' गेल्या पाच वर्षात भाजपने निवडणुका आणि जाहिरातबाजीवर किती रुपये खर्च केलेत? – InMarathi

गेल्या पाच वर्षात भाजपने निवडणुका आणि जाहिरातबाजीवर किती रुपये खर्च केलेत?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपल्या लोकशाही देशात दर पाच वर्षांनी निवडणूका होतात, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी पुढे संसदेत जातात. मतदानासाठी एक दिवस निश्चित केला जातो. त्या दिवशी देशातील प्रत्येकाने मतदान केले पाहिजे कारण तो आपला अधिकार आहे. मात्र गेल्या काही वर्षात मतदान करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे.

 

single voter inmarathi

खरं तर या ‘एका’ दिवसावर लोकप्रतिनिधींचे भविष्य अवलंबून असते, कारण या एका महत्वाच्या दिवसासाठी ते अनेक वर्ष मेहनत घेत असतात. निवडून येण्यासाठी राजकीय पक्ष अनेक शकला लढवतात, कार्यकर्ते जोमाने काम करतात. निवडणूक आल्यावर रखडलेली काम काही दिवसात पूर्ण होतात. मात्र या सगळ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे पैसा

आज लोकप्रतिनिधींच्या मागे लाखो कार्यकर्ते असतील तरी सुद्धा त्या लोकप्रतिनिधीला पैसे खर्च करावेच लागतात. सभा घेणे, प्रचारासाठी फिरणे, वेगवगेळ्या कार्यक्रमाचे आयोजन करणे यासारख्या गोष्टींसाठी पैसे लागतातच.

 

election campaign rally inmarathi

 

फॅक्ट चेकच्या अहवालानुसार तब्बल ६५० करोडो रुपये १८ राजकीय पक्षांनी खर्च केले आहेत. ज्यात ७ राष्ट्रीय पक्ष आहेत आणि ११ प्रादेशिक पक्ष आहे. इलेक्शन कमिटीला सादर केलेल्या माहितीवरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यातील ३४० करोड रुपये केवळ पक्षाच्या प्रसिद्धीसाठी केले आहेत.

निवडणूक प्रचार खर्च :

गेल्या ५ वर्षात भाजपने जाहिरातबाजी आणि पक्षाच्या प्रसिद्धीवर तब्बल २००० करोड रुपये खर्च केले आहेत. तर १५% निवडणुकांमध्ये होणाऱ्या प्रवासावर, ११.२५% खर्च  उमेदवारांवर आणि ७.२% खर्च हा निवडणुकांमध्ये काढलेल्या रॅली, प्रचार सभा यांवर केला गेला आहे.

आज भाजप देशातील प्रबळ पक्ष म्हणून ओळखला जात असला तरी एकेकाळचा प्रबळ पक्ष म्हणून ओळखला गेलेला काँग्रेस खर्चमागे कमी नाही. ५६० कोटी रुपये हे केवळ निवडणुकांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी खर्च केलेत तर २६० कोटी रुपये हे निवडणुकींच्या दरम्यान होणाऱ्या प्रवासावर केले गेले आहेत.

 

Congress-BJP-inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

राष्ट्रीय पक्ष अर्थातच यात पुढे असणार कारण राष्ट्रीय पक्षांचा पसारा ही मोठा असतो. मात्र प्रादेशिक पक्ष देखील यात मागे नाहीत, आज भारतात अनेक छोटे मोठे प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहे त्यांची मर्यादा जरी कमी असली तरी निवडणुकांमध्ये ते राष्ट्रीय पक्षांना देखील टक्कर देऊ शकतात.

प्रादेशिक पक्षांमध्ये समाजवादी पार्टीने एकूणच खर्चाच्या ३.९५% इतका खर्च केला आहे तर डीएमके (३.००%) वायएस आर काँग्रेस (२.१७%), बीएसपी (२.०४%), नुकत्याच बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणूक होऊन गेल्या त्यात राष्ट्रीय पक्षांपेक्षा प्रादेशिक पक्षाने जास्त पैसे खर्च केले आहेत.

टीएमसी ने बंगालच्या निवडणुकांमध्ये तब्ब्ल १५० करोड रुपये खर्च केलेत, तर डीएमके पक्षाने तामिनाडूच्या निवडणुकांमध्ये ११४ कोटी रुपये खर्च केलेत.

 

tmc inmarathi

 

प्रसिद्धीवर केलेला खर्च :

आजकाल मोदींचे फोटो पेट्रोल पंपापासून ते अगदी लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर आल्याने लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी आहे. मोदी फक्त जाहिरातबाजीवर खर्च करतात अशी टीका त्यांच्यावर होते मात्र अगदीच चुकीचे नाही.

भाजप बरोबरीने इतर पक्ष देखील आता जाहिरातबाजी आणि प्रसिद्धीवर खर्च करायला लागले आहेत. काँग्रेसदेखील ११८ कोटी रुपये प्रसिद्धीसाठी वापरले आहेत.  ४ करोड रुपये केवळ सोशल मीडियावर खर्च केले आहेत.

 

BJP social media inmarathi

२०१९- २० मध्ये ज्या प्रादेशिक पक्षांनी प्रशासकीय, सामान्य आणि प्रसिद्धीवर केलेल्या खर्चाचा अहवाल सादर केला ज्यात आघाडीवर होते शिवसेना, आम आदमी पार्टी, डीएमके, एआयएमआयएम, आरजेडी, जेडीएस आदींचा समावेश आहे.

आपल्या देशात जसे सण समारंभ एकामागून एक येत असतात ताशा निवडणूका देखील एका मागून एक येत असतात. आता गोवा विधानसभेच्या निवडणूक तोंडावर आहेत. २०२४ अजून लांब असले तरी प्रत्येक पक्ष यासाठी तयारी करत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?