दुर्गंधापासून ते डागापर्यंत, जीन्सच्या प्रॉब्लेम्सवर ७ इंटरेस्टिंग “जुगाड”…!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
डेनिम/जीन्स… सध्याच्या जीवनशैलीतील कपड्यांमधील हा सर्वांचा आवडता प्रकार. डेनिम म्हणजे जीव की प्राण असं म्हणायला हरकत नाही. डेनिम ही आपल्या सर्वांच्या कपाटात सहज उपलब्ध असणाऱ्या कपड्यांपैकी एक!
आजच्या जीवनशैलीप्रमाणे ही वापरायला सर्वात कम्फर्टेबल आणि लवकर न खराब होणारी आहे. पण अनेक वेळा असं होतं की आपल्याला डेनिमविषयी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.
कधी आपल्याला आपल्या साईजची डेनिम मिळत नाही, तर कधी त्यावर डाग लागल्याने ती निरुपयोगी होऊन जाते.
कितीही खराब झाली, तरी कोणालाच आपली डेनिम टाकून द्यायची इच्छा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही डेनिम हॅक्स घेऊन आलो आहोत, ज्याने डेनिम बऱ्याच काळापर्यंत खराब होण्यापासून वाचेल.
१. डेनिममधून दुर्गंध येतो आहे? ही ट्रिक ट्राय करा…
आपण सगळेच जवळजवळ रोज डेनिमचा वापर करत असतो. अशावेळी बहुतेकदा आपण डेनिम कापड धूत नाही. ज्यामुळे कधी कधीते स्मेली होऊन जाते, त्यातून वास यायला लागतो.
जर तुम्हाला तुमची डेनिम तरीही धुवायची नसेल, तर तुम्ही ती न धुता देखील त्यातून येणारा दुर्गंध नाहीसा करू शकता.
त्यासाठी तुमची डेनिम एका झिपलॉक बॅगमध्ये पॅक करा आणि त्यानंतर रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्या. यामुळे तुमच्या डेनिमचा रंग जाणार नाही, तसेच त्यातील सर्व बॅक्टेरिया नष्ट होतील आणि तुमची डेनिम आधीप्रमाणे फ्रेश वाटेल.
२. डेनिमवर chewing gum चिटकले तर काय करणार?
जर तुमच्या डेनिमवर कधी च्युईंग गम चिटकले तर तुम्ही काय कराल..? आवडती डेनिम टाकून देणार का? गरज नाही. केवळ एका बर्फाच्या तुकड्याच्या मदतीने यातून सुटका होऊ शकते…
एक बर्फाचा तुकडा घ्या, तो तुमच्या डेनिमवर ज्या ठिकाणी चिंगम चिटकले आहे तेथे १०-१५ मिनिटे घासा. यामुळे ते कडक होईल आणि अतिशय सहजपणे निघून जाईल.
३. डेनिमवर रेड वाईन पडली तर?
तुमच्या डेनिमवर रेड वाईन पडली, तर तुमची डेनिम खराब होईल. त्यावर वाईनचे डाग पडतील, पण काळजी नको कारण तुम्ही यावर सुद्धा एक झकास आयडिया आहे.
व्हाईट वाईनचा वापर करून हा डाग काढता येईल. व्हाईट वाईनमध्ये डेनिम भिजवून ठेवा. त्यामुळे रेड वाईनमधील anthocyanin कमी होऊन डेनिमवरील डाग फिक्कट होईल. थोडक्यात काय, तर काट्याने काटा काढणे…
लाल रंग फिक्कट होईल, तेव्हा डेनिम लगेच डिटर्जंटने धुवून टाका. पण लक्षात ठेवा की व्हाईट वाईनमध्ये भिजविल्यानंतर डेनिम डिटर्जंटमध्ये फार काळ भिजवू नका, नाहीतर डेनिमवर ब्लीचचे डाग पडतील. करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं व्हायचं.
४. जुन्या डेनिमचा कंटाळा आलाय का?
जुन्या जीन्सचा कंटाळा आलाय आणि नवीन डेनिम घ्यायची नाहीये? तर तुम्ही जुन्या डेनिमलाच एक न्यू लुक देता येईल!
बस त्यासाठी फक्त एका सॅण्डपेपरची गरज आहे. सॅण्डपेपरने डेनिम घासा. यामुळे तुमच्या साधा डेनिम Distressed डेनिमसारखा दिसेल.
हे ही वाचा
===
५. वजन वाढलंय..? तुमची डेनिम जीन्स तुम्हाला होत नाहीये? तर हे करून पहा
वजन वाढलं असेल आणि आता तुम्ही तुमच्या आवडत्या डेनिममध्ये फिट बसत नसाल, तर काळजी करू नका. कारण तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमची डेनिम लूज करू शकता.
आधी हेअरड्रायरने डेनिमच्या कमरेचा भाग एअरड्राय करा. त्यांनंतर तो खेचा. यामुळे तुमची डेनिम थोडी लूज व्हायला मदत होईल.
६. जर डेनिम खरेदी करताना ट्राय करता येत नसेल तर काय कराल?
जर तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी डेनिम विकत घेत आहात, जिथे तुम्ही ती ट्राय करून बघू शकत नाही, तर काय कराल? टेन्शन घेऊ नका, त्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे.
अशावेळी डेनिमची कंबर तुमच्या मानेभोवती गुंडाळून बघा. जर ती कम्फर्टेबली तुमच्या मानेभोवती बसली, तर ती कंबरेला सुद्धा नीट होणार, याची खात्री आहे.
७. डेनिमवर शाई पडली तर?
डेनिमवर शाई पडली तर काय? हा विचारही नकोसा वाटतो, नाही का? आपल्या आवडत्या डेनिमवर जर शाई पडली, तर तो निरुपयोगी होऊन जाईल, बरोबर ना? तर याचं उत्तर नाही असं आहे. हा शाईचा डाग काढता येतो.
एका बादलीत पाणी घेऊन डेनिम त्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि त्यात एक ग्लास दूध सुद्धा घाला. नंतर शाईचा डाग असलेल्या भागावर हेअरस्प्रे लावा आणि नेहमीच्या डिटर्जंटने धुवून टाका. यामुळे डेनिमवरील शाईचा डाग पूर्णपणे नाहीसा होईल.
याशिवाय जर आणखी काही डेनिम हॅक्स तुम्हाला माहित असतील, तर आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि ही माहिती तुमच्या सर्व डेनिम लव्हर्स मित्रांना नक्की कळवा…
हे ही वाचा
===
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.