' “मुंडक्यांचं जतन” करण्याच्या गूढ, भयंकर आदिवासी प्रथेबद्दल… – InMarathi

“मुंडक्यांचं जतन” करण्याच्या गूढ, भयंकर आदिवासी प्रथेबद्दल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणसाच्या मृत्यूनंतर नेत्रदान, अवयवदान वगैरे सोडलं तर त्याच्या शरीराचा काहीच उपयोग नसतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. शरीरात आत्मा आहे तोपर्यंत ते एक मंदिर आहे आणि आत्मा नसेल तो फक्त मूर्ती नसलेला एक गाभारा आहे. मृत झालेल्या शरीराला अग्नि देणे किंवा पुरणे असे साधारणपणे दोन प्रकार आपल्याला माहीत आहेत.

 

indian funeral inmarathi

 

‘ऐकावे ते नवल’ या म्हणीप्रमाणे न्यूझीलंड मधील आदिवासी लोकांमध्ये माओरी ही एक अशी जमात होती जे मृत्यूनंतर माणसाचा फक्त चेहरा जपून ठेवायचे, त्यावर ‘मोको’ नावाची चित्रकला करायचे, प्रक्रिया करायचे आणि मग तो चेहरा नंतर चक्क विकायचे हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. या पूर्ण प्रथेला ‘मोकोमोकाई’ असं नाव देण्यात आलं होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काय आहे हे प्रकरण ? कुतूहल म्हणून फक्त जाणून घेऊयात.

१९ व्या शतकात न्यूझीलंडमधील आदिवासी लोकात आजच्या टॅटू पद्धतीसारखी चेहऱ्यावर ‘मोको’ चित्रकला करण्याची प्रचंड आवड निर्माण झाली होती. माओरी प्रकारच्या लोकांमध्ये मोको चित्रकला करणे म्हणजे एक ‘हाय स्टेटस’ समजलं जायचं.

 

mokomokai inmarathi

 

सुरुवातीला केवळ पुरुषांमध्ये प्रचलित असलेली ही प्रथा नंतर स्त्रियांनीसुद्धा अवलंबली होती. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ‘मोको’ चित्रकला असेल त्याचा चेहरा हा त्याच्या मृत्यूनंतर जतन केला जाईल अशी प्रथा त्या काळात न्यूझीलंड मधील माओरी आदिवासी जमातीत प्रसिद्ध होती.

‘मोकोमोकाई’ या प्रकारात मृत शरीराचा चेहरा जतन करतांना त्याचे डोळे, मेंदू हे सुद्धा काढून घेतलं जायचं. उरलेला चेहरा हा गरम पाण्यात उकळून घेतला जायचा. सुर्यप्रकाशात तो चेहरा वाळवल्यानंतर त्यावर ‘शार्क’ तेलाचा वापर केला जायचा. मग जो चेहरा तयार व्हायचा त्याला ‘मोकोमोकाई’ हे नाव दिलं जायचं.

घरातील ‘शो-केस’ मध्ये एखादी वस्तू ठेवतात तसे कित्येक लोक आपल्या निकटवर्तीयांचे चेहरे जतन करून ठेवायचे आणि त्यांच्या सणांना हे चेहरे पूजेत ठेवायचे.

माओरी आदिवासी जमातीची ही प्रथा कित्येक शतकांपासून चालत आलेली प्रथा होती.

आपल्या निकटवर्तीय लोकांसाठी सुरू केलेली ही प्रथा कालांतराने शत्रूंसाठी सुद्धा वापरली जाऊ लागली. ज्यांनी तुम्हाला जास्त त्रास दिला त्याचा चेहरा एखादी ट्रॉफी म्हणून जतन करून ठेवायचा, काही चेहरे युरोपियन लोकांना त्यांचा अजून अपमान करण्यासाठी विकायचा अशी विचित्र पद्धत माओरी लोकांनी अवलंबली होती.

mokomokai face inmarathi

 

आदिवासी लोकांमध्ये जर कोणत्या कारणांमुळे युद्ध होणार असेल तर त्या आधीच ‘मोकोमोकाई’ च्या प्रथेवरून आर्थिक बोलणी आधी केली जायची. “जितके शत्रू मरतील तितके आम्हाला शीर मिळतील” अशी दोन्ही संघांकडून बोली असायची.

