' बाथरूममधील या ८ छोट्या चुकांचे परिणाम मात्र फारच गंभीर ठरू शकतात… – InMarathi

बाथरूममधील या ८ छोट्या चुकांचे परिणाम मात्र फारच गंभीर ठरू शकतात…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

स्वच्छता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कोरोना महामारीने तर हे चांगलेच लक्षात आणून दिले आहे. आपण जिथे राहतो, वावरतो ती जागा मग ते ऑफिस असो किंवा आपले घर ते स्वच्छ आणि नीटनेटके असायलाच हवे नाही का?

आपण जितके जास्त स्वच्छ राहू, घर स्वच्छ ठेऊ तितकेच जास्त सुरक्षित राहू, निरोगी राहू, यात कसलीच शंका नाही. पण फक्त आपले घर स्वच्छ ठेवणे पुरेसे आहे का? आपण स्वच्छ होण्यासाठी जिथे जातो ती जागाही तितकीच स्वच्छ आणि निर्जंतुक असायला हवी.

आपण रोज उठल्याबरोबर ब्रश करतो, शौचास जातो, अंघोळ करतो ही सगळी कामे आपण बाथरूममध्ये करत असतो, मग जिथे बसून आपण आपल्या शरीराची स्वच्छता करतो ती जागाही आपल्या घराईतकीच किंबहुना त्याहून जास्त स्वच्छ आणि निर्जंतुक असायला हवी.

 

bathroom cleaning inmarathi

 

बाथरूम म्हणजे कोणत्याही जंतू आणि जीवाणूंना प्रजनन केंद्र बनण्याचे मुख्य ठिकाण आहे, ज्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो.

आपल्या सगळ्यांना काही अशा सवयी असतील ज्यामुळे आपल्याही नकळत आपण रोगांना,जंतूंना आमंत्रण देत असू. त्या चुका कोण कोणत्या असू शकतात याचा जरा विचार करूया.

१. फ्लशिंग दरम्यान टॉयलेट सीट बंद न करणे

टॉयलेटमध्ये फ्लश करतो तेंव्हा पाण्याचे थेंब ६ फूट उंचीपर्यंत उडू शकतात. विशेष म्हणजे हे जिवाणू बराच काळ हवेत राहतात, त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. फ्लश करताना टॉयलेट सीट नेहमी बंद ठेवावी.

 

commode inmarathi

 

२. टूथब्रश बाथरूममध्ये ठेवणे

बऱ्याच लोकांना आपला टूथब्रश बाथरूममध्ये ठेवण्याची सवय असते. यामुळे टूथब्रश ओला रहातो. ओल्या टूथब्रशवर संसर्गजन्य जिवाणू वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण होते. त्यामुळे आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणून टूथब्रश कधीही बाथरूममध्ये ठेवू नये.

 

toothbrush in bathroom inmarathi

 

३. बाथरूममध्ये टॉवेल ठेवणे

बाथरूममध्ये ठेवलेल्या ओल्या टॉवेलवर जिवाणू चिकटू शकतात. असा टॉवेल पायांचे रोग, नखांमधे जंतू पसरवण्याचे काम करतो. त्यामुळे टॉवेल नेहमी मोकळ्या हवेत वाळत ठेवावा.

 

towel in bathroom inmarathi

४. एक्झॉस्ट फॅन बंद ठेवणे

पंखा चालू ठेवल्यामुळे बाथरूममध्ये असलेले जंतू, किटाणू बाहेर पडायला मदत होते. पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पंखा चालू करण्याची सवय नसते किंवा आपण विसरून जातो. हा पंखा नेहमी चालू ठेवावा.

 

exhaust fan inmarathi

 

५. बाथरूममध्ये मोबाईल वापरणे

खूप जणांना फोन बाथरूममध्ये ठेवण्याची सवय असते. अर्थातच बाथरूम मधील जिवाणू फोनवर चिकटून बसतात ज्यामुळे संक्रमण वाढते. जेवताना आपण तोच मोबाईल हातात घेऊन बसतो, त्यामुळे जंतू आपल्या पोटात जाऊन विकार वाढतात.

 

mobile inmarathi1

 

६. शॉवर हेड स्वच्छ न ठेवणे

शॉवर हेडमधील ओली छिद्रे जीवाणूंना वाढण्याची संधी देतात. अंघोळ करताना हेच जिवाणू आपल्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे शॉवर चालू करून गरम पाणी एखादा मिनिट तसच ठेवावे, शिवाय दोन आठवड्यातून एकदा शॉवर हेड स्वच्छ करावा, म्हणजे संक्रमणाचा धोका कमी होईल.

 

shower head inmarathi

७.बाथरूममध्ये केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरणे

आपण बाथरूम स्वच्छ करताना केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरत असल्याने त्यातील विषारी द्रव्य वातावरणात पसरतात. दमा, सर्दीसारखे विकार निर्माण होऊ शकतात.

 

toilet cleaners inmarathi

 

इतकेच नव्हे तर गरोदर स्त्रियांच्या होणाऱ्या बाळांना जन्मजात दोष सुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी केमिकल विरहित प्रॉडक्ट्सच वापर करावा.

८. बाथरूम चप्पालचा वापर न करणे

बाथरूममध्ये जाताना नेहमी आवर्जून चप्पलचा वापर करण्यात यावा. यामुळे आपल्या पायाच्या तळव्यांमुळे होणारे संक्रमण होत नाही. तसेच पायांना भेगा पडणे, नखांमध्ये होणारे संक्रमण आपण टाळू शकतो.

 

toilet chappals inmarathi

 

या सगळ्या आपल्याकडून नकळत होणाऱ्या चुका आपण टाळल्या तर आपण नेहमी निरोगी राहू शकू. मग मंडळी यापूढे लक्ष ठेवाल ना? आणि तुमच्या ओळखीच्या इतरांना सुद्धा या गोष्टींविषयी नक्की सांगा. त्यासाठी आमचा लेख शेअर करायला विसरू नका.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?