या कारणामुळे इस्राएलच्या शाळेत भारतीय सेनेच्या शौर्याचे धडे दिले जातात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आपण अशा अनेक युद्धांबद्दल ऐकलं आहे कि ज्यात भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला आहे व शर्थीचे प्रयत्न करून ते युद्ध जिंकलं आहे. असेच १०० वर्षांपूर्वी इस्राएल मध्ये एक युद्ध घडलं होत व त्यात भारतीयांनी सहभाग घेऊन ते जिंकले होते. तुम्हाला प्रश्न पडेल कि भारतीय सैनिकांनी इस्राएल मध्ये जाऊन कस युद्ध केलं? तर आपण इस्राएलमध्ये घडलेल्या त्या युद्धाबाबद्दल वाचूया.
इस्राएल १९४८ साली स्वतंत्र झाला त्यापूर्वी तो ब्रिटनकडे होता. १९१८ मध्ये पहिले विश्वयुद्ध चालू होते व युध्दामुळे संपूर्ण जगाचा चेहरा मोहराचा बदलून गेला होता. याच दरम्यान सप्टेंबर १९१८ च्या काळात इस्राएल मधील हैफा शहरात जर्मन- तुर्किश सैन्य तळ ठोकून बसले होते.
हैफा हे रेल्वेचे जाळे व बंदरामुळे अत्यंत उपयोगी ठिकाण होते व हे शहर ज्याच्याकडे असेल त्याला युद्ध जिंकण्यास फार मोठी मदत होणार होती. ब्रिटिश सैन्याला हे जर्मन – तुर्किश सैन्याला हाकलून लावून हैफा, नाझेरथ आणि दमशकस ही शहर ताब्यात घ्यायचे होती ज्यातील हैफा व नाझरेथ इस्राएल मध्ये असून दमशकस सीरिया मध्ये आहे.
या लढाईसाठी भारतातील मैसूर, जोधपूर व हैद्राबाद अशा तीन संस्थानांमधील सैनिकांना आणण्यात आले होते. ब्रिटिशांच्या लष्करातील घोडदळ विभागासोबत हे सैनिक युद्ध लढणार होते, त्यामुळे यांना इम्पीरियल सर्व्हिस कॅवलरी ब्रिगेड असे म्हंटले जात असे.
२३ सप्टेंबर १९१८ मध्ये हैफा मध्ये जर्मन आणि तुर्की सैनिक मशीन गन व अत्याधुनिक शस्त्रांसह तयार होते. व त्यांच्या समोर मैसूर, जोधपूर व हैद्राबाद मधील सैनिकांकडे कोणत्याही प्रकारचे अत्याधुनिक शस्त्र नव्हते. ते हातात भाले व तलवार घेऊन युद्ध लढण्यासाठी आले होते.
–
- भारतीय सैन्य झिंदाबाद! सर्जिकल स्ट्राईक दिनी, आणखी एक स्ट्राईक करून हुतात्म्याचा प्रतिशोध!
- इस्त्राइल सैन्यात अत्यंत महत्वाच्या पदावर कार्यमग्न, वाचा प्रेरणादायी भारतीय कन्यांबद्दल!
–
मशीन गन सारख्या अत्याधुनिक शस्त्रांसमोर घोड्यांवर बसून येणाऱ्या सैनिकांचा कसा निभाव लागेल. घोडा जोरात पाळतो परंतु बंदुकीच्या गोळीसमोर तो कसा टिकणार. पण या सगळ्या गोष्टी त्यादिवशी चुकीच्या ठरल्या. या घोडदळाने युद्धात जी कामगिरी केली त्याने सर्वांनाच अचंबित करून टाकले.
तुर्कांनी त्यांच्या मशीन गन या पर्वतांच्या खालच्या बाजूस तैनात केल्या होत्या, आणि तोफखाना हा चार वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. मैसूर रेजिमेंट मधील सैनिकांना पूर्वेकडून मशीन गन असणाऱ्या जागेवर हल्ला करण्यासाठी पाठवले. जोधपूर रेजिमेंट सैनिकांना उत्तरेकडून कारमेल पर्वत व हैफा शहरावर कब्जा करण्यासाठी पाठवण्यात आले व या दोन्ही गटांसाठी कव्हरिंग फायर करण्यात आले.
भारतीय सेनेतील कमांडर कर्नल ठाकूर दलपत सिंग युद्धाच्या सुरुवातीलाच मरण पावले. त्यांच्या मृत्यूनंतर बहादूर अमन सिंह जोधा पुढे आले व त्यांनी सैन्याची कमान हातात घेतली.
