' दही भात आवडीने नक्कीच खात असाल, त्याचे हे ९ आरोग्यदायी फायदेही जाणून घ्या… – InMarathi

दही भात आवडीने नक्कीच खात असाल, त्याचे हे ९ आरोग्यदायी फायदेही जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

काळानुसार जसजसा माणसाच्या जीवनशैलीत बदल होत गेला त्याच नुसार माणसाच्या आहार पद्धतीत सुद्धा बदल झाला. पौष्टिक अन्नपदार्थांपेक्षा सोपे व सोयीस्कर असलेल्या अन्ना कडे आपण वळू लागलो. वेळ वाचवण्याचा नादात, संतुलित अन्न या संकल्पनेकडे आपले दुर्लक्ष होत गेले.

आपल्या असंतुलित आहारामुळे आपण त्या उणिवा पूर्ण व्हाव्या म्हणून आपण मल्टी व्हिटॅमिन टॅबलेट, प्रोटीन शेक्स आणि अनैसर्गिक उत्पादनावर अवलंबून राहणे सुरू केले.

या सगळ्याचा फायदा झालाच पण त्याचप्रमाणे दुष्परिणामही झाले. जसे की किडनी स्टोन, हॉर्मोन्सचे संतुलन बिघडणे, मासिक पाळीचे वय कमी होणे, हृदय विकार, अॅसिडीटी, रक्तदाबाचा त्रास इत्यादी…

 

acidity inmarathi

 

तसे पाहिले तर आपली भारतीय आहार पद्धत ही भरपूर प्रमाणात विकसित आहे. आपल्याकडे वनस्पती, मसाले, भाज्या, धान्य त्यांचे योग्य आणि विशिष्ट कारणांसाठी फायदे होणारे व्यंजन, पदार्थ हे अगदी विचार करून बनवले गेले आहेत.

आजकाल तर पदोपदी आपल्याला याची प्रचिती येते आहे. आपले स्वयंपाक घर हे कोणत्या औषधालयापेक्षा कमी नाही हे या महामारी काळात, जीवन रक्षक काढ्यानी दाखवून दिले.

असच एक दुर्लक्षित व फक्त आपल्या चविष्ट असण्या साठी प्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे दही भात. ‘दही भात’ इतका सोपा, चविष्ट पदार्थ आपण सगळेच आनंदाने खात आलोय.

 

curd rice inmarathi

लहानपणी, वरण भाताचा कंटाळा आला किंवा काही तरी वेगळं चटकदार खायची इच्छा झाली की आपली आई किंवा आजी हमखास आपल्याला दही भात खाऊ घालत असल्याचे कित्येक जणांना आठवत सुद्धा असेल.

पण हा इतका चविष्ट आणि सगळ्यांच्याच आवडीचा दही भात फक्त महाराष्ट्रापुरता सीमित नसून दक्षिण, गुजराती, जैन आहाराचा सुद्धा एक अमूल्य भाग आहे.

दही भाताचे फायदे

फक्त आवड म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या दही भाताचे आपल्या आरोग्यासाठीचे फायदे काय आहेत ते आपल्याला माहितीच नाही. तर आज तेच जाणून घेऊया.

१) वजन कमी होणे

 

weight loss inmarathi
thehealthsite.com

 

भात खाल्ला तर वजन वाढते असे आपण सगळे जाणून आहोत, त्या मुळे कित्येकजण आवडत असूनही भात खाणे बंद करतात. ज्या मुळे, भातात असलेले पौष्टिक तत्व आपल्याला मिळत नाही.

पण भातात दही मिसळून खाल्ले तर वजन वाढण्याऐवजी ते कमी होते. कारण दह्यात फायबर भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे, पुष्कळ वेळ भूक लागत नाही.

 

२) बद्धकोष्ठतेपासून मुक्ती

 

stomach inmarathi
thehealthsite.com

 

दह्यात भरपूर प्रमाणात लाईव्ह बॅक्टेरिया, आणि गुड फॅट असते. हे दोन्ही घटक आपली हेल्थ सुधारून, पाचन व्यवस्था अधिक सुदृढ बनवतात. ज्यामुळे, शरीरात अतिरिक्त गॅस उत्पन्न होत नाही.

 

३) रोगप्रिकारशक्ती वाढवणे

 

Immunity-inmarathi
hehealthsite.com

 

माणसाची रोगप्रतिकरकशक्ती मुख्यतः पोटाशी संबंधित असते. ती वाढवायची असेल तर पचन शक्ती वाढवण्याची गरज असते. दही भातामुळे पचन प्रक्रिया सुधारते आणि माणसाची रोगप्रतिारकशक्ती वाढते.

