एकीकडे स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवणारे बॉलिवूडकर, अशा अंधश्रद्धा पाळतात…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
शेक्सपिअर ‘नावात काय आहे?’ असं म्हणून गेला असला, तरी नाव ही प्रत्येकाचीच महत्त्वाची ओळख असते, हे तर आपण सगळेच जाणतो. आपलं नाव एखाद्याने चुकीचं उच्चारलं, किंवा चुकीच्या पद्धतीने लिहिलं, तर ते आपल्याला आवडत नाही.
‘लगे रहो मुन्नाभाई’ या सिनेमामधील एक प्रसंग तुम्हाला आठवत असेल. ज्योतिषाचं ऐकून, खुराना साहेब आपलं नाव बदलून घेतात. khurana च्या नावामध्ये kkhurana असं नाव लावतात. हे असं प्रत्यक्षात सुद्धा बऱ्याचदा घडतं.
सामान्य व्यक्तीच नव्हे, तर सेलिब्रिटी मंडळी सुद्धा या अशा अंधश्रद्धा पाळतात. नावांमध्ये बदल करून नशिबाचे फासे काहीसे वेगळे पडावेत अशी अपेक्षा करतात.
अशाच काही बॉलिवूडकरांबद्दल जाणून घ्यायची इच्छा तुम्हालाही झाली असेल ना… चला तर मग जाणून घेऊयात अशाच काही मंडळींची ‘नवी नावं’…
१. आयुष्मान खुराना
चित्रपटातले खुराना साहेब तर ठीक, या खुराना साहेबांनी सुद्धा आपलं नाव बदलून घेतलंय. आयुष्मान याने आपल्या नावाचं बदललेलं स्पेलिंग Ayushman(n) Khur(r)ana असं केलं आहे.
२. तुषार कपूर
गोलमाल पलीकडे फार ओळख मिळवू न शकलेला तुषार कपूर, तुम्हाला माहित असेलच! नशिबाची साथ मिळावी म्हणून त्याने जे जे शक्य होतं ते सगळं केलंय असं म्हणायला हरकत नाही.
यासाठीच तुषारने नावातही बदल केलाय. तुषार या नावात त्याने एका S सोबत आणखी एका S ची भर घातलीय.
३. राणी मुखर्जी
राणीची कारकीर्द वाईट सुरु होती असं म्हणता येणार नाही. असं असूनही, तिने नाव बदलायचा निर्णय घेतला. इतरांप्रमाणे नावात अक्षर वाढवणं सुद्धा तिला पटलं नसावं. त्यामुळेच तिने मुखर्जी या आडनावातून H काढून टाकला आणि mukerji असं नवं आडनाव लावायला सुरुवात केली.
४. अजय देवगण
नावातून अक्षर काढून टाकणाऱ्यांच्या यादीतील हे आणखी एक नाव! सिंघम असणाऱ्या अजयने देवगण हे आडनाव बदलायचं ठरवलं. नाही, थेट आडनाव नव्हे हो; देवगण या स्पेलिंगमधला A काढून टाकला अजय भाऊंनी! नावात A ची फार गर्दी झाली असं त्यांना वाटलं असावं.
५. विवेक ओबेरॉय
एक गुणी अभिनेता असूनही विवेक ओबेरॉय फार यशस्वी होऊ शकला नाही. आता त्याच्या अपयशाला ‘इतरही’ काही कारणं होती असं म्हटलं जातं. पण नशिबाची साथ मिळाली नाही हेदेखील खरं… म्हणूनच Vivek साहेबांनी Vive(i)k असं नामकरण सुद्धा करून पाहिलं. तरीही नशिबाचे फासे काही पालटले नाहीत.
६. सोनम कपूर
आता तुम्ही म्हणाल अनिल कपूरच्या कन्येने कधी नाव बदललंय? पण हीच तर गंमत आहे ना मंडळी… सोनम कपूर आधी तिचं नाव Sonam A. Kapur असं लावत असे, हे फारसं कुणाला ठाऊकही नसतं.
७. राजकुमार राव
आयुष्मानप्रमाणेच हादेखील एक गुणी कलाकार आहे. नव्या दमाच्या दमदार कलाकारांमध्ये याचं नाव अगदी आवर्जून घेतलं जातं. याच राजकुमाराने, आपल्या नावात एक M नव्याने घेतला.
एवढंच नाही बरं का मंडळी, राजकुमार राव यादव असं या कलाकाराचं पूर्ण नाव आहे. आपल्या नावातून यादव काढून टाकत त्याने नवं नाव धारण केलंय.
८. जावेद जाफरी
नावाचं स्पेलिंग बदलण्यामध्ये या माणसाचा हात कुणीच धरू शकत नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. जावेद या नावात आणि जाफरी या आडनावात त्याने प्रत्येकी एक A वाढवला. हे एक अक्षर वाढवताना, आडनावातून त्याने एक F काढून टाकला आणि E या अक्षराची जागा सुद्धा बदलली…
Javed Jaffrey असं नाव असलेला हा अभिनेता एवढा सगळा बदल केल्यावर Jaaved Jaafery झाला.
९. हृतिक रोशन
राकेश रोशन यांचा मुलगा हृतिक ‘कहो ना प्यार हैं’ मधून लोकांना माहित झाला आणि अल्पावधीतच त्याचा मोठा चाहतावर्ग सुद्धा निर्माण झाला. तरीही नशिबाची अजून साथ मिळावी असं त्याला वाटलं असावं. मग त्यानेही नावात बदल करायचा निर्णय घेतला.
Rithik या नावात एक H वाढवून त्याने, Hrithik असं नाव केलं. बॉलिवूडमधल्या या चॉकलेट बॉयला नशिबाची अजून साथ का हवी होती, हे तोच जाणे बापडा…
१०. सुनील शेट्टी
विविध भूमिका करणारा अभिनेता सुनील शेट्टी, त्यानेसुद्धा आपल्या नावात बदल केला. Sunil हे स्पेलिंग या अभिनेत्याला नकोसं वाटलं असावं, म्हणूनच ते बदलून त्यांनी आपल्या नावामध्ये E हे अक्षर वाढवून घेतलंय.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.