२३ सेप्टेंबरच्या दुपारपर्यंत मैसूर रेजिमेंट ला २ मशीन गन वर कब्जा मिळवण्यात यश मिळाले. व त्यांनी आपली जागा सुरक्षित करून हैफा मध्ये घुसण्यासाठी रस्ता मोकळा केला.
जोधपूर रेजिमेंट मधील सैनिकांवर मशिनगन चा हल्ला सुरु झाला व त्यांच्या समोर मोठी अडचण उभी राहिली. परंतु त्यांनी आपली लढाई सुरूच ठेवली व समोरील सैन्याला आश्चर्यचकित केले. या लढाईत मशीन गनच्या गोळ्या आणि घोडे अशी लढाई सुरु झाली.
हे पाहून ब्रिटिश जनरल एडमंड एलेनबी यांनी भारतीय सैनिकांना युद्धातून मागे फिरण्यास सांगितले परंतु सैनिकच ते कोणाचं ऐकणार नाहीत. युद्धातील हार समोर दिसत आहे परंतु युद्धातून मागे कसे फिरायचे हे त्यांना पटण्यासारखे नव्हते.
दिवसभर चालू असलेल्या या युद्धात भारतीय सैनिकांनी हैफा शहरावर असणाऱ्या ४०० वर्षांच्या आटोमान साम्राज्यापासून स्वतंत्र केले.
हैफा शहराचा ताबा घेत भारतीय सैनिकांनी १३५० जमर्न आणि तुर्की सैनिकांना बंदी बनवले, ज्यातील २ जर्मन अधिकारी व ३५ तुर्की अधिकारी होते. यासोबतच ११ मशीन गन ताब्यात घेण्यात आल्या. या युद्धात ८ भारतीय सैनिक मरण पावले व ३४ जखमी झाले. तसेच ६० घोडे मरण पावले व ८३ जखमी झाले.
हैफा मध्ये भारतीयांसाठी स्मशान बांधण्यात आले होते १९२० पर्यंत वापरात होते. या सैनिकांच्या बलिदानाची आठवण म्हणून भारतात १९२२ मध्ये ३ मूर्ती स्मारक बांधण्यात आले. हिस्टरी ऑफ द ग्रेट वॉर यात असे लिहिले आहे कि, ‘ हे घोडेस्वार ज्याप्रकारे लढले त्यापद्धतीने कोणीच पूर्ण विश्वयुद्धात लढले नाही, गोळयांमुळे घोडे जखमी होत होते पण तरीही ते मागे हटले नाहीत’.
–
- भारतीय सैन्य महागड्या गाड्या न वापरता ‘जिप्सी’च वापरतं! वाचा अभिमानास्पद कारण…
- भारतीय सैन्य काय चीज आहे याची पुसटशी कल्पना – लडाखमध्ये जे काही सैन्य करतंय त्यावरून!
–
हैफाच्या लढाईने तुर्कांच्या सैन्याचे मनोबल मोडले व त्यांच्यासमोर माघार घेणे हाच एक पर्याय राहिला. तुर्कांच्या या निर्णयामुळे जर्मनीनेही युध्दविरामावर स्वाक्षरी केली. या लढाईमुळे एक मोठा परिणाम असा घडला कि भारतीयांनी दाखवलेल्या शौर्यामुळे भारतीयांना युद्धात अधिकारी बनवण्यास सुरुवात झाली. जी ब्रिटिश सरकार यापूर्वी युद्धात भारतीय अधिकारी बनवत नसत पण ह्या युद्धाने त्यांना भाग पाडले.
प्रत्येक वर्षी २३ सप्टेंबरला इस्राएल मध्ये हैफा दिवस साजरा केला जातो व त्याच प्रकारे भारतीय सैन्य ही हा दिवस हैफा दिन म्हणून साजरा करतो. हैफा युद्धाचे नायक दलपत सिंग शेखावत यांना हिरो ऑफ हैफा या नावाने ओळखले जाते. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना मिलिटरी क्रॉस ने सन्मानित करण्यात आले आहे.
हैफा नगरपालिका ने भारतीय सैनिकांचे बलिदान अमर राहावे यासाठी २०१२ मध्ये त्यांच्या शौर्याच्या कथा आपल्या पुस्तकात घेण्याचा निर्णय घेतला.
भारतातील दिल्लीतील तीन मूर्ती चौकचे नाव तीन मूर्ती हैफा चौक या युद्धातील आठवणींसाठीच ठेवण्यात आले आहे. या तीन मूर्ती चौक भारतातील जोधपूर, हैद्राबाद, मैसूर या तीन राज्यातील सैनिकांना इस्राएलला पाठवण्यात आलेल्या युद्धावरूनच बनवण्यात आले आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.