' ‘या’ कारणामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे! – InMarathi

‘या’ कारणामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

=== 

प्रेम ही भावना खूप संवेदनशील असते. त्या भावनेला कोणतीही सीमा नसते. पण एकतर्फी प्रेमाने नेहमीच काहीतरी वेगळे घडून येते, एकतर्फी प्रेमाने होणारे परिणाम देवालाही थांबवता आलेले नाहीत.

साक्षात गणपती बाप्पाला सुद्धा…!

 

lalbag raja InMarathi

 

गणेश ह्याला बुद्धीचा देवता म्हणून सर्वत्र पूजिले जाते. ते एक अलौकिक दैवत आहे, त्यांचे सामर्थ्य अपार आहे. देवी पार्वतीने आपल्या शरीराच्या मैलातून गणेशाला जन्म दिला.

त्यानंतर कशाप्रकारे शंकरजीने त्याचे शीर उडविले आणि त्यानंतर हत्तीचे शीर लावून त्याला एक नवा जन्म मिळाला ह्याबाबतची कहाणी तर आपणा सर्वांनाच ज्ञात आहे.

===

हे ही वाचा घरगुती गणेशोत्सवाची सुरूवात का झाली – महाभारतातील रोचक कथा!

===

पुण्यातल्या मानाच्या ५ गणपतींचा थक्क करणारा “हा” शेकडो वर्षांचा इतिहास फार कमी जणांना माहितीये

 

ganesh InMarathi

 

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. तसेच तो स्थिर बुद्धीचा, शांत स्वभावाचा आहे. त्याच्यासमोर राक्षस असो वा कुठली संतापलेली व्यक्ती असो पण गणपती आपलं धैर्य कधीही सोडत नाही.

पण गणपतीच्या जीवनातही एक अशी परिस्थिती उद्भवली होती ज्यामुळे गणपतीला आपले धैर्य सोडावे लागले.

सर्वांचे विघ्न दूर करण्यासाठी आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी नेहमीच आपले बाप्पा तयार असतात.

अश्या या गणपती बाप्पांच्या जीवनामध्ये घडलेली अशी एक घटना (जी काहींसाठी “दंतकथा” आहे) आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जी कदाचित तुम्हाला माहित नसेल.

 

ganesh and tulsi story InMarathi

 

भारतीय पौराणिक कथेमध्ये खूप प्रेमकथा आहेत. जसे शंकर-पार्वती, विष्णू-लक्ष्मी, राम-सीता आणि राधा-कृष्णा. तशीच एक आहे तुम्हा-आम्हाला माहित नसलेली गणेश आणि तुळशीची प्रेमकथा..! परंतु दुर्दैवाने ही प्रेमकथा यशस्वी होऊ शकली नाही.

भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करणारे म्हणून ओळखले जाणारे देवादी देव श्री गणेश पवित्र तुळशीच्या अवितरत प्रेमाचे उत्तर देऊ शकले नाहीत.

तुळशीचा पापी द्वेष पाहून श्री गणेशांना जबर धक्का बसला, म्हणून त्यांनी तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

ज्यामुळे तिला आयुष्यभर पश्चाताप करावा लागला. गणेशांनी तिला शाप दिला की,

माझ्या कोणत्याही पूजेअर्चेवेळी, कोणत्याही शुभ विधीत तुझा वापर होणार नाही.

म्हणूनच की काय आजही गणपतीच्या विधीमध्ये तुळस वर्ज्य मानली जाते.

 

Tulsi love Ganesh.marathipizza1

 

चला पाहूया काय आहे ही कथा…

धर्मराजाची मुलगी तुळस ही भगवान विष्णूंची मोठी भक्त होती. ती गंगा नदीच्या काठावर जाऊन विष्णूंना समर्पित असणाऱ्या मंदिरामध्ये पूजा करत असे.

एकदा असे झाले की, तुळस नदीच्या काठावर गेलेली असताना तिने एका सुंदर युवकाला गहन ध्यानात मग्न असलेले पाहिले, तो युवक म्हणजे श्रीगणेश होते.

 

tulsi InMarathi

 

श्री गणेश ध्यानास्थ स्थितीमध्ये असताना त्यांचे तेज वाढू लागले. त्यांच्या त्या तेजाने तुळस प्रभावित झाली आणि तिने त्यांच्याकडे जाऊन आपले प्रेम व्यक्त करून त्यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली.

===

हे ही वाचा गणपती बाप्पासाठी घरी आणलेल्या दुर्वा तुम्हालाही आरोग्याचं वरदान देतात, वाचा!

===

                 – आपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा : गणपती बाप्पाची “गोष्ट”

 

ganesha_and_tulsi_1 InMarathi

 

ब्रह्मचर्याच्या कठोर मार्गावर असल्याने गणेशाने तिच्या प्रेमाला आणि तिच्या लग्नाच्या प्रस्तावाला नम्रपणे नकार दिला.

श्री गणेशांच्या नकारामुळे तुळशीला आपला अपमान झाल्यासारखे वाटले. तिच्या भावना खूप दुखावल्या गेल्या आणि त्या वेदनांचा बदला घेण्यासाठी तिने गणेशाला शाप दिला.

तिने श्री गणेशाला शाप दिला की,

एक दिवस तुम्हाला इच्छेविरुद्ध लग्न करावे लागेल.

तिचा तो द्वेष पाहून श्री गणेशांनीही तिला शाप दिला की,

भविष्यामध्ये तिला एका राक्षसाबरोबर लग्न करावे लागेल.

श्री गणेशाच्या शापाने तुळशीच्या गर्विष्ठपणावर मात केली, लगेचच तिला आपली चूक जाणवली. तिने आपला शाप मागे घेतला आणि गणेशांची क्षमा मागितली. तिने अनेक विनवण्या केल्यानंतर गणेश शांत झाले.

 

ganesha_and_tulsi_2 InMarathi

 

श्री गणेशांनी तिला आशीर्वाद देत सांगितले की,

भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तिला या शापावर उ:शाप मिळेल आणि तिला एक पवित्र वनस्पती (औषधी वनस्पती) म्हणून स्थान मिळेल.

पण श्री गणेशांनी तिला स्मरण करून दिले की,

माझ्याशी निगडीत कोणत्याही पूजेअर्चेमध्ये पृथ्वीतलावर तुझा वापर करण्यात येणार नाही. मी नेहमीच तुझ्यापासून दूर असेन.

त्यानंतर श्री गणेशाच्या शापामुळेच राक्षसांचा राजा “शंखचूदा” जो जालंधर म्हणून सुद्धा ओळखला जायचा, त्याचाशी तुळशीचे लग्न झाले.

 

Tulsi-vivah InMarathi

 

पुढे त्याच्या पापाचा घडा भरल्यावर भगवान शंकरांनीच त्याचा वध केला. तर अशी आहे ही पुराणातील एक रंजक कथा!!!

===

हे ही वाचा या ९ गोष्टी पाळा आणि तुमचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने पवित्र, मंगलमय करा…!

===

               – शंकराने गणपतीचे उडवलेले शीर आजही भारताच्या या गुहेत पहायला मिळते

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?