' भारी फिगर हवीये? मग या धान्यांचा समावेश आहारात हवाच – InMarathi

भारी फिगर हवीये? मग या धान्यांचा समावेश आहारात हवाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

राहणीमानातील बदल, तणावयुक्त आयुष्य, आहारावर नसलेला ताबा, व्यायामाचा अभाव, हॉर्मोनल बदल अशा अनेक कारणांमुळे वजन वाढते आणि मग काही केल्या कमी होत नाही.

वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे आणि भरपूर व्यायाम हे समीकरण चालत नाही. योग्य व्यायामाबरोबरच समतोल आहार आणि पुरेशी शांत झोप देखील आवश्यक आहे.

 

stretching exercise inmarathi

 

उपाशी राहून वजन कमी होत नाही, तर योग्य आहार घेऊन वजन कमी करता येते असे सगळेच आहारतज्ज्ञ सांगतात. 

वजन कमी करण्यासाठी आहारात बदल केले तर त्याचा खूप फायदा होतो. काही धान्ये अशी असतात जी पोषणमूल्ये तर देतातच शिवाय वजन कमी करण्यात देखील हातभार लावतात.

१. नाचणी

 

nachani inmarathi

 

रागी किंवा नाचणी हे असे धान्य आहे जे पौष्टीक तर आहेच शिवाय ते ग्लूटेन-फ्री असल्यामुळे ह्याने वजन वाढत नाही. मधुमेह किंवा ऍनेमिया सारख्या आजारांमध्ये नाचणी खाणे खूप फायदेशीर आहे.

नाचणीमध्ये  कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते ज्याने आपली हाडे बळकट होतात आणि त्वचा देखील निरोगी राहण्यास मदत होते.

२. ओट्स

 

Oats Inmarathi

 

ओट्समध्ये बीटा-ग्लुकॉन असते म्हणूनच ओट्स खाल्ल्यावर बराच काळ भूक लागत नाही आणि अरबट चरबट खाण्याची इच्छा होत नाही. ह्यामुळे वजन कमी होण्यास आणि आहारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

ओट्समध्ये फायबरचे प्रमाण देखील भरपूर आहे ह्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

३. कुट्टू

 

kuttu inmarathi

 

बकव्हीट किंवा कुट्टू हे धान्य उत्तर प्रदेशात खातात. ह्या धान्यात फायबरचे प्रमाण लक्षणीय आहे त्यामुळे आपले भूकेवर नियंत्रण राहते.

कुट्टुपासून बनवलेले पदार्थ खाल्ले की बराच वेळ भूक लागत नाही. साहजिकच ह्यामुळे खाण्यावर नियंत्रण राहते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.

कुट्टूमधून आपल्याला पुरेशी ऊर्जा मिळते आणि थकवा येत नाही.

४. तपकिरी तांदूळ

 

brown rice inmarathi

 

तपकिरी तांदूळ म्हणजेच कोंडा न काढलेला तांदूळ होय. हातसडीच्या तांदळावरचा कोंडा न काढल्यामुळे त्यातील पोषणमूल्ये, व्हिटॅमिन्स आणि खनिजे शाबूत राहतात. म्हणूनच प्रक्रिया केलेल्या पांढऱ्या तांदळाऐवजी हातसडीचा तांदूळ आपण आहारात घेतला, तर आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो.

हातसडीच्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स पांढऱ्या तांदळापेक्षा कमी असल्याने हा तांदूळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. हातसडीच्या तांदळात फायबर व अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण देखील जास्त असते.

५. क्विनोआ

 

quinoa inmarathi

 

क्विनोआमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल आटोक्यात आणण्यासाठी हे धान्य फायदेशीर आहे. ह्यातून कमी कॅलरीज पोटात जातात.

क्विनोआमध्ये फायबर, लोह, प्रथिने, मॅग्नेशियम तसेच काही अमिनो ऍसिड्स देखील असतात त्यामुळे हे धान्य अत्यंत पौष्टीक आहे.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही वरील धान्यांचा तुमच्या आहारात समावेश केल्यास, योग्य व्यायाम केल्यास तुम्हाला वजनात नक्कीच फरक जाणवेल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?