मुंबई अंडरवर्ल्ड खऱ्या अर्थाने दाखवणारा ‘सत्या’ एका वेटरवर बेतलेला होता!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
‘माणूस वाईट नसतो त्याच्यावर येणाऱ्या परिस्थितीमुळे तो वाईट बनतो’, असा घासून गुळगूळीत केलेला डायलॉग आपण अनेक सिनेमात ऐकला असेल. असं म्हणतात माणसाचं व्यक्तिमत्व तो ज्या भागात राहिला आहे तिकडच्या वातावरणाचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडत असतो.
मशाल नावाचा सिनेमा आपण पहिला असेल तर आपल्याला लक्षात येईल, अनिल कपूर ज्या वस्तीत राहत असतो ती वस्ती प्रामुख्याने अवैध धंद्यांसाठी प्रसिद्ध होती त्यामुळे अनिल कपूरचे व्यक्तिमत्व देखील गुंडगिरी प्रवृत्तीचे होते.
अरबी समुद्राला लागून असलेल्या उडपी नामक शहरा ज्या शहराला धार्मिक अंग आहे, खाद्यपदार्थांची वैविध्यता आहे, अशा या शांत शहरातून एक युवक मुंबईत येतो आणि कुख्यात गँगस्टर बनतो नेमका कोण आहे तो तरुण चला तर मग जाणून घेऊयात…
–
- शहीद जवानांच्या शवपेटीतून हा कुख्यात गँगस्टर ड्रग्स पाठवायचा!
- या टॉप ऍक्शन हिरोचे वडील होते चक्क गुप्तहेर आणि आई कुख्यात स्मगलर!
–
ब्रिटिशांनी वसवलेल्या या मुंबई शहराला खूप सारे रंग आहेत. दशक बदलत गेली तसे या शहराचे रंगरूप बदलत गेले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेकजण कामाच्या निमित्तानें शहराकडे वळले, कुळ कायद्यामुळे देशोधडीला गेलेले असे अनेकजण नोकरीच्या शोधात मुंबई, तेव्हाचे कलकत्ता, मद्रास दिल्ली या ठिकाणी जाऊन स्थायिक झाले.
दिल्ली जरी राजधानी असली तर आर्थिक राजधानी म्हणून मुंबईच उदयास आली, एकीकडे मिल कामगार, दुसरीकडे हिरे व्यापारी, बॉलीवूडचा झगमगाट, या सर्व गोष्टी उदयास येत होत्या. मुंबईत पैसे येऊ लागला होता, शेअर मार्केटमध्ये पैसे लावण्यासाठी देशभरातून लोक येत होते. जशी प्रगती होते तशी अधोगतीची कळा सुद्धा लागू लागते.
मुंबईतल्या या कॉस्मोपॉलिटन जागत आणखीन एक जग निर्माण होत होते ते म्हणजे अंडरवर्ल्ड, अनेक बॉलीवूडच्या सिनेमातून आपण दाऊद पासून ते अगदी वरदराजन पर्यंत सगळ्या डॉनच्या कहाण्या बघितल्या असतील. असाच एक उडपीमधला सदानंद शेट्टी नावाचा तरुण कामानिमित्त मुंबईत आला. कामाच्या शोधात काही दिवस गेले अखेर त्याला एका चेंबूरच्या हॉटेलात वेटरची नोकरी मिळाली.
नोकरी मध्ये तो रुळू लागला होता, उडपी सारख्या शांत शहरातून येऊन तो मुंबईच्या गर्दीत कधी मिसळला हे त्याचे त्यालाच कळले नाही. सुरळीत चालणाऱ्या त्याच्या आयुष्यात एक ट्विस्ट आला.
एके दिवशी हफ्तावसुलीसाठी त्या एरियातल्या शिवसेनेचा विष्णू डोगळे चव्हाण नावाचा शिवसैनिक आला. जास्तीचा हफ्ता देण्यास मालकाने नकार दिल्यांनतर विष्णूने त्याला मारहाण करायला सुरवात केली. सदानंद हा सगळं प्रकार बघत होता, केवळ बघ्याच्या भूमिका न घेता तो देखील या वादात उतरला.
सदानंदला एक लोखंडी रॉड सापडला त्या रॉडने विष्णूला मारायला सुरवात केली. त्याचे घाव इतके जोरात होते की विष्णू तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि मृत्युमुखी पडला. काही मिनिटांच्या या प्रसांगातुन सदानंदची दशहत तयार झाली.
सदानंदने केलेल्या कृत्याचा बदला घेण्यासाठी तीन लोकांनी त्याच्यावर हल्ला केला, यात सदानंद जबर जखमी झाला. मारणाऱ्याना वाटले सदानंद कदाचित मेला असावा म्हणून त्यांनी तिथून पळ काढला. पण सदानंदच्या नशिबात मृत्यू इतक्या लवकर नव्हता. त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.
हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर सदानंदने बदल घेतला आपल्यावर हल्ला करणाऱ्या त्या तिघांचा सदानंदने खात्मा केला. सदानंदच नाव तेव्हाच्या वरदराजन नामक गँगस्टर पर्यंत पोचलं. वरदराजन देखील असाच एक गँगस्टर, बूटपॉलिश करता करता तो ही गुन्हेगारी कडे वळाला होता.
वरदराजनने त्याला आपल्या कंपूत सामील केले. वरदराजनची दहशत जशी संपू लागली तेवहा त्याने आपला गाशा गुंडाळला आणि आपल्या गावाला निघून गेला मात्र आपल्या गुन्हेगारीचा वारसा चालवणायचा हक्क जाताना सदानंदला देऊन गेला.
–
- गुन्हेगारी विश्व ढवळून काढणाऱ्या विकास दुबेची खरी काळीकुट्ट बाजू!
- २० मिनिटांत स्क्रिप्ट लिहून १५ मिनिटांत होकार आला अन् तयार झाला सुपरहिट ‘वास्तव’!
–
सदानंद साधू शेट्टी म्हणून ओळखला जाऊ लागला, १९८५ पर्यंत त्याने गुन्हेगारी क्षेत्रात धुमाकूळ घातला. साधू आणि त्याच्या टोळीने अनेक गुन्हे केले. बडा राजन, छोटा शकील, छोटा राजन यासारख्या मंडळींसोबत त्याचा संबंध आला.
मुंबई ब्लास्टनंतर साधूचे दाऊदसोबतचे कनेक्शन तुटले आणि त्याने थेट आपले गाव गाठले. गावात परतल्यावर देखील तो शांत बसला नाही. एका लग्नसमारंभात गोळीबार केला पोलिसांनी त्याला अखेर पकडले आणि तुरंगात टाकले, पाच वर्ष तो तुरुंगात राहिला आणि त्यानंतर तो बाहेर आला.
२००२ साली त्याने पुन्हा एकदा मुंबई गाठली, तुरुंगातून जरी सुटला असला तरी पोलीस त्याच्या पाळतीवर होतेच, पोलिसांच्या चकमकीत अखेर त्याचा मृत्यू झाला.
रामूचा सत्या, महेश मांजरेकर यांचा वास्तव हे दोन्ही सिनेमी साधू शेट्टीच्या आयुष्यवर बेतलेले आहेत. गुन्हेगारीच जग त्यातलं वास्तव बॉलीवूडच्या काहीच दिग्दर्शकानं पडद्यावर आणता आलं.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.