' ‘भारतीय पदार्थ एकाच मसाल्यापासून बनतात’, असे अकलेचे तारे तोडणाऱ्याला अस्सल देशी जळजळीत प्रतिक्रिया – InMarathi

‘भारतीय पदार्थ एकाच मसाल्यापासून बनतात’, असे अकलेचे तारे तोडणाऱ्याला अस्सल देशी जळजळीत प्रतिक्रिया

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘पदार्थाची खरी ओळख म्हणजे त्याचा वास’,  गुलाबजाम चित्रपटात सोनाली कुलकर्णी सिद्धार्थ चांदेकरला स्वयंपाक शिकवताना हा कानमंत्र देते. मराठी पदार्थाना खमंग फोडणी देणारा चित्रपट आजही अनेक खवय्ये आवडीने बघतात.

भारतीय पाककला आज जगभरात चर्चिली जाते, ऑस्ट्रलियाच्या मास्टर शेफ स्पर्धेत भारतीय वंशांच्या एका तरुणाने अस्सल भारतीय पदार्थ बनवून ती स्पर्धा जिंकली होती. केवळ भारतीयच नव्हे तर एका श्रीलंकन महिलेने अशाच एका स्पर्धेत चक्क महाराष्ट्रीयन थाळी बनवून त्या स्पर्धेत पहिला नंबर पटकवला.

 

indian food inmarathi

 

भारतीय पाककलेचे होणारे सर्वत्र कौतुक बहुदा एका अमेरिकन लेखकाला झोंबले असावे, कारण त्याने असं म्हंटल आहे की, ‘सर्व भारतीय पदार्थात एकाच मसाल्याचा वापर होतो’. आपल्या अकलेचे तारे तोडणाऱ्या या लेखकाचा भारतीयांनी अस्सल कोल्हापुरी मिरचीच्या ठसक्यात समाचार घेतला..कोण आहे तो लेखक चला तर मग जाणून घेऊयात

 

कोण आहे तो लेखक :

जीन विंगार्टन असे त्या लेखकाचं नावं आहे, वॉशिंग्टन पोस्ट या न्यूजपोर्टलमध्ये तो विनोदी स्तंभालेख लिहतो, जन्माने अमेरिकन असलेला जीन खरं तर मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे. मात्र लिखाणाची आवड असल्याने त्याने आपले करियर लेखनातच केले आहे. लिखाणातील पुरस्कार देखील त्याला मिळाले आहेत.

 

gin inmarathi

 

नेमकं काय म्हणाला आहे तो?

वॉशिंग्टन पोस्ट या न्यु पोर्टलमध्ये काम करता असल्याने त्याने, you cant make me eat these food या नावाने एक लेख लिहला, ज्यात त्याने ‘त्याच्या नावडत्या पदार्थांची माहिती तर दिलीच आणि पुढे तो असेही म्हणाला की मला भारतीय पाककला सुद्धा आवडत नाही’, लेखाच्या सुरवातीलाच त्याने काही पदार्थांच्या बाबतीत आपल्या तक्रारी लिहल्या आहेत.

याच लेखाच्या आधीच्या सदरात त्याने असे लिहले होते की, ‘संपूर्ण भारतीय जेवण हे केवळ एका मसाल्यावर बनतात. त्याच्या अशा बेताल लिहीण्यामुळे तो चांगलाच ट्रोल झाला आहे’. भारतीय लोकांनी ट्विट करत आपला निषेध नोंदवला आहे, चला तर मग बघुयात लोकांच्या प्रतिक्रिया..

 

spice inmarathi 2

 

भारतीय जेवणाला नावं ठेवणाऱ्या या अमेरिकी लेखकाला चक्क पाकिस्तानी माणसानेसुद्धा सुनावले आहे, त्याला स्वतःला पाकिस्तानी जेवण आवडतेच पण त्याला साऊथ इंडियन पदार्थ देखील आवडतात, असे त्याने ट्विट करत सांगितले.

 

spice inmarathi 1

 

घराघरात असणाऱ्या मसाल्याच्या डब्याचा फोटो टाकत, उपरोधिक टीका चक्क एका परदेशी माणसानेच केली आहे.

 

spice inmarathi 4

 

घरातल्या मसाल्यांचा थेट फोटो टाकत त्याबद्दल असं लिहलं आहे की ‘मी दोन राज्यांचे पदार्थ बनवतो’ तरी एक मसाला? असा सवालच केला आहे.

 

spice inmarathi

 

वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक मसाल्यांचा फोटो टाकत यातील एका मसाला मी शोधतोय असा टोला लागलेला आहे.

 

spice inmarathi 3

हे ही वाचा – हृदय निरोगी राहण्यासाठी दररोजच्या आहारात हे सात मसाले हवेतच!

आपल्यावर होणाऱ्या प्रचंड टीकेमुळे या महाशयांनी माफी मागणारी एक पोस्ट टाकली आहे, त्या माफीनाम्यावर देखील लोकांनी आपला राग काढला आहे. कमेन्ट करणाऱ्याने थेट न्युज पोर्टलच्या एडिटरला जबाबदार ठरवले आहे.

नमस्ते लंडन आठवत असेल तर त्यात एक गोरा साहेब भारताबद्दल बोलतो, त्यावर आपला पंजाबदा पुत्तर अक्षय कुमार त्याला आपल्या  राष्ट्रीय भाषेत चांगलेच सुनावतो. अस्सल मसाल्यांच्या शोधात वास्को द गामा शेकडो वर्षांपूर्वी भारतात आला होता. आज भारतीय मसाल्यांना जगभरातून प्रचंड मागणी येते.

आज महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेला पहिल्यापासूनच आपण कसे वेगळे आहोत हे दाखवण्यात जास्त रस असतो. आपणच श्रेष्ठ आणि इतरांना तुच्छ लेखणे ही परंपरा अनेक वर्ष चालू आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?