' “आमिर, रस्ते नमाज पढण्यासाठी नाहीयेत” आमिर खान पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर! – InMarathi

“आमिर, रस्ते नमाज पढण्यासाठी नाहीयेत” आमिर खान पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

जाहिरातींवरून निर्माण होणारे वाद आपल्याला नवीन नाहीत, नुकतीच आलिया भटच्या मान्यवरच्या जाहिरातीवरून चांगलाच वादंग झाला होता, भारतीय संस्कृतीत आसलेलं ‘कन्यादान’चं ‘कन्यामान’ केल्यावर काय गहजब झाला ते आपण अनुभवलंच होतं.

 

kanya daan inmarathi

 

हाच हिंदूफोबिक अजेंडा तनिष्कच्या जाहिरातीदरम्यानसुद्धा लोकांनी अनुभवला होता. जाहिरातींमधून भारतीय संस्कृती कशी वाईट आहे, चुकीची आहे हे लोकांच्या मनावर बिंबवलं जातं, भारतीय सण हे कसे पर्यावरणासाठी घातक आहेत हे लोकांच्या मनावर ठासलं जातं!

याच मंदियाळीत आता बॉलिवूडच्या perfectionist आमीर खानची एक जाहिरात लोकांच्या नजरेत खूपायला लागली आहे. CEAT Tyres ची एक जाहिरात सध्या या कारणामुळे चांगलीच चर्चेत आहे.

या जाहिरातीमध्ये आमीर लहान मुलांना लक्ष्मी बॉम्ब, भुईचक्र, अनार असे अनेक फटाके सोसायटीच्या आवारात उडवायला सांगतो आहे कारण रस्ते हे फटाके उडवण्यासाठी नसून गाडी चालवण्यासाठी आहेत, असं या जाहिरातीमधून संदेश दिला जात आहे.

 

aamir khan ceat ad inmarathi

आमीरच्या या जाहिरातीमुळे सध्या तो चांगलाच ट्रोल होत आहे. आधीच घटस्फोटामुळे लोकं आमीरवर नाराज आहेत त्यात या अशा जाहिरातीमुळे तर तो पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे.

आमीरच्या या जाहिरातीमुळे लोकं त्याला हिंदू विरोधी म्हणून सोशल मीडियावर बॅन करू पाहतायत.

यावरून लोकांनी CEAT या कंपनीलासुद्धा चांगलंच फैलावर घेतलं, ऐन सणांच्या तोंडावर या कंपन्या असल्या बॉलीवूड स्टार्सना घेऊन जाहिराती करतात आणि त्यातून फक्त हे असं चुकीचंच दाखवलं जातं यावरून लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बऱ्याच लोकांनी यानंतर आमीरला “रस्ते नमाज पडण्यासाठी असतात का?” असाही सवाल केला आहे. पिके सिनेमातून आमीरने जसं काही मोजक्याच लोकांची पोलखोल केली तसंच सोयीस्करित्या त्याने याबाबतीतसुद्धा तसाच स्टँड घेतला आहे असंच लोकांचं म्हणणं आहे.

 

aamir khan 2 inmarathi

 

CEAT च्या या जाहिरातीमुळे लोकांनी आहेत ती टायर्स बदलून दुसऱ्या कंपनीची टायर्स वापरायची असा पवित्रा घेतला आहे, कंपनीच्या सर्वेसर्वा हर्ष गोएंका यांच्यावरसुद्धा लोकांनी चांगलंच तोंडसुख घेतलं आहे.

आधी या गोष्टी खूप कमी व्हायच्या आडून आडून व्हायच्या, पण आता तर खुलेआमपणे जाहिरात क्षेत्रात आणि मनोरंजन क्षेत्रात स्टँड घेऊन एका विशिष्ट धर्माबद्दल, त्याच्या रूढी परंपरा, सणांबद्दल उलट सुलट भाष्य केलं जातं!

जाहिरात क्षेत्रामध्ये क्रीएटिविटि हा खूप महत्वाचा भाग आहे पण याचा अर्थ तुम्ही लोकांच्या भावना दुखावल्याच पाहिजेत असं नाही. आमीरच्या या जाहिरातीतसुद्धा एका वेगळ्या प्रकारे मेसेज देऊन CEAT ला त्यांची जाहिरात करता आली असती.

 

 

दिवाळीच्या मुहूर्तावर मात्र लोकांच्या भावनांना टार्गेट करून हे असं भाष्य केलं तर लोकं नक्कीच भडकणार, फटाके उडवणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहेच आणि त्याचं कुणीच समर्थन करत नाही, पण सरसकट सणांविषयी अशी सतत टीका टिप्पणी करणंदेखील योग्य नाही हे माध्यमांनी लक्षात ठेवलं पाहिजे!

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?