आयफोनला टक्कर देणारी ‘ब्लॅकबेरी’ दिवाळखोरीपर्यंत कशी काय पोहोचली?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
१४ सप्टेंबरला अॅपलने दरवर्षीप्रमाणे नवीन आयफोनची घोषणा केली. हा कार्यक्रम पाहण्याची उत्सुकता आयफोन घेणारा किंवा न घेणारा या प्रत्येकाला असते. यावर्षी अॅपलने नवीन काय आणलं ही उत्सुकता असते.
यावेळच्या आयफोनमध्ये कोणते फीचर्स आहेत, कॅमेरा कसा आहे किंवा कोणती नवीन टेकनॉलॉजी वापरली आहे हे सर्वांना जाणून घ्यायचं असते.
याच आयफोनला एकेकाळी टक्कर देणारी एक मोबाईलची कंपनी मार्केट मध्ये होती. ती म्हणजे ब्लॅकबेरी कंपनी. आपल्या फोनवरून ई-मेल सेवा देणारी, क्वर्टी कीपॅडसारख्या सुविधा देणाऱ्या ब्लॅकबेरीचे सुरुवातीचे सगळे फोन लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
मोठमोठ्या कंपनीमध्ये काम करणारी लोक, जगातील नेते मंडळी, श्रीमंत आणि प्रसिद्ध लोक ब्लॅकबेरी वापरत असत. ब्लॅकबेरी वापरणे हे एकेकाळी स्टेटस सिम्बॉल होते आणि त्याचे लोकांना व्यसन लागत असे.
ब्लॅकबेरीने इंटरफिटीव्ह पेजर ९५० हा पहिला फोन १९९८ मध्ये काढला. त्यात एक लहान आकाराची स्क्रीन होती, कीबोर्ड बटण आणि महत्वाचं म्हणजे ट्रॅक बॉल होता.
या फोनने सर्वांना आकर्षित केलं आणि त्यानंतर ब्लॅकबेरीने लोकांना पसंत पडणारे अनेक फोन काढले. असे म्हणतात ब्लॅकबेरीच्या फोनमध्ये असणाऱ्या सुरक्षेमुळे या फोनला अनेकांची पसंती होती.
पण ब्लॅकबेरीच्या गोष्टी लोकांना पसंत पडायच्या त्याच गोष्टींमुळे तो बंद होण्याचं कारण बनला. सप्टेंबर २०१८ ला ब्लॅकबेरीने त्यांचे सर्व फोन बंद करण्याची घोषणा केली आणि लोकांना या बातमीने फारच वाईट वाटले.
एक काळ गाजवलेल्या या कंपनीवर आज बंद व्हायची नामुष्की आली. ब्लॅकबेरीतील ‘बीबीएम’ ही मेसेजिंग सेवा म्हणजे त्याकाळचं व्हाट्सअॅप होत. त्यांच्यासमोर मार्केटमध्ये अँपल आणि सॅमसंग सारखे तगडे दावेदार उभे होते.
–
- मोबाईल विश्वात क्रांती आणणाऱ्या नोकियाने केलेल्या चुकांमधून प्रत्येक उद्योजकाने धडा घ्यायलाच हवा
- चायनीज “नसलेला” फोन हवाय? ही आहे बेस्ट नॉन-चायनीज स्मार्टफोन्सची यादी…
–
तसेच ब्लॅकबेरी बंद होण्यामागची कारणं अनेक असली तरी त्यातील काहींसाठी स्वतः ब्लॅकबेरी कंपनीच जबाबदार होती.
टचस्क्रीन फोन :
२००७ मध्ये अॅपलने टचस्क्रीन आयफोन आणला आणि मोबाईल जगात यामुळे क्रांतीच घडली. प्रत्येक फोनमध्ये क्वर्टी कीपॅड देणाऱ्या ब्लॅकबेरीच मात्र नुकसान झालं.
ब्लॅकबेरीचे कीपॅड आवडणाऱ्या लोकांना नवीन टचस्क्रीन आयफोन जास्त आवडू लागले. ज्यात लोकांना कीपॅड हे टचस्क्रीन मध्येच मिळाले व उरलेली जागा ही फोटोज काढण्यासाठी, गेम खेळण्यासाठी वापरता येऊ लागली. यामुळे तरुणांसोबतच इतर वयाच्या लोकांना आयफोन आवडू लागला.
ही गोष्ट पाहून ब्लॅकबेरीनेही टचस्क्रीन फोन बाजारात आणला पण सुरुवातीला त्याला मिळालेला प्रतिसाद नंतर तितका राहिला नाही.
