' कट्टर फॅन्सना देखील उल्लू बनवणारी ‘बिग बॉस’ची ही ८ सिक्रेट्स… – InMarathi

कट्टर फॅन्सना देखील उल्लू बनवणारी ‘बिग बॉस’ची ही ८ सिक्रेट्स…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सध्या मनोरंजनविश्वस बिग बॉसमय झालंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अर्थात प्रेक्षकांमध्ये ‘बिग बॉस चाहते’ आणि ‘बिग बॉस पाहणारे म्हणजे रिकामटेकडे’ अशी टिका करणारे असे दोन गट पडत असले तरी हल्ली पहिल्या गटात अर्थात बिग बॉसच्या प्रेक्षकांची संख्या वाढत आहे हे मान्य करायलाच हवं.

हिंदी असो वा मराठी, एकंदरित सगळ्याच वाहिन्यांवरील मालिकांनी आपली सोडलेली पातळी, रटाळ विषय, प्रेक्षकांना मुर्ख ठरवून वाट्टेल ते दाखवण्याचा अट्टहास यांमुळे आता मालिकांकडे पाठ फिरवलेल्या प्रेक्षकांना, जसा बुडत्याला काडीचा आधार तसाच बिग बॉस चा पर्याय उरला आहे.

 

big boss inmarathi

 

मालिकांमध्ये वर्षानुवर्ष पाहिली जाणारी सासु-सुनेच्या भांडणापेक्षा वेगळे चेहरे, भांडणाचे नवे मुद्दे, थरारक टास्क असा ‘टाइमपास’ असणारा बिग बॉस शो बरा! असं म्हणणा-यांची सध्या पर्वणी आहे.

voot अॅपवर नुकतेच बिग बॉस ott चं पहिलं पर्व पार पडलं. दिव्या अग्रवालने या पहिल्या ott पर्वाची विजेता म्हणून ट्रॉफी हाती घेतली, आणि  दुसऱ्याच दिवशी मराठी बिग बॉस सिझन ३ चा श्रीगणेशा झाला. दोन आठवड्यात प्रेक्षक या सिझनमध्ये रुळेपर्यंतच आता २ ऑक्टोबरपासून कलर्स वाहिनीवर हिंदीतील बिग बॉस १५ चा नवा खेळ सुरु होतोय.

 

big boss marathi inmarathi

 

तर एकंदरच दोन्ही भाषेत रंगणा-या या शो बाबत सर्वांनाच उत्सुकता असते. यंदा घरात कोण येईल हे कोडं अखेरपर्यंत उलगडत नाही, मात्र केवळ हेच नव्हे तर शो बाबत इतरही अनेक गोष्टी प्रेक्षकांना कधीही कळत नाहीत.

बिग बॉस लाईव्हमुळे आता २४ तास घरात डोकावण्याची संधी मिळाली तरीही पडद्यामागील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कुणीही, कधीच सांगणार नाही. या गोष्टी केवळ शोच्या निर्मात्यांना आणि शो उभारण्यासाठी झटणाऱ्यांनाच ठाऊक असतात.

 

shuuu

 

खोटं वाटतंय? मग जाणून अशा ८ गोष्टी ज्याची उत्तरं तुम्हाला आजही नक्की ठाऊक नाहीत.

१. बिग बॉसचा आवाज कोणाचा?

हिंदीमध्ये तब्बल १४ तर मराठीत २ सिझन पहिल्यानंतरही बिग बॉसचा आवाज नक्की कोणाचा आहे, हे कट्टर बिग बॉस फॅन्सनाही ठाऊक नाही. याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत, यापुर्वी अनेक माध्यमांनी याबाबत बातम्या द्यायचाही प्रयत्न केला, मात्र त्याचं ठोस उत्तर कुणाकडेही नाही.

 

big boss

 

काहींच्या मते प्रत्येक सिझनमध्ये आवाज बदलतो, तर काहींच्या मते हा आवाज सारखाच असतो. अर्थात शोच्या निर्मात्यांकडून आजपर्यंत हा खुलासा कधीही करण्यात आलेला नाही.

२. स्पर्धकांचं मानधन

बिग बॉसच्या घरात १०० दिवस काढणं काही सोपं नाही. मात्र तरीही अनेक कलाकार जिगरीने हा खेळ खेळतात, अर्थात त्यांना त्याचा योग्य तो मोबदला मिळतो, मात्र कोणत्या कलाकाराला नेमका किती मोबदला मिळतो? प्रत्येकाला वेगळी रक्कम मिळत असल्याने हा मोबदला कोणत्या निकषांवर ठरवला जातो? सध्या घरात वावरणाऱ्या किंवा यापुर्वीचे सिझन्स गाजवलेल्या कलाकारांना किती रक्कम मिळाली हे कुणालाही नक्की ठाऊक नाही.

 

big boss contestant inmarathi

 

याबाबतही मिडीयाने अनेकदा बातम्या छापल्या, मात्र त्यातील नक्की तथ्य कुणालाही सांगता येणार नाही. काही सिझन्समध्ये तर घरात एकत्र राहणाऱ्या सदस्यांनाही एकमेकांना मिळणाऱ्या रक्कमेचा खरा आकडा ठाऊक नसतो.

बिग बॉसमधील युवा किर्तनकाराच्या नावामागचं गुपित माहित आहे का?

‘रिअॅलिटी शो’मागील रिअॅलिटी, जी अतिशय धक्कादायक आहे!

