उत्तम आरोग्य, घनदाट केस आणि तजेलदार त्वचा यासाठी आयुर्वेदाने सांगितलाय “हा” पदार्थ!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तुम्हाला उत्तम आरोग्य जगायचं असेल, तर जंक फूडला निरोप देऊन फळांचा समावेश केला पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी ही पहिली पायरी आहे.
यात काळ्या मनुका हा लोकप्रिय सुकामेवा, त्याच नाव हे त्याच्या काळ्या रंगाच्या त्वचेवरुन मिळालेलं आहे.
काळ्या मनुका म्हणजे काय याबद्दल थोडं बघूया :
वाळलेल्या द्राक्षांचे अनेक उपयोग आहेत. त्यातील एक काळ्या मनुका. ज्या उत्तम चवीसाठी ओळखल्या जातात. बहुतेकदा याचा उपयोग खीर किंवा फिरनी या भारतीय मिठाई मध्ये टॉपिंग म्हणून केला जातो किंवा बर्फीमध्ये देखील केला जातो.
या व्यतिरिक्त याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा अनेक आहेत. या मनुका मुळात नैसर्गिक शर्करेने परिपूर्ण आहेत आणि यामुळे शरीरातील उर्जा वाढते.
त्यात लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम या पोषक द्रव्यांसह समृद्ध असतात. आणि म्हणूनच शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य मिळविण्यासाठी मनुकांवर निश्चितच शिक्का मारू शकतो.
यामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत, जे आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी मदत करतात. त्याच वेळी, त्यात उपस्थित असलेल्या अनेक नैसर्गिक घटकांमुळे आपल्या त्वचेचा आणि केसांचा पोत सुधारतो.
या मनुका कशा खाव्यात?
मनुका त्यांच्या कच्च्या स्वरूपात खाणे ही एक सामान्य पद्धत आहे. पण त्यांना रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाणे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं.
मनुकांच्या बाह्य त्वचेवर असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे पाण्यात विरघळतात. त्यामुळे शरीराद्वारे शोषल्या जाणाऱ्या पोषक द्रव्यांच प्रमाण वाढतं.
उच्च रक्तदाब ग्रस्त लोकांसाठी या विशेष फायदेशीर आहेत.
या मनुका खायचे काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
१. अॅनेमिया सुधारतो:
काळ्या मनुकामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असतं, यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि अशक्तपणा पूर्णपणे बरा होतो.
दररोज मूठभर काळ्या मनुका खाल्ल्याने शरीराला आवश्यक असणारं लोह योग्यप्रकारे वाढतं.
२. उच्च रक्तदाब:
उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे शरीरात गंभीर आजारनिर्माण होतात. काळ्या मनुकामध्ये पोटॅशियम असतं, जे आरोग्यास आवश्यक आहे.
सकाळी लवकर उठुन मनुका खाल्ल्या, तर शरीरातील सोडियम बर्याच प्रमाणात कमी होतं. सोडियम हे उच्च रक्तदाबाच एक मुख्य कारण आहे.
मूठभर काळ्या मनुका खाणं आपल्या समस्येवर उपचार ठरू शकतो.
३. वजन कमी करण्यासाठी :
काळ्या मनुकामध्ये फायबर असतं. जे आपल्याला दीर्घकाळापर्यंत पोट भरलेल आहे अशी जाणीव करून देतात.
काळ्या मनुकामध्ये असलेले फ्रुक्टोज आणि सुक्रोज आपल्याला जास्त काळ अन्नाशिवाय ठेवू शकतात. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी डॉक्टर काळ्या मनुका खाण्याची शिफारस करतात.
४. दात संरक्षण :
काळ्या मनुका दातांसाठी अत्यंत चांगल्या असतात. यात ओलॅनोलिक acid असतं. हा काळ्या मनुकाचा सर्वात चांगला फायदा आहे.
त्या दात खराब होण्यापासून वाचवतात. जंतू आणि पोकळीविरूद्ध लढू शकतात. ज्यामुळे दात किडण्याची शक्यता असते अशा बर्याच जीवाणूंच्या वाढीस त्या प्रतिबंधित करतात.
५. हाडं मजबूत होतात:
हाडांना निरोगी ठेवण्यासाठी काळ्या मनुकांचा उपयोग केला जाऊ शकतो. मनुकामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं.
