' धोनीची “शेवटच्या बॉल” मागची strategy : यशाचा फूल-प्रूफ formula ! – InMarathi

धोनीची “शेवटच्या बॉल” मागची strategy : यशाचा फूल-प्रूफ formula !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

क्रिकेटमधून (किंवा सर्वच स्पोर्ट्समधून!) अनेक धडे शिकता येतात. त्यातल्या त्यात “लास्ट-बॉल-विन” सारख्या मॅचेसतर “ह्यातून आम्ही काय शिकलो” च्या चर्चांसाठी निव्वळ अप्रतिम विषय ठरतात. क्रिकेट विश्वात अश्याच एका विजयाची – 2016 मधील T-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारत-बांग्लादेश सामन्याची चर्चा अखंड सुरू रहाणार आहे. शेवटच्या बॉलवर भारतीय संघाने हा सामना जिंकला. विशेष म्हणजे भारताला हरण्यासाठी केवळ १ रन पुरेसा होता. तरीसुद्धा आपण हा सामना जिंकला.

ह्या विजयामागे पांड्याचा अप्रतिम बॉल आणि धोनीची चपळ खेळी आहे. पण हे फक्त दिसण्यापुरतं. ह्या विजयामागे ३ महत्वाचे factors आहेत. ते कोणते हे समजण्याआधी नेमकं काय घडलं ते बघू.

 

१) पांड्याचा बराच दुरून जाणारा बॉल. हा “वाईड” ठरता ठरता राहिला.

 

dhoni last ball marathipizza 01

२) इतका दुरून जाणारा बॉल bat ला स्पर्श नं करता, सरळ सरळ धोनीच्या पंज्यात स्थिरावतो आणि तो स्थिरावायच्या आतच धोनी स्टंपकडे धाऊ लागतो.

 

dhoni last ball marathipizza 02

३) धोनी अत्यंत वेगात स्टंपच्या एकदम जवळ येऊन ठेपतो – तो स्टंपिंग करणार हे नक्की आहे – पण तो बॉल फेकत नाही.

 

dhoni last ball marathipizza 03

४) क्षणार्धात धोनीने स्टंपिंग पार पाडलेली असते.

 

dhoni last ball marathipizza 04

आणि…भारतीय संघ विजयी…!

प्रश्न हा आहे की “अचानक” असा बॉल वाईड लेन्थ पडतो काय, धोनी तो झटकन झेलून स्टंपिंग करतो काय आणि आपण एकदाचे जिंकतो काय…हे असं कसं घडून येतं? आपोआप घडू शकतं का?

उत्तर आहे – नाही.

ह्यामागे शेवटच्या बॉल आधी झालेलं अप्रतिम planning आहे.

त्या डीलीव्हरी आधी धोनीने उजव्या हाताचा ग्लव काढून ठेवला होता. जणूकाही त्याला बॉल झेलून स्टंपिंग करायचंच आहे हे नक्की ठाऊक होतं.

पण हे ठाऊक असायला, बॉल खूप वाईड असणार हे माहित असायला हवं.

हे माहित असायला पांड्याचं आणि धोनीचं हे बोलून झालेलं असायला हवं – आणि – पांड्या असा बॉल हमखास टाकू शकतो – हे ही नक्की असायला हवं !

ह्या सर्व गोष्टी जुळून येण्यासाठी ३ basic needs आहेत.

१ – चिकाटी

पहिल्या ३ बॉल वर १ – ४ – ४ असे रन ठोकून झाल्यावरसुद्धा धोनी – पांड्या आणि संपूर्ण टीमने चिकाटी सोडली नाही. हातपाय गाळून बसले नाहीत. अडचणीतून मार्ग कसा काढायचा एवढा काय तो विचार आणि प्रयत्न सुरु होता.

२ – स्थिरचित्त

केवळ चिकाटी असून भागत नाही. माणूस anxious झाला, उत्तेजित झाला तर मन – मेंदू – शरीर ह्यांचा ताळमेळ गमावून बसतो. कठीण परिस्थितीत शांत रहाणं अत्यंत आवश्यक आहे. योग्य व्यूहरचना ठरवण्यासाठी धोनी आणि पांड्या दोघांनी डोकं थंड ठेवलं – म्हणून योग्य plan ठरवता आला.

३ – मेहनत…!

Match च्या ऐन प्रसंगी ठरवलेली व्यूहरचना अमलात आणायला अंगी skill असायला हवं ना…! पांड्या “तसाच” बॉल फेकेल, वयाच्या पस्तीशीत असलेला धोनी चपळतेने बॉल झेलून स्टंपिंग करेल…हे “घडायला” केवळ इच्छाशक्ती पुरेशी नाही, अंगी तेवढं बळ आणि हातोटी हवी. ती एकदम येत नाही. ह्यासाठी सततची, अखंड मेहनत हवी असते.

सामन्याच्या शेवटच्या बॉलवर जेव्हा निर्णय येऊन ठेपतो तेव्हा tv समोर बसलेलो आपण कितीतरी रोमांचित होतो. मग बॉलर केवढा तणावग्रस्त असेल? कीपर धोनी – जो ह्या planning चा दुसरा आधार होता, तो किती tensed असेल?

ह्या परिस्थिती केवळ आणि केवळ चिकाटी, स्थिरचित्त आणि आधी केलेली मेहनतच मदतीला धाऊन येते.

म्हणून…मित्रमैत्रिणीनो –

पांड्या-धोनीचं फक्त कौतुक करू नका, त्यांच्याकडून ही यशाची त्रिसूत्री शिका आणि – जीवनात यशस्वी व्हा…!

Best of Luck !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?