' गोकुळाष्टमीच्या उर्दूत शुभेच्छा: महागुरू, तुमच्यावर उखडलेल्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या का? – InMarathi

गोकुळाष्टमीच्या उर्दूत शुभेच्छा: महागुरू, तुमच्यावर उखडलेल्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सचिन पिळगावकर म्हटलं की आपल्यासमोर एकच गोष्ट येते ती म्हणजे सोशल मीडियावरचं ट्रोलिंग! मुंबई अँथम, दिमाग मे भुसा सारखी ‘अजरामर’ गाणी करणारे आणि आवडीचे चमचमीत पदार्थ खाण्याचा अट्टहास करणारे आपले लाडके महागुरु सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.

जन्माष्टमीच्या निमित्ताने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन सचिनजी यांनी त्यांच्या हटके स्टाइलमध्ये एका लोकप्रिय कवीची शायरी शेअर करत जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या, त्यामागचा त्यांचा हेतू आणि त्या शायरीचा अर्थ जरी चांगला असला तरी उर्दूमध्ये शुभेच्छा दिल्याने लोकांनी सचिन यांच्या त्या पोस्टवर फार मजेशीर कॉमेंट केल्या आहेत.

हे ही वाचा महागुरू सचिन, नव्या व्हिडीओमुळे ट्रोल: त्यांचं त्यावरील उत्तर वाचलंत का?

sachin pilgaonkar inmarathi

 

काही हलक्या फुलक्या कॉमेंटसुद्धा आल्या असल्या तरी आपल्या धर्माच्या सणाच्या शुभेच्छा आपल्याच भाषेत दिल्या गेल्या पाहिजेत असाही लोकांचा सूर आपल्याला या कॉमेंट सेक्शनमध्ये बघायला मिळतोय.

सचिन पिळगावकर यांचे नाव सध्या अशाच काही गोष्टींमुळे सोशलमीडियावर चर्चेत असते, त्यांच्या या खास उर्दू शायरीवर लोकांनी नेमक्या काय भन्नाट कॉमेंट केल्या आहेत त्या बघूयात तरी!

बहुतेककरून सचिन यांच्या याच खास डायलॉगची विडंबनं तुम्हाला कॉमेंटमध्ये वाचायला मिळतील!

 

comment 1 inmarathi

 

शोलेमधल्या अहमद या पात्रातून सचिनजी बाहेरच आलेले नाहीयेत असाही आरोप नेटकऱ्यांनी त्यांच्यावर केलाय.

 

comment 2 inmarathi

 

मराठीतून शुभेच्छा न दिल्याने बऱ्याच लोकांनी ही गोष्ट खटकली आणि त्यांनी त्यांची मतं इथे मांडली!

 

comment 3 inmarathi

 

सचिन यांच्या मुंबई अँथम या गण्याखाली जशी कॉमेंट वाचणाऱ्यांची गर्दी होते तशीच गर्दी तुम्हाला इथेही बघायला मिळेल!

 

comment 4 inmarathi

 

comment 5 inmarathi

 

लोकांनी तर कॉमेंटमध्ये नुसता धुकामुळच घातलाय, हे खालच्या कॉमेंटवरुन कळून येतच!

 

comment 6 inmarathi

 

comment 7 inmarathi

हे ही वाचा सचिन “महागुरू” पिळगावकर सरांनी केलेली “बॅटिंग” काय काय शिकवून गेलीये पहा!

नेटकऱ्यांच्या या कॉमेंट वाचून तुम्हीदेखील हसून हसून लोटपोट झाला असाल, पण सचिन यांच्याच बाबतीत हे दरवेळेस का घडते? सचिनजी एक उत्कृष्ट कलाकार आहेत यात कसलाच वाद नाही, पण प्रत्येक गोष्टीतला त्यांचा मीपणाच त्यांना दरवेळेस नडतो असंच नेटकऱ्यांचा सूर असतो!

सचिनजी ट्रोलर्सना काहीच किंमत देत नसले तरी एक उमदा कलाकार म्हणून निर्माण झालेली त्यांची प्रतिमा या कारणांमूळे सोशलमीडियावर मलिन होत आहे याचा त्यांनी विचार नक्कीच करायला हवा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?