नासाने कलामांना दिलेली ही मानवंदना पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणजे समस्त भारतीयांची छाती अभिमानाने फुलवणारे व्यक्तिमत्त्व! आपल्या संशोधन कार्यातून देशाची सेवा व्हावी या भावनेने नासामधील ऐशोआरामी नोकरीची ऑफर बाजूला सारून भारताच्या इस्रोमधील नोकरीची निवड त्यांनी केली होती.
पुढे आपल्या बुद्धीच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी इस्रोला आणि भारतीय विज्ञान आणि संशोधन क्षेत्राला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते.
त्यांचे हे कर्तुत्व पाहून जगभरातील भले भले वैज्ञानिक, मोठ मोठ्या संस्था त्यांच्या पुढे नतमस्तक झाल्या होत्या. त्यात नासा ही जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था देखील मागे नव्हती आणि आज त्याच नासाने या महान शास्त्रज्ञाचा उचित सन्मान करून पुन्हा एकदा त्यांना मानवंदना दिली आहे.
नासाने भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ.ए.पी.जे,अब्दुल कलाम यांचा एक वेगळ्या प्रकारे सन्मान केला आहे. एका नव्याने शोधण्यात आलेल्या बॅक्टेरियाला डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे.
हा बॅक्टेरिया पृथ्वीवर आढळला नसून आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रांवर आढळला आहे हे विशेष! जेट प्रोपल्शन लेबोरेटरी मधील संशोधकांनी अंतरग्रही यात्रेवर काम करत असताना आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राच्या फिल्टरमध्ये या नवीन बॅक्टेरीयाला शोधले.
नासाने भारताचे माजी राष्ट्रपती कलाम यांच्या सन्मानार्थ सोलीबैकिलस कलामी या नावाने या बॅक्टेरियाचे नामकरण केले.
डॉ.ए.पी.जे,अब्दुल कलाम यांच्या करियरची सुरुवात १९६३ साली नासामध्येच झाली होती, पुढे त्यांनीच केरळ मध्ये भारताचे पहिले रॉकेट प्रक्षेपण केंद्र स्थापित केले.
जेपीएल मध्ये जैव प्राद्योगिक आणि ग्रह सुरक्षा समूहाचे वरिष्ठ अनुसंधान वैज्ञानिक, डॉ.कस्तुरी व्यंकटस्वर्ण यांनी म्हटले की,
बॅक्टेरीयाचे नाव सोलीबॅकिलस आहे. हे फिल्टर आंतरराष्ट्रीय स्पेस केंद्राच्या प्रणालीचा एक भाग आहे, हा बॅक्टेरीया एका अशा फिल्टर मध्ये मिळाला आहे, जो आईएसएसं मध्ये ४० महिन्यांपर्यंत राहिला होता.
नासाने दिलेली ही मानवंदना कलाम साहेबांच्या आजवरच्या कारकिर्दीवर खोवलेला मानाचा तुराच म्हणावी लागेल!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.