१८०७ ते १८४२ या काळात झालेल्या माओरी समूहांमध्ये झालेल्या ‘मस्केट लढाई’ मध्ये युरोपियन गोळ्यांचा वापर करण्यात आल्याची नोंद आहे.

या लढाईत मृत पावलेल्या सैनिकांच्या, युद्धानंतर कैदेत असलेल्या लोकांच्या चेहऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ‘मोकोमोकाई’ चा वापर करण्यात आला होता. या चेहऱ्यांवर मोको चित्रकलेसोबतच इतरही टॅटूचं  काम केलं जायचं आणि त्या चेहऱ्यांना विकलं गेलं होतं.

१८३१ पर्यंत हा चेहऱ्यांचा व्यापार हा न्यूझीलंड मध्ये सुरळीत सुरू होता. पण, त्यावर्षी न्यू साऊथ वेल्स च्या नवनिर्वाचित राज्यपाल ‘जनरल सर राल्फ’ यांनी हा सर्व व्यापार अवैध ठरवला आणि त्यावर बंदी आणली. ही बंदी पूर्णपणे आमलात आणण्यासाठी १८४० चं वर्ष उजाडावं लागलं होतं.

१८४० मध्ये ‘वैतांगी’ हा करार आमलात आला, न्यूझीलंड ला ब्रिटिश कॉलनीचा दर्जा देण्यात आला आणि ‘मोकोमोकाई’ ही प्रथा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश आदिवासी लोकांना देण्यात आले.

१८६० मध्ये मेजर जनरल होराशीयो गॉर्डन रॉबली हे ब्रिटिश ऑफिसर न्यूझीलंड मध्ये रहात होते. न्युझीलंड मधील युद्धांच्या वेळी त्यांनी न्यूझीलंड मध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचं काम केलं होतं. आपल्या कामासोबतच मेजर जनरल यांना कलेची, ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवण्याची सुद्धा आवड होती.

 

mokomokai robert inmarathi

‘टोई मोको’ चा सर्वात मोठा संचय मेजर जनरल यांनी जतन करून ठेवला होता. रॉबली यांनी ‘मोकोमोकाई’ चा मोठा संचय करण्याचा निर्णय घेतला होता. रॉबली यांच्याकडे त्या काळात ३५ चेहऱ्यांचा संचय होता.

शरीरावर टॅटू काढणे आणि ‘इथनॉलॉजी’ म्हणजेच विविध लोकांची माहिती गोळा करणे, त्यांच्यातील साम्य ओळखणे हा त्यांचा छंद होता. चित्रकलेची आवड असलेले रॉबली हे स्वतः एक उत्तम चित्रकार आणि लेखक सुद्धा होते.

१८९६ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर रॉबली यांनी ‘माओरी टॅटूइंग’ नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकात त्यांनी माओरी टॅटू आणि ‘मोकोमोकाई’ या प्रथेबद्दल लिहून ठेवलं आहे.

१९०८ मध्ये रॉबली यांनी आपलं ३५ चेहऱ्यांचं कलेक्शन न्यूझीलंड सरकार ला विकण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन न्यूझीलंड सरकारने हे कलेक्शन विकत घेण्यासाठी असमर्थता दर्शवली.

रॉबली यांनी तेव्हा त्यांचा हा संग्रह अमेरिकेच्या ‘नॅचरल हिस्ट्री’ च्या न्यूयॉर्क ऑफिस ला १२५० युएस डॉलर्स मध्ये विकला होता. २०१४ मध्ये हे कलेक्शन अमेरिकेने न्यूझीलंडला परत केल्याची या संबंधातील शेवटची बातमी प्रसारीत झाली होती.

काही वर्षांपूर्वी न्यूझीलंड मध्ये आणि जगभरात असलेला ‘मोकोमोकाई’ च्या संग्रहाचं लोकार्पण होण्याच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यात आले होते.

‘मोको’ म्हणजे डोकं आणि मोराई म्हणजे मान देणं अश्या अर्थाने सुरू झालेली ही प्रथा काळाच्या पडद्याआड गेली हे मानवतेसाठी चांगलं झालं अशी प्रतिक्रिया न्यूझीलंड चे लोक देत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?