कॅल्शियमच्या चांगल्या प्रमाणा बरोबरच, यात बोरॉन देखील असतो, हा एक पोषक घटक आहे जो शरीराला कमी प्रमाणात आवश्यक असतो ,पण तरीसुद्धा तो खाणं आवश्यक आहे. ज्यामुळे हाडं मजबूत होऊन तुम्हाला ताकद मिळते.
६. दृष्टी सुधारते:
हे खरं आहे की, काळ्या मनुका डोळ्यांच्या काळजीसाठी योग्य ठरू शकतात. यात काही एंटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.
हे गुणधर्म डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगले आहेत आणि प्रभावीपणे डोळ्यांचे संरक्षण करू शकतात. वयाशी संबंधित दृष्टीदोष असेल, तर तो कमी करायला मदत करतात.
७. ताप बरा करणे:
मनुका खाल्ल्याने ताप बरा होऊ शकतो. यांत असंख्य अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे तापाविरुद्ध प्रभावीपणे लढायला मदत करतात.
हे एक सुपरफूड आहे आणि आपल्या शरीराला आवश्यक असलेले जवळजवळ सर्व जीवनावश्यक घटक यातून मिळतात. म्हणूनच डॉक्टर त्यांच्या रूग्णांना नियमितपणे काळ्या मनुका खायला सांगतात.
हे ही वाचा –
===
८. उर्जा पातळी वाढवते:
बरेच लोक जिमला जायच्या आधी मनुका खातात. याने आपली उर्जा पातळी वाढते.
हे विशेषतः विद्यार्थी आणि काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी उपयुक्त आहे जे उन्हाळ्याच्या दिवशी बाहेर जातात. भिजलेल्या मनुका खाल्ल्याने शरीरात लगेच ऊर्जा निर्माण होते.
९. मूत्रपिंड निरोगी ठेवते:
काळ्या मनुका मूत्रपिंडात जे दगड तयार होतात ते थांबवण्यासाठी उत्तम आहेत. या प्रक्रियेत, भरपूर पाणी पिण्याची आणि कमी कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाण्याची गरज आहे.
असं केलं तर हे किडनी स्टोन्स नष्ट होतात. हे नियमितपणे केल्याने तुम्हाला बदल नक्कीच दिसून येईल.
१०. पित्ताचा त्रास कमी होतो:
अॅसिडीटीला सामोर जाण्यासाठी काळ्या मनुका हा एक नैसर्गिक घरगुती उपाय आहे.
यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं, जे आपल्या पोटाला शांत करण्यासाठी मदत करतं. त्याशिवाय, भिजवलेल्या काळ्या मनुकामुळे पोटात निर्माण झालेला ज्वालामुखीच थंड होतो.
११. त्वचा चमकदार बनवते:
आपल्याला कायम निर्दोष त्वचा हवी असते. काळ्या मनुकांमध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्त शुध्द होतं. त्या त्वचेमधील धोकादायक द्रव आणि घाण बाहेर टाकण्यास मदत करतात.
विशेषत: मुरुम, डाग, सुरकुत्या यावर मनुका रामबाण उपाय आहेत. एकदा यामुळे रक्त शुद्ध झालं, की आपण निरोगी, समस्यामुक्त आणि चमकणारी त्वचा बघू शकता.
१२.एंटी एजिंग गुणधर्म:
अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी आपण मूठभर काळ्या मनुका खाणं आवश्यक आहे.
१३. केसांच्या वाढीसाठी काळ्या मनुका योग्य:
मनुका खाल्ल्यामुळे शरीराला मिळणार लोह हे केसांमध्ये रक्त संचार करण्यास मदत करते. केसांची वाढ उत्तम प्रकारे होते. आणि तुम्हाला घनदाट केस मिळतात.
१४. केसांचा नैसर्गिक काळा रंग ठेवते:
केसांसाठी काळ्या मनुकांचे फायदे चांगले आहेत. व्हिटॅमिन सी याची पातळी याने वाढते आणि लोह तसंच अनेक खनिज शरीरात जाण्यास मदत होते.
म्हणून जर तुम्हाला निरोगी आणि आकर्षक रहायचं असेल, तर नियमितपणे काळ्या मनुका खाण्यास विसरू नका. निरोगी रहा, आनंदी रहा!
हे ही वाचा –
===
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.