काय म्हणता RSS वाल्यांनी इंग्लंडच्या राणीला सलाम ठोकला! जाणून घ्या यामागचं सत्य…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, म्हणजेच RSS चा पाणउतारा करण्याची संधी अनेकजण अगदी आवर्जून शोधत असतात. स्वयंसेवकांना हाफ चड्डीवाले म्हणून हिणवणं, हा तर अनेकांचा नेहमीचा उद्योग झालेला आहे. कुणावरही टीका करताना, त्या मुद्द्यांमध्ये तथ्य हवं हे मात्र लोक सोयीस्कररित्या विसरून गेलेले पाहायला मिळतात.
असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ हिला सलामी देताना दिसत आहेत. हा फोटो व्हायरल करताना, त्याबरोबर एक वाक्य सुद्धा लिहिलं गेलंय. ‘स्वातंत्र्यपूर्व काळातील हा फोटो याची साक्ष देतो, की ज्यावेळी देश स्वातंत्र्यासाठी झगडत होता, त्यावेळी हे गद्दार संघी इंग्रजांना गार्ड ऑफ ऑनर देत होते.’
हे असं कॅप्शन आणि संघातील लोकांसमोर चालणारी एलिझाबेथ राणी दिसली, तर कुणालाही राग येणं साहजिक आहे. म्हणूनच या फोटोमागचं सत्य जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे.
–
- एका मराठी माणसाचे बोट धरून नरेंद्र मोदी राजकारणात आले…
- भारतात “इकोसिस्टिम” कुणीच उभारू शकत नाही का? राष्ट्रवादी, भाजप, RSS सुद्धा…
–
या फोटोमागचं सत्य काय?
सगळ्यात पहिली लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, राणी दुसरी एलिझाबेथ हिला राणी होण्याचा मान मिळाला तो, फेब्रुवारी १९५२ मध्ये! म्हणजेच, हा फोटो स्वातंत्र्यपूर्वकाळातील असण्याची शक्यता तिथेच मावळते.
मग आता जाणून घेऊया, हा फोटो बनवलाय कसा? हा फोटो म्हणजे फोटोशॉप या सॉफ्टवेअरची कमाल आहे असंच म्हणायला हवं. स्वयंसेवकांचा एक फोटो आणि राणी दुसरी एलिझाबेथ हिचा नायजेरियन शिपायांसमोर चालतानाचा फोटो, असे दोन फोटो एकत्र करून हा फोटो तयार करण्यात आला आहे.
या वरील फोटोमध्ये नायजेरियन सैनिकांच्या जागी स्वयंसेवक दाखवून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसून येतंय. हे करता असताना, त्यात वापरला गेलेला संघातील स्वयंसेवकांचा फोटो हादेखील जुना नसून, चक्क रंगीत आणि आत्ताचा आहे.
–
- जेव्हा संघाचा कार्यकर्ता भारताच्या सर्वात शक्तिशाली दलित महिलेची आब्रू वाचवतो…
- मोगा बलिदान: जेव्हा ध्वजाच्या रक्षणासाठी २५ RSS स्वयंसेवक थेट खलिस्तान्यांना भिडले
–
या दोन फोटोंचा वापर करून काय तयार करण्यात आलं आहे, हे बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. अर्थात, या खोट्या फोटोचा उद्देश RSS ची बदनामी करणं हाच होता, यात काहीच शंका नाही.
हा फोटो इतका हुबेहूब आणि उत्तम बनला आहे, की चक्क काँग्रेस नेते संजय निरुपम सुद्धा त्यामुळे फसले होते. त्यांनी सुद्धा हा फोटो शेअर केला आणि त्यावरून त्यांना टीकेला सामोरं सुद्धा जावं लागलं होतं.
आता फोटो तुम्हीच पहा आणि तुम्हीच ठरवा, की या खोट्या फोटोवर तुम्ही सुद्धा विश्वास ठेवलं असतात की नाही ते…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.