ज्या देशासाठी जिनांनी जीवाचं रान केलं, आज त्याच पाकिस्तानात त्यांची विटंबना होत आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
मध्यंतरी न्यूझीलंड क्रिकेट टीमने त्यांचा पाकिस्तान दौरा रद्द केल्याने पाकिस्तानचे कित्येक सेलिब्रिटी सोशल मीडियावर बेंबीच्या देठापासून ओरडत होते की “पाकिस्तान हा सुरक्षित आहे”!
या मुद्द्यावरून सोशल मीडियावर लोकांनी त्यांची चांगलीच टर उडवली, पण नुकतीच घडलेली घटना पुन्हा पाकिस्तानच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे.
बलुचिस्तान प्रांतातल्या ग्वादर या शहरात दिमाखात उभा असलेला मुहम्मद अली जिना यांचा पुतळा बॉम्बच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्याची बातमी कालपासून इंटरनेटवर फिरतिये.
पाकिस्तानच्या वृत्तपत्रांच्या माहितीनुसार याच वर्षी तयार केलेल्या या पुतळ्याखाली स्फोटकं ठेवून तो पुतळा नष्ट करण्यात आला आहे. बलुच लिबरेशन फ्रंटने या हल्ल्याची जवाबदारी घेतली आहे.
बलुचिस्तानचे भूतपूर्व गृहमंत्री सरफराज बुगटी यांनी ट्विटरवरून या घटनेची निंदा केली आहे. त्याच्या ट्विटनुसार – “कायदे आजम जिना यांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे पाकिस्तानच्या आयडियोलॉजीवर घाला आहे. हा कट रचणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे.”
बलुचिस्तान इथल्या नागरिकांनी ही गोष्ट साजरी केली आणि जिना यांना आम्ही आमचे नेते मानत नाही असेही स्पष्ट केले.
–
- ती विनंती मान्य केली असती तर जगप्रसिद्ध विप्रो हा पाकिस्तानी उद्योग झाला असता!
- अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेणारी अमेरिका खरंच दूधखुळी आहे का? वाचा.
–
या सगळ्या प्रकरणार अजूनतरी कोणालाच अटक करण्यात आलेली नाही, पाकिस्तानच्या सर्वात मुख्य प्रांतापैकी बलुचिस्तान इथे झालेला हा हल्ला निंदनीयच आहे पण बलुच लिबरेशनने याची जवाबदारी घेऊनसुद्धा याविरोधात काहीच कारवाई झालेली नाही यावरून दिसून येतं की पाकिस्तानी सरकार नेमकं कोणाला पाठिंबा देतंय.
१९४७ मध्ये जेव्हा फाळणी झाली तेव्हापासून बलुचिस्तानमध्ये हे असं तणावपूर्वक वातावरण आपल्याला बघायला मिळालं आहे.
अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान या तिन्ही देशात बलुचिस्तानचा भूभाग पसरलेला असला तरी त्यापैकी सर्वात जास्त भूभाग हा पाकिस्तानात आहे आणि म्हणूनच त्यांच्यासाठी तो एक महत्वाचा प्रांत आहे!
एकंदरच या गोष्टीमुळे पाकिस्तानच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय, ज्या पाकिस्तानसाठी जिना यांनी जीवाचं रान केलं आज त्याच पाकिस्तानात त्यांची किंमत काय हे या घटनेवरून दिसून येतं!
एकीकडे पाकिस्तानी लोकं पाकिस्तान सुरक्षित आहे अशी आरोळी ठोकतायत तर दुसरीकडे यांचीच लोकं देशाच्या आयडियोलॉजीला सुरुंग लावायचा प्रयत्न करतायत हा केवढा मोठा विरोधाभास आहे!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.