' ‘पुरुषप्रधान’ संस्कृतीत, स्त्रीत्व लपवून, तिने चक्क २ वर्ष ‘पोपची’ गादी सांभाळली… – InMarathi

‘पुरुषप्रधान’ संस्कृतीत, स्त्रीत्व लपवून, तिने चक्क २ वर्ष ‘पोपची’ गादी सांभाळली…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आपलं इप्सित साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करत असते. ध्येय साध्य करण्यासाठी जी व्यक्ती तहान, भूक विसरून काम करते त्या व्यक्तीला यश हे मिळते हे माहीत आहे.

इतिहासात ‘पोप जोन’ नावाची एक अशी महिला होऊन गेली आहे जिने ध्येय गाठण्यासाठी आपली स्त्री असण्याची ओळख विसरून काम केलं होतं आणि ती ‘व्हेक्टिकन सिटी’च्या पोप पदी विराजमान झाली होती.

एखाद्या सिनेमाला साजेशी वाटणारी ही कथा ९ व्या शतकात प्रत्यक्षात घडली आहे. कॅथलिक चर्च च्या आजवरच्या इतिहासात ही एकमेव महिला या पदावर विराजमान होऊ शकली आहे.

‘पुरुषप्रधान’ असलेल्या या पोप संस्कृतीत ‘जोन’ने कसं साध्य केलं? त्या काळात तिला कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं? जाणून घेऊयात.

 

pope joan inmarathi

 

जोनचा जन्म इसवी सन ८२५ मध्ये जर्मनी येथे झाला होता. ८५५ ते ८५८ या तीन वर्षांच्या काळात पोप पद भूषवणाऱ्या जोनची माहिती १३ व्या शतकात जाहीर करण्यात आली होती. जर्मनी मध्ये जन्मलेली जोन ही इटलीला कशी आली? हा प्रश्न त्यावेळी सुद्धा उपस्थित करण्यात आला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

  1.  

 

जोन ही जर्मनीत रहात असताना बेनेडिक्टिन नावाच्या एका इंग्रजी संन्यासी व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. जोन ही बेनेडिक्टिन सोबत अथेन्सला आली होती. अभ्यासात प्रचंड हुशार आणि धार्मिक घटनांची अभ्यासक असलेली जोन ही जोन ही त्यानंतर अथेन्सहून रोमला आली.

बेनेडिक्टिन यांच्याकडे जोनने धार्मिक शिक्षण घेऊन पोप होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, त्यावेळी धार्मिक शिक्षण घेण्याची परवानगी ही फक्त पुरुषांनाच होती. पण, जोनला हे मान्य नव्हतं. तिने हे शिक्षण घेण्यासाठी पुरुषांचा वेष धारण करण्याचं ठरवलं.

आजवर होऊन गेलेल्या २६० पोप पैकी जोन ही एकमेव महिला होती जिने धार्मिक शिक्षण केवळ २ वर्षात पूर्ण केलं आणि पोप पदापर्यंत ती पोहोचू शकली.

सत्य समोर कसं आलं?

इसवी सन ८५८ साली पोपच्या पदावरून पायउतार झाल्यानंतर जोन या ‘माजी पोप’ म्हणून एका पोप समारंभात सामील झाल्या होत्या. त्यावेळी जोन यांना अचानक चक्कर आली होती. जोन यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आलं होतं.

pope joan 2 inmarathi

 

तपासणीनंतर डॉक्टरांनी हे सांगितलं होतं, की “जोन या गरोदर आहेत.” तिथे जमलेल्या लोकांसाठी हा खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता. पोप जोन या त्या दिवसानंतर कोणत्याच सामाजिक कार्यक्रमात सामील झाल्या नाहीत आणि त्यांनी रोम सोडण्याचा निर्णय घेतला.

काही वर्षांनी जोन यांच्या बाबतीत दोन शक्यता वर्तवण्यात आल्या की, “एक तर बाळाला जन्म देतांना जोन यांचा मृत्यू झाला होता” किंवा “काही पोप समर्थकांना जोन यांचं खोटं बोलून या पदावर बसणं अजिबात पटलं नव्हतं आणि त्यांनी जोनचा खून केला.” सत्य काय आहे हे कधीच समोर आलं नाही.

कॅथलिक इतिहासाने जोनला मान्यता देण्यासाठी ४०० वर्षांपेक्षा अधिक काळ द्यावा लागला होता. १४ व्या शतकात गिओवानी बोकाकीयो या लेखकाने सर्वप्रथम जोन आणि त्यांच्या आयुष्यातील घडामोडींवर आपल्या पुस्तकातून प्रकाश टाकला होता.

जोनचं काढलेलं चलचित्र, टॅरो कार्ड यांचा इटलीच्या ‘सियाना कॅथड्राईल’ समावेश करण्यात आला होता. पोप जोन यांची माहिती त्यानंतर बऱ्याच पुस्तकांमधून समोर आली. पण, पुरुषप्रधान संस्कृतीचं समर्थन करणाऱ्या एका मोठ्या वर्गाने पोप जोनला नेहमीच एक ‘काल्पनिक पात्र’ म्हणून त्या माहितीला हिणवण्यात धन्यता मानली.

 

pope joan 3 inmarathi

 

पोप जोन यांच्या रोम मधील अस्तित्वाचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याने कित्येक लोकांनी उपलब्ध माहितीवर संशय देखील व्यक्त केला होता. इसवी सन ८५५ ते ८५७ हा पोप कार्यकाळ ‘लिओ ४’आणि ‘बेनेडिक्ट ३’ यांचा होता असं सुद्धा काही इतिहासकारांचं मत आहे.

“पोप या पदावर पुरुषच विराजमान होऊ शकतो” या विचाराचं समर्थन करणारे लोक पोप जोनच्या माहितीचा नेहमीच विरोध करत असतात. कॅथलिक चर्चच्या विरोधात असलेल्या एका समाजाने ‘पोप जोन’ हे पात्र उभं केलंय हे सुद्धा काही अभ्यासकांचं मत आहे.

पोप जोन हे पात्र सत्य होतं की काल्पनिक हे इतिहासलाच माहीत आहे. पण, उपलब्ध माहितीवरून जोन यांचं जीवन हे बोधप्रद आहे हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?