' राग आल्यावर त्रास करुन घेण्यापेक्षा या २० टिप्स वापरुन राग शांत करा! – InMarathi

राग आल्यावर त्रास करुन घेण्यापेक्षा या २० टिप्स वापरुन राग शांत करा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

कधीच न चिडलेली व्यक्ती सापडणं केवळ कठीणचं नाही तर अशक्य बाब आहे.

 

anger inmarathi

 

राग ही एक सामान्य भावना आहे. कोणालाही त्याच्या मनाविरुद्ध काही झालं किंवा दुखावणारे शब्द जर कोणी वापरले तर राग येणं स्वभाविकच आहे.

पण जर आक्रमकता, उद्रेक किंवा शारीरिक हिंसा झाली तर राग त्रासदायक बनू शकतो. रागामुळे मनुष्याच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात.

 

headache inmarathi

 

कायमची डोकेदुखी, ऍसिडिटी, मानसिक संतुलन बिघडणे, मेंदुवर ताण येणे, विस्मृती ह्यांसारखे गंभीर परिणाम रागामुळे होतात.

इतकंच नाही तर रागामुळे जवळची नाती तुटतात. माणसं कायमची दुरावतात. ह्यामुळे एकाकीपणा, नैराश्य येते. म्हणजेच रागाचे वाईट परिणाम आपले जीवन झाकोळून टाकतात.

दुस-याला दुःख होऊ नये, समोरचा कायमचा दुरावु नये ह्यासाठी क्रोध नियंत्रण महत्त्वपूर्ण आहे.

राग वाढण्यापूर्वी आपण रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट धोरणांचा अवलंब नक्कीच राग आटोक्यात आणण्यास मदत करेल.
राग ही एक सामान्य भावना आहे जी प्रत्येक वेळी वेळोवेळी अनुभवत असते.

 

angree inmarathi

 

आपला राग आक्रमकता किंवा उद्रेकांकडे वळत असल्याचे आपल्याला आढळल्यास आपल्याला रागाशी सामना करण्यासाठी निरोगी मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे.

मग हा राग नियंत्रित करण्याचे काही उपाय बघूयात

 

१) आकडे मोजा

हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. उलटी गिनती हा शब्द तुम्ही रागाबाबत ऐकला असेल.

 

anger amir khan inmarathi

 

१० आकडे वरुन खाली किंवा उलटे मोजा. जर राग अधिकच आला असे तर १०० पासून उल्टे आकडे मोजण्यास सुरूवात करा.

ज्या वेळेस तुम्हाला मोजायला लागे त्या वेळी तुमची हृदय गती कमी होईल आणि तुमचा राग कमी होईल.

 

२) दिर्घ श्वास घ्या

तुम्ही रागावलात की तुमची श्वासोच्छ्वास जलद होतो, तसेच श्वसनाची गती कमी-जास्त होते.

 

pranayam inmarathi

 

दीर्घ श्वसन हा रागावर नियंत्रण ठेवण्याचा महत्त्वाचा उपाय आहे.

 

३) निसर्गाच्या सान्निध्यात फेरफटका मारा

चालण्याचा व्यायाम आपल्याला शांत करण्यास आणि राग कमी करण्यास मदत करू शकतो. त्यासाठी फिरायला जा.

 

walking inmarathi

 

घर अथवा ऑफिस, तुम्ही जिथे कुठे असालं, तिथून काही काळ मोकळ्या हवेत फेरफटका मारा. यावेळी चालण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही दुचाकीही चालवु शकता, मात्र यावेळी रागावर नियंत्रण नसेल तर गाडी चालविण्याचा पर्याय निवडु नका.

अवयव मोकळे करणारे काहीही आपल्या मनासाठी आणि शरीरासाठी चांगले आहे.

 

४) स्नायुंना आराम द्या

स्नायू विश्रांती म्हणजेच आपल्याला आपल्या शरीरातील विविध स्नायूंना ताण पडेल अशा हालचाली कराव्यात आणि हळूहळू ताण कमी करावा.

जेव्हा स्नायू ताणत असता आणि सोडता, तेव्हा हळूहळू, लक्षपूर्वक श्वासोच्छ्वास करा.

 

anger fitness inmarathi

 

यामुळे मेंदुवर आणि परिणामी संपुर्ण शरिरावर रागामुळे आलेला ताण कमी होईल आणि मुडही फ्रेश होईल.

५) मन्त्रोचार करा

एक शब्द किंवा वाक्य शोधा जे आपल्याला शांत होण्यास आणि रीफोकस करण्यात मदत करते.

आपण अस्वस्थ असता तेव्हा ते शब्द पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा सांगा. “थ्री इडीयटस्” मधला रांचो आठवतोय?

 

all is wel inmarathi

 

तो सारखा “आल इज वेल” म्हणतो (त्यात तसं गाणंही आहे)! हे राग नियंत्रणाचं उत्तम उदाहरण आहे.

६) शवासन

एका शांत खोलीत पहुडल्यावर आपले डोळे बंद करा आणि काल्पनिक दृश्यात स्वत: ला गुंतवा.

काल्पनिक दृश्यावरील तपशीलांवर लक्ष द्या: जसं; आपल्याला आवडत्या ठिकाणी आपण आहोत, समुद्रकिनारी फिरत आहोत, शांत निसर्गरम्य जागेत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत आहोत, मंद संगीत ऐकतोय इत्यादी!