 

४) शरीराचे तापमान कमी करणे –

 

body temprature inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

दक्षिणेतील लोक आपल्या जेवणानंतर, दही भाताचे नियमित सेवन का करतात याबद्दल कधी आपण विचार केला आहे का? कारण दक्षिणेकडील तापमान सतत उष्ण असते आणि दही भाताने आपल्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.

 

५) तणाव कमी करणे –

 

reduce stress inmarathi
zenefits.com

 

दह्यात भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सीडंट्स आणि चांगले फॅट असते. हे घटक आपल्या शरीरातील तणाव उत्पन्न करणाऱ्या घटकांना कमी करून, ताण तणाव कमी करण्यास मदत करतात.


हे ही वाचा –

 

===

६) सुदृढ हाडं –

 

healthy bones inmarathi
josephmuciraexclusives.com

 

कॅल्शियम जे हाडं मजबूत बनवायला आणि व्हिटॅमिन डी (कॅल्शियम साठवून ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते), हे दोन्ही घटक दह्यात असतात त्यामुळे आहारात नियमित दह्याचे सेवन केल्यामुळे योग्य प्रमाणात शरीराला कॅल्शियम मिळते.

जास्तीच्या कॅल्शियमच्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स सुद्धा होऊ शकतात, त्यामुळे दही भात रोज खाल्ल्याने योग्य मात्रेत कॅल्शिअमचा पुरवठा जाऊन आपली हाडे मजबूत राहतात.

 

७) रक्तदाब नियंत्रणात ठेवणे –

 

blood pressure inmarathi

 

दह्यात असलेली पौष्टिक तत्व जसे मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रोटीन्स या मुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ज्यांना हा त्रास आहे त्यांनी दही भात अवश्य आपल्या आहारात समाविष्ट करून घेण्याची गरज आहे.

 

८) नितळ त्वचा –

 

Skin care InMarathi

 

इंग्रजीत एक म्हण आहे ‘व्ही आर व्हॉट व्ही ईट’, त्यामुळे शरीराला योग्य आहार दिल्यामुळे त्याचे परिणामही तसेच होतात. आपल्या त्वचेकरता दह्यातील अँटी ऑक्सीडंट्स फार उपयुक्त ठरतात. त्यामुळे आपल्या त्वचेच्या समस्या कमी होऊ शकतात.

 

९) मासिक पाळीचा त्रास कमी होणे –

 

periods-inmarathi
newstrack.com

 

दह्यातल्या कॅल्शिअम आणि पोटॅशियममुळे स्नायू आपल्या मसल्स रिलॅक्स होतात आणि मासिक पाळीच्या वेळी होणारी पोट दुखी सुद्धा कमी होते.

जर आपण दही भाताला आपल्या आहाराचा भाग करणार असाल तर ही काळजी घ्या –

१) रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे. शरीरास दही बसण्याची संभावना असते.

२) आपण लॅक्टोज इंटोलरंट आहोत का ही चाचणी करून घेणे.

वेस्टर्न आहारतज्ञ देखील आहारातील “कर्ड, योगहर्ट” किती महत्त्वाचे आहे याचा प्रचार करताना आढळून येतात. दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करून घेण्याची एक उत्तम पद्धत म्हणजे “दही भात”.

काही लोकांना दह्याचा त्रास होतो. दही खाल्ल्यावर सर्दी, खोकला यासारख्या समस्या होतात. तर त्या लोकांसाठी दह्यातील आंबटपणा कमी करण्याची एक सोपी रेसिपी दिलेली आहे.

 

curd rice featured inmarathi
worldhab.com

 

भातात, १ वाटी दही व चवीनुसार मीठ मिसळून घा. त्या नंतर थोडे तेल तापवून फोडणी करतो त्याच प्रमाणे मोहरी, जिरं, कढीपत्त्याची पाने घालून फोडणी करा व दही मीठ मिसळलेला भात त्या फोडणीत मिक्स करून, २-३ मिनिटे परतून घ्या.

याला ‘कर्ड राईस’ म्हणतात. दक्षिणेतील लोक, नुसता दही भात खाण्या ऐवजी या प्रकारे फोडणी दिलेला कर्ड राईस पसंत करतात. असा हा स्वस्त आणि मस्त दही भात आपल्या अरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतो, आपल्या आवाक्यात असतो आणि सोयीस्कर सुद्धा.

 

हे ही वाचा 

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?