३. सदस्यांना भरावा लागणारा दंड

बिग बॉसच्या घरात येणं जितकं कठीण त्याहूनही घर सोडणं अवघड! प्रसिद्धी, पैसा यांच्या लालसेपायी कलाकार घरात आले तरी घर सोडण्याची परवानगी त्यांना नसते. यासाठी घरात येण्यापुर्वी कॉन्ट्रॅक्ट करण्यात येतं हे सर्वसामान्य प्रेक्षकांना ठाऊक असतं. मात्र या कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणते नियम, अटी असतात? आणि या अटी मोडल्या तर सदस्यांना किती दंड भरावा लागतो हे प्रेक्षकांना कधीही सांगितलं जात नाही.

 

crying

 

अर्थात तुम्हाला वाटेल हा कॉन्ट्रॅक्ट केवळ दिखावा असतो, तर तसं नाही. कारण हा कायदेशीर व्यवहार असल्याने त्यातील नियम मोडले तर सदस्यांना लाखो रुपये भरावे लागतात. यापुर्वीच्या काही सदस्यांना हा दंड भरावा लागला आहे. मात्र अशा सदस्यांची नावं, त्यांनी भरलेली रक्कम याबाबत कधीही वाच्यता केली जात नाही.

४. तसल्या सीन्सना कात्री

‘जसं दिसतं, तसं असतं’ असं छातीठोकपणे सांगणाऱ्या या शोमध्येही अनेक बाबी या नैसर्गिकरित्या घडत नसून घडवून आणल्या जातात. अनेक प्रसंग, भांडणाचे मुद्दे हे स्क्रीप्टेड अर्थात निर्मात्यांकडून तयार केले जातात, याची आपल्याला कल्पना असते, मात्र तरीही हे कोणते मुद्दे आहेत? हे तुम्हाला ठाऊक असतं का? अर्थातच नाही!

प्रेक्षकांना वाटतं की आपण बिग बॉसच्या १५० कॅमे-यांव्दारे सदस्यांवर लक्ष ठेवतो, मात्र प्रत्यक्षात तसं नसतं. सदस्यांमधील खाजगी गोष्टी, चर्चा, काही वेळा घडणारे इंटिमेट सीन्स या सगळ्याच गोष्टी निर्माते प्रेक्षकांपर्यंत पोहचू देत नाहीत.

 

big boss edited inmarathi

 

चोवीस तासांपैकी फक्त दिड तासांचा मसाला आपल्याला एडिट करून दाखवताना यामध्ये अनेकदा शिव्या, गॉसिप्स किंवा प्रेक्षकांच्या मते केला जाणारा थिल्लरपणा किंवा तसले सिन्स हे प्रेक्षकांना दाखवले जात नाहीत.

त्यामुळे बिग बॉसच्या घरातील संपुर्ण कन्टेन्ट किंवा सगळा ड्रामा प्रेक्षकांना कधीही पूर्ण कळत नाही.

 ५. घरातल्या कामांसाठी इतर कर्मचारी

प्रेक्षकांना वाटतं की घरातली सगळी कामं ही सदस्यांतर्फे केली जातात. काहीअंशी ही बाब खरी जरी असली तरी याबाबतची खरी माहिती प्रेक्षकांना कधीही सांगितली जात नाही.

 

home inmarathi

 

स्वयंपाक करणं, थोडीफार साफसफाई ही कामं घरातील सदस्यांतर्फे केली जात असली तरी उर्वरित अनेक कामांसाठी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. शिवाय ‘विकेंड का वार’ या दोन्ही दिवशी घरातील स्वच्छता, बागकाम या कामांसाठी बाहेरून कर्मचारी मागवले जातात. शिवाय शनिवार-रविवार या दोन्ही दिवसांसाठी सदस्यांकरिता चविष्ट जेवण बाहेरून मागवण्यात येते.

६. नो प्रमोशन

घरातील सदस्यांचे कपडे, मेकअप किंवा अन्य कोणत्याही सामानाचा वापर करताना प्रमोशन करण्याला सक्त मनाई आहे. यासाठी सदस्यांना त्यांच्या आवडत्या ब्रॅन्ड्सची नावं घेता येत नाहीत.

 

no to promotion

 

बिग बॉसचे प्रायोजक असलेल्या ब्रॅन्ड्सचीच नावं घरात घेण्याला परवानगी आहे.

७. धार्मिक सण, मुर्तीपुजा यांना बंदी

बिग बॉसच्या घरात सर्व धर्मिय सदस्य येतात, मात्र धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही सेलिब्रेशनला घरात मान्यता नाही. यावेळी घरात येताना धर्माचं प्रतिनिधित्व करणारी कोणतीही वस्तू, मुर्ती यांना घरात आणण्यास मनाई आहे.

 

celebration inmarathi

 

८. सलमान खान एपिसोड्स बघतो का?

हिंदी बिग बॉसचा होस्ट बॉलिवूडचा दबंग सलमान खान कधीही सगळे एपिसोड्स पूर्ण बघत नाही. विकेंड का वार साठी त्याला महत्वाचे मुद्दे दिले जातात तसेच त्या आठवड्यातील चर्चेत असणारे प्रसंग, लोकांच्या प्रतिक्रिया त्याला दाखवल्या जातात, त्याआधारे तो आपलं मत देतो. अर्थात याबाबतही ठोस माहिती निर्मात्यांकडून दिली जात नाही.

 

salman khan inmarathi

 

एकंदरितच बिग बॉसच्या घराबाबत अनेक मतमतांतरे आहेत, अॅपमुळे प्रेक्षक अहोरात्र हा खेळ पाहू शकतात, मात्र प्रत्यक्षात या खेळातील सगळेच नियम, अटी प्रेक्षकांना कधीच कळत नाहीत हेच सत्य!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?