अँड्रॉइडचे मार्केट :
टचस्क्रीन फोननंतर मार्केटमध्ये अँड्रॉइड आले. अँड्रॉइडच्या येण्याने ब्लॅकबेरीचा खूप तोटा झाला. त्यांचे शेअर मार्केट मधील भाव पडण्यास सुरुवात झाली. अँड्रॉइडमुळे गूगलचे दर वाढायला लागले.
अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमला लोकांनी पसंती दिली आणि मोठ्या प्रमाणावर अँड्रॉइड फोन विकले जाऊ लागले. ब्लॅकबेरीच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बऱ्याच समस्या होत्या. अँड्रॉइडमध्ये जे अॅप लोकांना मोफत मिळत होते तेच ब्लॅकबेरीमध्ये पैसे देऊन घ्यावे लागत असे.
बीबीएम आणि फोनमधील सुरक्षितता या दोन मुद्यांसाठी ब्लॅकबेरी वापरला जात होता पण काही काळाने त्याच सुरक्षिततेवर लोकांना शंका येऊ लागली. काही वेळा ब्लॅकबेरी ग्राहकाच्या फोन मधील माहितीचा गैरवापर केला जातोय असा ब्लॅकबेरीवर आरोप करण्यात आला.
हा आरोप अनेक देशांमधून करण्यात आला. ज्यामुळे त्यांच्या नावाला धक्का बसला आणि त्यांच्या ग्राहकांची संख्या कमी झाली. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती किंवा नेतेमंडळी या सुरक्षिततेसाठी ब्लॅकिबेरी वापरत पंरतु या आरोपांमुळे त्या वापरकर्त्यांमध्ये घट झाली.
डिझाइन्समधल्या त्रुटी :
ब्लॅकबेरी वापरणारे अनेक वेळा त्याच्या डिझाईनबद्दल बोलताना म्हणतात की त्यांचे डिझाईन चांगले नसतात. ब्लॅकबेरी प्रिव आणि ब्लॅकबेरी किवन ही अशा डिझाइन्सची उदाहरण आहेत.
तसेच हायब्रीड डिझाईन हेही ब्लॅकबेरीने उगाच काढले होते असे अनेकांना वाटते. ज्यात टचस्क्रीन मधील किबोर्ड सोबत अजून एक किबोर्ड दिला जात असे. ज्याची काहीच गरज नव्हती. ग्राहकांना जास्त पर्याय देणेही अनेक वेळा चुकीचे ठरते.
बीबीएमची संधी :
एसएमएसच्या काळात ब्लॅकबेरीने बीबीएम ही सुविधा दिली होती. ज्यातून लोकांना वेगाने मेसेज पाठवणे, मेसेजेसची मर्यादा नसणे या सुविधा मिळत होत्या. जेव्हा ब्लॅकबेरी अत्यंत तोट्यात जात होती तेव्हा बीबीएमनेच त्यांना तारलं होत असे म्हणता येईल.
–
- बाजारात 5G फोन्स आलेत खरे, पण 5G म्हणजे काय आणि खरच ते आवश्यक आहे का?
- “गोरिला ग्लास”: ह्या विचित्र नावामागचं लॉजिक काय?
–
त्यांना वाटलं की यातूनच आपण परत सगळं सुरळीत करू शकतो. पण त्यांनी ही सुविधा सर्व मोबाईल मध्ये न देता फक्त ब्लॅकबेरीमध्ये ठेवली आणि हाच त्यांचा सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरला. कारण तोपर्यंत ग्राहकांसमोर समोर व्हाट्सअँप व आय मेसेज सारखे पर्याय आले होते.
ब्लॅकबेरी आता बंद झाली आहे परंतु त्यांनी परत यायचे ठरवले तर त्यांना नवीन येणाऱ्या ५जी टेक्नॉलॉजीचा विचार करावा लागेल. त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा ती टेक्नॉलॉजी असणारा फोन त्यांना काढावा लागेल तसेच मोबाईलमधील एखाद्या कंपनी सोबत पार्टनरशिप करून आपले फोन मार्केट मध्ये आणावे लागतील. पूर्वीच्या चुकांमधून त्यांना बरेच काही शिकायला मिळेल.
ब्लॅकबेरीसारखी इतकी मोठी आणि ताकदीची कंपनी अशी बंद होते यातून मोबाईल कंपनीजना बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
समोर येणाऱ्या नवनवीन गोष्टींना आपल्या व्यवसायासाठी कसे वापरावे? किंवा आपण देतोय तेच कायम न ठेवता त्यात कसा बदल करावा या गोष्टी महत्वाच्या आहेत. नाहीतर एखाद्या प्रतिस्पर्धीने आपल्याला मार्केटमधून बाहेर काढण्याएवजी आपल्या निर्णयांमुळे आपलाच व्यवसाय आपल्याला बंद करावा लागतो.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.