' अणुहल्ला झाला तर अमेरिकन राष्ट्रपतीचे प्राण वाचवतील ही जबरदस्त विमाने! – InMarathi

अणुहल्ला झाला तर अमेरिकन राष्ट्रपतीचे प्राण वाचवतील ही जबरदस्त विमाने!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सध्या अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन देशांमधील वादाने सीमा ओलांडली आहे. दोन्ही देश निर्वाणीची भाषा करताना एकमेकांना अणू हल्ल्याच्या धमक्या देत आहेत. या नुसत्या पोकळ धमक्याच ठराव्यात अशी आशा बाळगूया, कारण या घडीला तिसरे विश्वयुद्ध जगाला परवडण्यासारखे नाही. अमेरिका देखील असे कोणते अविचारी पाउल उचलणार नाही याची खात्री आहे, पण उत्तर कोरियाचा मात्र भरवसा देता येत नाही. या देशाच मस्तक फिरलं तर थेट अमेरिकेवर अणुहल्ला करायला देखील हा देश मागे पुढे पाहणार नाही, असो पण तुमच्या मनात कधी विचार आलाय का, समजा जागतिक महासत्ता अमेरिकेवर अणुहल्ला झाला तर त्याचे सर्वेसर्वा अर्थात राष्ट्रपती यांची सहीसलामत सुटका कशी होईल? अणुहल्ला सोडा, सध्याही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या इस्लाम विरोधी भूमिकेमुळे अनेक दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत, अश्या वेळेस देशांतर्गत किंवा देशाबाहेर यात्रा करताना त्यांच्या जीवाची काळजी कशी घेतली जात असेल?

donald-trump-marathipizza
storypick.com

 जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राच्या महत्त्वपूर्ण व्यक्तीच्या सिक्युरिटीचू मुख्य धुरा सांभाळतात E-4B बोइंग विमाने!

जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती आपल्या एयर फोर्स वन विमानामध्ये बसून दुसऱ्या देशांच्या दौऱ्यासाठी निघतात, तेव्हा त्यांना नेहमी चार E-4B बोइंग विमाने फॉलो करतात. अमेरिकन राष्ट्रपतीवर कोणत्याही प्रकारे हवाई हल्ल्याचा प्रयत्न झाला तर अश्यावेळेस ही चार E-4B बोइंग विमाने फ्लाईंग पेंटागन सारखे काम करतील.

जर एखाद्या देशाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले तर हीच E-4B बोइंग विमाने सर्वप्रथम त्या युद्धाला तोंड देण्यासाठी पुढे सरसावतील. अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही विमाने म्हणजे अमेरिकन राष्ट्रपतींच्या सुरक्षेचा कणा म्हणावी लागतील.

या विमानांची खासियत म्हणजे त्यांना फ्लाईटमध्येच रीफ्युल करण्याची सुविधा आहे. तब्बल ३५.४ तास ही विमाने आकाशात कार्यरत राहू शकतात.

E4b-marathipizza
देशावर किंवा अमेरिकन राष्ट्रपतींवर कोणतेही संकट आले तर ही विमाने सर्व सूत्र आपल्या हाती घेऊन एखाद्या कमांड सेंटर प्रमाणे काम करतील.

७० च्या दशकापासून अमेरिकन संरक्षण खाते अश्या प्रकारच्या विमानांचा वापर करीत आहे. शीत युद्धामध्ये देखील या विमानांनी अमेरिकेसाठी मोलाची भूमिका बजावली होती. ही विमाने कोणत्याही वेळी कोणाशीही संपर्क साधू शकतात. अणुहल्ला झाला तर त्यामधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नोपल्सचा देखील या विमानांवर काहीही उपयोग होणार नाही.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा राष्ट्रपती अमेरिकेमध्ये असतात, तेव्हा एक E-4B विमान २४ तास चालू असते. म्हणजे कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये राष्ट्रपतींना तेथून बाहेर काढता यावे म्हणून एका विमानाचे एक इंजिन रोज २४ तास सुरु असते.

e-4b-marathipizza01
beforeitsnews.com

अशी आहे अगदी जगातील बेस्ट सिक्युरिटी अमेरिकन राष्ट्रपतींच्या बचावासाठी!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?