अमिताभ बच्चनच्या बॉडीगार्डची सॅलरी कित्येक कंपन्यांच्या CEO पेक्षाही जास्त…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
काही वर्षांपूर्वी सल्लू भाईचा बॉडीगार्ड हा सिनेमा आला होता, ज्यात एक वेगळीच प्रेमकथा आपल्याला पाहायला मिळाली. बॉलीवूडमध्ये तद्दन घिस्यापिट्या प्रेमकथांपेक्षा ही थोडी वेगळी होती. ज्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता.
सल्लू भाईने सिनेमात बॉडीगार्डची भूमिका केली होती, खऱ्या आयुष्यात सल्लू भाईचा बॉडीगार्ड शेरा हा कायमच चर्चेत असतो. सल्लू भाईचा हा बॉडीगार्ड सावलीसारखा त्याच्यासोबत असतो, सल्लू भाईचे इतर बॉडीगार्ड सुद्धा आपल्याला त्याच्या सिनेमात कधीतरी दिसून येतात.
बॉलीवूड स्टार्स काही कोटींमध्ये कमवत असतात, मग त्याच स्टार्सना चाहत्यांपासून बचाव करण्यासाठी बॉडीगार्डची गरज भासतेच. त्यामुळे त्यांचे पगार देखील काही लाखात असतात विश्वास बसत नाही ना? चला तर मग जाणून घेण्यात अशाच एका स्टारच्या बॉडीगार्ड बद्दल ….
ज्यांच्या नुसत्या आवाजाने संपूर्ण देश मंत्रमुग्ध होतो, ज्यांची ऊर्जा बघून आजचे अभिनेते सुद्धा मागे पडतील, असे अभिनयाचे शहेनशहा म्हणजे अमिताभ बच्चन. आज त्यांची लोकप्रियता देशात परदेशात आहे. त्यांची एक झलक बघण्यासाठी सत्तरच्या दशकापासून ते आताच्या काळात सुद्धा लोकं वेडे असतात.
अमिताभ या वयात सुद्धा कमवत आहे, यावरून अनेकांना अप्रूप वाटत असते. त्यांच्या कमाईवरून देखील ठिकठिकाणी चर्चा होत असते. मग बच्चनजींसाठी काम करणाऱ्या त्यांच्या बॉडीगार्डच्या पगावरून देखील सध्या जोरात चर्चा सुरु आहे.
अमिताभ यांचे बॉडीगार्ड कोण आहेत?
जितेंद्र शिंदे नावाचे बॉडीगार्ड गेली अनेकवर्ष बच्चनजींना फॅन्सच्या गराड्यातून सहीसलामत नेत असतात. मोठ्या जिकीरीचं काम असल्याने साहजिकच त्यांचा पगार जास्त असणार. त्यांचा मासिक पगार १२ लाख इतका आहे जो आज मोठमोठाल्या कंपन्यांच्या सीईओना सुद्धा नसेल. जितेंद्र शिंदे यांची स्वतःची एक सिक्युरिटी एजन्सी आहे.
–
हे ही वाचा – म्हणून तेव्हाच्या सर्वात मोठ्या दिग्दर्शकाने ‘सुपरस्टार काकाच्या’ कानाखाली लगावली!
–
अमिताभ बच्चनच नव्हे तर इतर बॉलीवूड स्टार्सच्या बॉडीगार्डचे पगार देखील काही लाखात आहेत. सलमान शाहरुखच्या बॉडीगार्डचा पगार तर बच्चनजींच्या बॉडीगार्डपेक्षा जास्त आहे.
मध्यंतरी अंबानींच्या ड्रायव्हरच्या पगाराबद्दल चर्चा सुरु होती, त्याचा पगार देखील काही लाखात आहे जो एखाद्या कंपनीच्या एखाद्या मॅनेजरपेक्षा जास्त आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.