तडकाफडकी बदली ते अचानक निलंबन, जितेंद्र शिंदे आहेत तरी कोण?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आज सरकारी अधिकाऱ्यांच्या, पोलिसांच्या तडफडकी बदली करणं हे आता नित्यनियमाचं झालं आहे, अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणावरून परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली, त्यानंतर सुरु झालेलं आरोप प्रत्यारोपाचे राजकरण आजही सुरु आहे.
परमबीर सिंग यांच्या जागी आलेले हेमंत नगराळे, हे वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहेत. मुंबईत लॉकडाऊन असताना देखील लोकं कारणास्तव हिंडत होते म्हणून गाडीच्या काचांवर रंगीत पट्ट्या बसवण्यात आल्या होत्या, त्या त्या रंगानुसार त्या गाडीची आवश्यकता कळायला हवी यासाठी अशी उपाययोजना सुरु केली होती.
अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड चर्चेत आले आहेत, जितेंद्र शिंदे यांना आज निलंबित करण्यात आलं आहे. अमिताभ यांच्या बॉडीगार्डच्या पगारवरून समाजमाध्यमात उलट सुलट चर्चा सुरु होत्याच. अमिताभ यांच्या बॉडीगार्डचा पगार तब्बल १२ लाख रुपये आहे, हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पगारावरून ते चर्चेत तर आलेच ,मात्र नंतर एका नव्या वादात ते अडकले होते..काय होता हा वाद….
कोण आहेत जिंतेद्र शिंदे?
अमिताभ बच्चन हे आज खुलेआम फिरू शकतात ते त्यांच्या बॉडीगार्डमुळे, चाहत्यांच्या गराड्यातून त्यांना सहीसलामत नेण्याचे अवघड काम त्याचे बॉडीगार्ड करत असतात. जिंतेद्र शिंदे हे 2015 ते 2021 पर्यंत बच्चनजींसोबत सावलीप्रमाणे होते. मात्र अतिरिक्त कमाई वरुन त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जिंतेद्र शिंदे हे एक पोलीस कॉन्स्टेबल आहेत जे २०१५ पासून बच्चनजींना सुरक्षा देत होते. देशातील बड्या मंडळींना अगदी नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत, सगळ्यांना सरकारकडून त्या त्या व्यक्तीच्या दर्जेनुसार त्यांना सुरक्षा दिली जाते. बच्चनजींना एक्स दर्जाची सुरक्षा दिली जात असल्याने त्यांच्या सोबत कायमच दोन कॉन्स्टेबल दिले जातात.
नेमका वाद काय होता?
सरकारी खात्यात काही अधिकाऱ्यांची दर पाच वर्षांनी बदली होती त्याच पद्धतीने पोलिसी खात्यात सुद्धा बदल्या होत असतात. जितेंद्र शिंदे हे पाच वर्षाहून अधिक वेळ बच्चनजींसोबत असल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिली होती.
वाद इथपर्यंतच नाही, तर शिंदे यांच्या पत्नीच्या नावाने एक सिक्युरिटी एजन्सी चालवतात. जी एजेन्सी सेलिब्रेटी लोकांना सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम करते. शिंदे यांची बदली केल्यानंतर त्यांना अतिरिक्त कमाईवरून चौकशीला सामोरे जावे लागले होते.
बदलीवरून दबाव?
बच्चनजींचे सर्वात विश्वासू बॉडीगार्ड म्हणून ओळख असलेल्या शिंदेंची बदली होऊ नये म्हणून पोलीस खात्यावर दबाव टाकला गेला होता, अशी चर्चादेखील झाली होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.