स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही ‘मेनोपॉझ’चा त्रास होतो का? वाचा यामागची माहिती
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
माणसाचं आरोग्य ही त्याची सर्वात मोठी संपत्ती आहे, हे आपण मागच्या दोन वर्षात खूप अनुभवलं आहे. तुमची तब्येत चांगली असेल तर तुम्हाला जग चांगलं वाटेल, अन्यथा तुम्ही जगण्याचा आस्वाद घेऊ शकणार नाही हे स्पष्ट आहे.
स्वस्थ आरोग्य टिकवण्यासाठी आणि शरीरात होणारे बदल जाणून घेण्यासाठी काय करावं? हे समजून घेण्यासाठी सध्या प्रत्येकजण उत्सुक आहे.
तुलना करायची झाली तर, पुरुषांच्या आरोग्यापेक्षा महिलांच्या आरोग्याबद्दल जास्त नियतकालिके, वर्तमानपत्र आवश्यक ती माहिती देणारे सदर चालवत असतात असं म्हणता येईल. महिलांच्या शरीरात मासिक पाळीच्या दरम्यान होणारे शारीरिक आणि मानसिक बदल ही माहिती लोकांना कळण्याची गरज असल्याने सुद्धा असं चित्र असेल.
–
- मासिक पाळी बंद होताना नेमकं काय होतं हे समजून घेतल्यास हा काळ सुसह्य होईल
- मासिक पाळीच्या वेदना सुसह्य करणारे १० अत्यंत सोपे घरगुती उपाय नक्की ट्राय करा
–
चाळीशी आल्यानंतर महिलांमध्ये मासिक पाळी बंद होते ज्याला की ‘मेनोपॉझ’ म्हणतात, शरीरातील या बदलाला सामोरं जातांना महिलांच्या स्वभावात होणारे बदल त्यांच्या निकटवर्तीय लोकांना जाणवतात.
असाच बदल हा पुरुषांच्या शरीरात सुद्धा होत असतो, असं म्हंटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही किंवा हसू येईल.
वैज्ञानिक भाषेत हे सत्य आहे की, जे हार्मोनल बदल महिलांच्या शरीरात होत असतात तत्सम बदल हे पुरुषांच्या शरीरात सुद्धा होत असतात, पण त्याबद्दल फारसं कुठे बोललं जात नाही.
हे बदल त्याचे परिणाम प्रत्येक व्यक्तीला अनुभवावे लागतीलच असं नाहीये. यामध्ये ‘टेस्टोस्टेरॉन’चं प्रमाण कमी होत असतं. ‘मेनोपॉझ’मध्ये ‘टेस्टोस्टेरॉन’ तयार होणं हे अगदीच बंद होत असतं.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
नेमकं घडतं काय?
‘टेस्टोस्टेरॉन’ नावाचं एक हार्मोन आहे, जे तयार होण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये एका ठराविक वयानंतर कमी होत जातं. पण त्याचं स्पष्ट असं कोणतंही लक्षण दिसून येत नाही. टेस्टोस्टेरॉनच्या पुरुषांच्या शरीरातील कमी होण्याला ‘लेट-ऑनसेट हायपोगोनॅडीझम’ हे नाव देण्यात आलं आहे.
४० वयानंतर टेस्टोस्टेरॉनचं शरीरात तयार होण्याचं प्रमाण हे दरवर्षी १ टक्क्यांनी कमी होत असतं. हे सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असतं. काही लोकांमध्ये हे प्रमाण कमी किंवा अधिक सुद्धा असू शकतं.
रक्त तपासणी करतांना ‘टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण किती आहे?’ हे कळू शकतं. पण, ते फार क्वचित बघितलं आणि सांगितलं जातं. टेस्टोस्टेरॉनचं शरीरात तयार होण्याचं प्रमाण कमी होण्याची कारणं वय, इतर सुरू असलेली काही औषधं ही सुद्धा सांगितली जातात.
टेस्टेस्टेरॉन कमी होण्याची लक्षणं
ज्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होतं त्यांच्यात ही ठळक लक्षणं दिसून येतात :
१. संभोग करण्याची इच्छा आणि शक्ती कमी होणे
२. छातीत दुखणे
३. प्रतिकारशक्ती कमी होणे
४. हाडांची झीज होणे
५. घाम जास्त येणे
६. कोणत्याच कामात उत्साह न वाटणे, आत्मविश्वास कमी होणे
७. चित्त एकाग्र न होणे
८. झोप न लागणे किंवा खूपच झोप येणे (व्यक्तीनुसार)
डॉक्टर याबद्दल म्हणतात की, मेंदूतील ‘पिटुटरी ग्लँड’ने त्याचं हार्मोन तयार करण्याचं काम नियमित केलं नाही, तर असं होत असतं. वयस्कर व्यक्तींच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण हे ठराविक अंतराने तपासलं पाहिजे. हे प्रमाण खूपच कमी झालं तर किडनीचा त्रास होऊ शकतो किंवा लैगिक समस्या निर्माण होऊ शकतात.
–
- अनियमित पाळी ते प्रसुतीमधील अडथळे : महिलांनो, या रोगाला वेळीच आळा घाला
- प्रत्येक महिलेने भविष्यातील धोका टाळण्यासाठी या ७ आरोग्य चाचण्या केल्याच पाहिजेत
–
पुरुषांच्या शरीरातील ‘टेस्टोस्टेरॉन’चं प्रमाण वाढवण्यासाठी काय करता येईल? या विषयावर संशोधन सुरु आहे. ‘टेस्टोस्टेरॉन थेरपी’ नावाने एक उपचार पद्धती सुद्धा सुरू झाली आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य तपासणी नंतरच डॉक्टर यावर त्या त्या व्यक्तीनुसार औषधं सांगत असतात. कारण, प्रत्येक शरीराला सारखी उपचार पद्धती लागू पडत नसते. ‘टेस्टोस्टेरॉन थेरपी’ ही काही पुरुषांना सहन होत नाही आणि त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा त्रास सुद्धा होऊ शकतो.
म्हणून कोणीही यावर स्वतःच्या मनाने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार करू नयेत असं या विषयावरील तज्ञ नेहमीच सांगत असतात.
चाळीशी नंतर ‘टेस्टोस्टेरॉन’चं प्रमाण शरीरात नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण हे ४ उपाय नक्कीच करू शकतो:
१. सकस आहार घेणे
२. नियमित व्यायाम करणे, पायी चालणे.
३. नियमित ७-८ तास झोप घेणे
४. तुमच्या मनावरील ताण कमी ठेवणे.
हे साधे उपाय आपल्या जीवनशैलीत अमलात आणल्यावर तुमच्या तब्येतीच्या इतर तक्रारींपासून सुद्धा बचाव होईल हे नक्की. कोणत्याही परिस्थितीत तुमच्या डॉक्टर सोबत निसंकोच संवाद साधत राहणं आणि त्यांचा उपचार पूर्ण विश्वासात घेऊन माहिती देत राहणं हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.