' मोदी पनौती आहेत, PM पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर! जाणून घ्या – InMarathi

मोदी पनौती आहेत, PM पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर! जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपल्या मित्रमंडळींमध्ये असा एक नमुना असतोच ज्याला पनवती किंवा जिभेवर काळा तीळ असणारा असेच चिडवले जाते. त्याने एखादी गोष्ट बोलून दाखवली आणि नेमकी ती घडलीच की मग संपलंच, त्याला शिव्या घालायला आपण मोकळे…

भारताची एखादी क्रिकेटची मॅच चालू असेल तर आपलेच काही भूमिपुत्र प्रतिस्पर्ध्याच्या बाजूने असतात आणि आपले खेळाडू कसे चुकीचे खेळतात यावर टिपणी देत असतात.

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ऑलिम्पिकची, चानू, सिंधू यांनी पदकं मिळवून भारताचं नाव तर काढलाच त्याचबरोबरीने भारतीयांनी देखील त्यांचं कौतुक केलं आहे.

ऑलिम्पिकमध्ये सुद्धा महिलांचाच डंका पेटताना दिसून येत आहे, कारण महिला हॉकी संघाने बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाच्या महिला हॉकी संघाला हरवले मात्र आपली पुरुष मंडळी मात्र मागे पडली. बेल्जियमच्या संघाने आपल्याला हरवले.

चार दशकानंतर भारताला सुवर्ण पदक जिंकायची संधी होती मात्र बेल्जीयमकडून पराभव स्वीकरावा लागला, अनेकजणांनी मॅचमधील अम्पायरला दोषी ठरवले. मात्र भारतात परिस्थिती वेगळी आहे भारतातील काही मंडळी या पराभवच खापर खुद्द देशाच्या पंतप्रधानांवर फोडत आहेत. नक्की काय आहे भानगड जाणून घेऊयात

 

modi meme 8 inmarathi

 

पनौती ट्रेंडची सुरवात खरं तर मोदींच्या या ट्विटमुळे झाली. त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा देणारे एक ट्विट टाकले आणि तिकडे संघाने मॅच हरली आणि लगेचच नेटकरी ट्रोल करायला लागले.

 

modi meme 1 inmarathi

 

पुरुषांची मॅच तर झालीच मात्र आता महिलांची मॅच बघू नका असा सल्ला एका महिलाच त्यांना देत आहे.

 

modi meme 2 inmarathi

 

नेटकरी कधीकधी थेट टीका करतात तर कधी कधी उपहासात्मक टीका करतात.

 

modi meme 4 inmarathi

 

आप क्रोनॉलॉजी समझीये हा अमित शहांच गाजलेले वाक्य एकाने वापरून मोदींनी ट्रोल केलेले आहे.

 

modi meme 5 inmarathi

 

चांद्रयानच्या अपयशी मोहिमेचा संदर्भ घेऊन आणि आताच्या पराभवच असं एक मिम ट्विट केलं आहे.

 

modi meme 6 inmarathi

हे ही वाचा – केआरकेची भविष्यवाणी, ‘नरेंद्र मोदी होणार क्लीन बोल्ड ‘!! वाचा

‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासूनच आपण अनेक खेळातील सामने हरलो आहोत असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. खेळात हार जीत तर होत असतेच जिंकलो तर डोक्यावर घेणारे आपणच असतो आणि हरल्यावर अपयशच खापर फोडायला कोणीतरी शोधत असतोच.

आज नरेंद्र मोदीं अनेक कारणांमुळे कायमच चर्चेत असतात. बंगाल मध्ये झालेल्या निवडणुकांवरून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. आज वाढती महागाई, पेट्रोलचे भाव, बेरोजगारी या विषयवार ते काहीच का बोलत नाहीत हा प्रश्न अगदी सामान्यांपासून ते विरोधकांना पडला आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?