा एन्काऊंटर करावा लागला.” जनतेला सर्व सत्य आधीच माहीत होतं. भाजपने या घटनेने केवळ निडणूकच नाही तर गुजराती लोकांची मनं जिंकली होती.

 

bjp inmarathi1

 

गुजरात मधील बहुतांश हिंदू संघटना राज्यात शांतता हवी असेल, तर भाजप शिवाय पर्याय नाहीये हे लोकांना पटवून देण्यात यशस्वी झाल्या होत्या.

२००१ पासून मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना लोकांनी निवडून दिलं आणि त्यानंतर जे घडलं आपल्या सर्वांना माहीतच आहे. २०१४ पर्यंत गुजरातमध्ये तीन सरकारचं नेतृत्व केल्यानंतर त्यांनी देशाचं नेतृत्व करावं अशी लोकांची इच्छा त्यांनी सार्थ ठरवली.

गुजरातमधील लढा हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हता, तर तो दहशतवाद विरुद्ध शांतता, प्रगती असा होता. अब्दुल लतीफ सारख्या गुंडाच्या एन्काऊंटरमुळे जर त्या राज्यात आणि पर्यायाने देशात इतका मोठा बदल घडून येत असेल, तर प्रत्येक शांतता प्रेमी व्यक्ती या घटनेचं स्वागतच करेल हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?