' घटस्फोटानंतर प्रथमच बिल आणि मेलिंडा एकत्र दिसले, ते मुलीच्या लग्नात.. – InMarathi

घटस्फोटानंतर प्रथमच बिल आणि मेलिंडा एकत्र दिसले, ते मुलीच्या लग्नात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘बिल गेट्स.. ‘ हे नाव माहित नाही अशी व्यक्ती या जगात शोधून सापडायची नाही. जगातल्या सर्वात श्रीमंत बिझनेस टायकून पैकी एक असलेले बिल गेट्स आपल्याला परिचित आहेत. ते सर्वाधिक प्रसिद्ध आहेत, त्यांच्या सर्वात मोठ्या कंपनीमुळे जिचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट!

आज मायक्रोसॉफ्टचे नाव दुनियेच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे ते केवळ या कॉम्प्युटर युगाचा जनक मानल्या जाणाऱ्या बिल गेट्स यांच्यामुळेच!

 

bill gates inmarathi

 

२०२१ च्या मे महिन्यात बिल गेट्स हे नाव एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलं होतं, या कारणाचा कधी कोणी फारसा विचारदेखील केला नसेल. हे कारण म्हणजे ‘बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी घेतलेला घटस्फोटाचा निर्णय!’

२७ वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ‘जोडपं म्हणून आम्ही यापुढचं आयुष्य एकत्र घालवू शकत नाही’ असं त्यांनी एका निवेदनात म्हटलं होतं.

 

bill melinda inmarathi

 

७०च्या दशकात बिल गेट्स यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीची स्थापना केली, पुढे ८०च्या दशकात मेलिंडा मायक्रोसॉफ्टसाठी काम करत असताना त्यांची ओळख झाली आणि ते एका बिझनेस डिनरला एकत्र गेले.

या डिनरनंतर त्यांच्यातील नातं फुलू लागलं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. १९९४ मध्ये बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी हवाईत लग्न केलं.

बिल गेट्स- मेलिंडा गेट्स यांना ३ अपत्यं आहेत. त्यातल्या एका मुलीचं नाव जेनिफर गेट्स. तिचा जन्म १९९६ चा. तिचं शिक्षण स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये झालं आणि २०१३ मध्ये तिने त्याच युनिव्हर्सिटी मधून पदवी मिळवली!

याच युनिव्हर्सिटीमध्ये तिची एका तरुणाशी ओळख झाली आणि १६ ऑक्टोबर २०२१ रोजी ते लग्नबंधनात अडकले.

 

jennifer gates wedding inmarathi

 

तिच्या लग्नासाठी घटस्फोटांनंतर पहिल्यांदाच बिल गेट्स आणि मेलिंडा एकत्र दिसले. हे लग्न न्यूयॉर्कमध्ये ३०० लोकांच्या उपस्थितीत पार पडले. या लग्नासाठी खास ‘कोल्ड प्ले’ बँड ठेवण्यात आला होता. शुक्रवारी मुस्लिम पद्धतीने लग्नाचा एक छोटेखानी समारंभ देखील पार पडला.

या लग्नानिमित्त बिल गेट्स आणि मेलिंडा एकत्र आले. लग्नासाठी जेनिफरने पांढरा सुंदर गाऊन घातला होता. तिच्या आईबाबांसोबत तिने हा सोहळा पूर्णपणे एन्जॉय केला असं फोटोजमधून दिसतंय.

 

jennifer gates wedding inmarathi 1

 

तिच्या जोडीदाराचे नाव Nayel Nassar आहे आणि तो एक इजिप्शियन मुस्लिम असून त्याने सुद्धा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधून अर्थशास्त्र  विषयात पदवी घेतली. दरम्यान त्याची ओळख जेनिफर गेट्सशी झाली आणि तिथून त्यांची मैत्री झाली आणि आता ते एकमेकांसोबत त्यांच उर्वरित आयुष्य घालवणार आहेत!

Nassar हा वयाच्या दहाव्या वर्षापासून हॉर्स रायडिंग च प्रशिक्षण घेत आहे, त्यामुळे तो उत्तम हॉर्स रायडर आहेच शिवाय त्याचा स्वतःचा बिजनेस देखील आहे! ऑलिंपिकमध्ये देखील त्याने त्याच्या देशाने प्रतिनिधीत्व केले आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?