 

shavasan inmarathi

 

हा उपाय राग शांत करण्यात आपली मदत करू शकते.

७) संगीत

एखादे उडत्या चालीचे किंवा आवडत्या गायकाचे किंवा शांत गाणे ऐकणे, एखादे वाद्य किंवा जुगलबंदी ऐकणे राग कमी करण्यास मदत करते.

 

९) बोलणे थांबवा
आपल्याला राग आलाय हे लक्षात आल्यावर त्वरित बोलणे थांबवा.

 

silence inmarathi

 

त्यामुळे रागात उच्चारले जाणारे, समोरच्याला अप्रिय वाटणारे शब्द आपोआप टाळता येतील.

 

१०) डायरी

दिवसभराच्या घटनाक्रमांची नोंद रात्री एका डायरीत करा. कोणत्या गोष्टींचा राग आला हे त्यावरून समजेल.

 

diary inmarathi

 

त्या गोष्टी शक्यतो टाळा परंतु तरी त्या घडल्या तरी डायरीमुळे लक्षात राहतात, रागाची तीव्रता कमी कमी होऊन काही काळाने राग येईनासा होतो.

 

११)  स्माईल प्लीज

राग आलेला असताना हसणं ही मोठी कला आहे, ती अवघड वाटत असली तरी या उपायाने निश्चितच सकारात्मक परिणाम होवु शकतो.

 

baman irani inmarathi

 

स्वतःला जरा वेळ द्या. इतरांपासून जरा लांब रहा. भावनांवर नियंत्रण ठेवा.

 

१२) मित्राशी बोला

आपणास राग येणा-या गोष्टींमध्ये अडकून राहू नका.

 

jane tu ya jane na inmarathi

 

आपल्याला नवीन दृष्टीकोन प्रदान करू शकणार्‍या विश्वासू, आवडत्या मित्राशी बोलून जे काही घडले त्यावर प्रक्रिया करण्यात स्वत: ला मदत करा. मित्र आपल्याला नक्कीच राग कमी करण्यात मदत करू शकतात.

 

१३) क्षमा मागायला शिका

समोरच्याची क्षमा मागितली की आपोआप राग निवळतो.

 

sorry inmarathi

 

सॉरी हा जादुई शब्द आहे ज्यामुळे आपण राग टाळू शकतो आणि रागामुळे होणारा अनर्थही टाळू शकतो.

 

४) टाइमर सेट करा

समोरच्याच्या वागण्यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी थोडा वेळ थांबा. त्यामुळे भावनांचा एकदम उद्रेक होत नाही. आपल्या भावना आपल्या ताब्यात राहतात आणि राग आपोआप निवळतो.

 

१६) एक पत्र लिहा

ज्या व्यक्तीमुळे आपल्याला राग आला तिला तिच्या चुका थेट ओरडून सांगण्यापेक्षा एखादं पत्र किंवा ईमेल करा.

 

letter inmarathi

 

बहुतेकदा, आपल्या भावना एखाद्या रूपात व्यक्त करणे आपल्यास गरजेचे असते, आपण बोलून व्यक्त करू शकत नाही अशा वेळी पत्रातून मन मोकळे करा.

 

१७) त्यांना क्षमा करा

ज्याने आपल्यावर अन्याय केला आहे त्याला क्षमा करण्याचे धैर्य असणे हे खूप मोठं कसब आहे.

क्षमा अशक्त लोकांची शक्ती आहे, बलवान लोकांचे आभूषण आहे. क्षमेमुळे काय होत नाही? (क्षमेमुळे सर्व काही होऊ शकते) असं अनेक संस्कृत श्लोकांमध्ये सांगितलं आहे.

forgive inmarathi

 

इतिहासातही क्षमा केल्यामुळे अनेक युद्धे टळली असा उल्लेख आढळतो.

 

१८) आपला राग व्यक्त करा

रागावून वाट्टेल ते निर्णय घेणं किंवा चुकीचं वागणं नव्हे तर आपल्याला राग आला आहे हे समोरच्यापर्यंत पोचण्यासाठी त्याच्याशी चर्चा करा, संवाद साधा.

 

anger managment inmarathi

 

त्याची चूक त्याला शांतपणे समजावा. जर राग व्यक्त केला नाही तर तो मनातच राहील आणि त्यामुळे मनावर ताण पडेल.

 

२०) सर्जनशील बना

आपला राग मूर्त गोष्टींमध्ये बदला. आपण नाराज असताना चित्रकला, बागकाम किंवा कविता लिहिण्याचा प्रयत्न करा.

 

gardning inmarathi

हे ही वाचा – या ६ गोष्टी केल्यात तरच लॉकडाऊन आणि कोविडच्या संकटावर करता येईल मात…!!

भावना सर्जनशील व्यक्तींसाठी अत्यंत शक्तिशाली असतात. आपला राग कमी करण्यासाठी चित्र काढणे, कविता करणे ह्यासारखे मार्ग अवलंबा.

या टिप्स मदत करत नसल्यास आपल्या डॉक्टरांशी बोलण्याचा विचार करा. एक मानसिक आरोग्य विशेषज्ञ किंवा थेरपिस्ट आपल्याला राग आणि इतर भावनिक मुद्द्यांना कारणीभूत ठरणार्या मूलभूत घटकांवर कार्य करण्यास मदत करू शकते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?