शाहरुख असं काही वागला, की या गायकाने त्याच्यासाठी आवाज देणं कायमचं थांबवलं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बॉलीवूडमध्ये काही ठराविक जोड्या कायम हिट असतात. फक्त अभिनेते- अभिनेत्रींच्या नाही, तर अभिनेते- गायक, दिग्दर्शक – अभिनेते अशाही जोड्या हिट आहेत. जसं की, करण जोहर आणि शाहरुख खान.
शाहरुख खान म्हटलं, की अजून एक नाव त्याच्याशी जोडलेलं लक्षात येतं आणि ते म्हणजे अभिजीत भट्टाचार्य. अभिजीत हा बॉलीवूडमधला सुप्रसिद्ध गायक म्हणून ओळखला जातो आणि त्याची अजून एक विशेष ओळख म्हणजे तो ‘शाहरुखचा आवाज’ म्हणून ओळखला जातो.
शाहरुखच्या सुवर्णकाळात त्याची बहुतांश गाणी ही अभिजीतने गायली आहेत, यामुळे शाहरुख पडद्यावर दिसणार म्हणजे अभिजीतचाच आवाज असणार हे एक समीकरण झालं होतं.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी अशा अनेक चित्रपटांसाठी शाहरुख आणि अभिजीतने एकत्र काम केलं आहे, पण २००९ साली आलेल्या ‘बिल्लू बार्बर’ या चित्रपटानंतर अभिजीतने शाहरुखसाठी गाणं थांबवलं.
—
- शाहरुख बंदूक घेऊन पार्टीत शिरला तेव्हा खुद्द बाळासाहेब त्याला सामोरे गेले…!
- गौरीशी लग्न करण्यासाठी जेव्हा शाहरुख नाव आणि ‘धर्म’ ही बदलायला तयार झाला होता!!
—
‘बिल्लू बार्बर’ या चित्रपटासाठी अभिजीतने ‘खुदाया खैर’ हे गाणं गायलं होतं. यानंतर मात्र त्याने शाहरुखसाठी न गाण्याचा निर्णय घेतला.
२०१८ साली झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात त्याने यामागे काय कारण होतं, याचा खुलासा केला.
‘मी माझ्या आवाजाने बॉलीवूडमध्ये अनेक सुपरस्टार्स घडवले आहेत. मी जोपर्यंत शाहरुखसाठी गात होतो, तोपर्यंत तो रॉकस्टार होता. मी त्याच्यासाठी गाणं थांबवलं आणि आता तो ‘लुंगी डांन्सपर्यंत’ आला आहे.’ असं तो म्हणाला.
‘खरंतर शाहरुखसाठी मी गाणं थांबवलं यामागे खूप छोटंसं कारण आहे. शाहरुखच्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटात सगळ्यांना दाखवण्यात आलं होतं. अगदी स्पॉटबॉयपासून सगळे या चित्रपटात दिसले, पण गायक मात्र दिसले नाहीत. हीच गोष्ट शाहरुखच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाबाबतही घडली.
या चित्रपटात सगळे कलाकार दिसले, त्या गाण्याला माझाच आवाज होता, पण मी मात्र या गाण्यात कुठेच दिसलो नाही. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आणि माझ्या स्वाभिमानाला यामुळे धक्का लागला. माझं नाव यामध्ये कुठेच नाही याचं मला वाईट वाटलं.’ असंही तो म्हणाला.
अभिजीतने याआधी बऱ्याच वेळा असे सांगितले आहे, की ‘मी स्वतःला बॉलीवूडचा नव्हे, तर भारतीय संगीताचा भाग मानतो’
आता बॉलीवूडला या लढाया काही नवीन नाहीत, कलाकारांचं एकत्र येणं, त्यांच्यात भांडणं होणं, रुसवे – फुगवे अशा नाट्यमय घडामोडी इथे कायमच घडत असतात.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.