' ताजमहाल “अस्सल” नाहीच! आश्चर्य वाटेल असा अज्ञात इतिहास! – InMarathi

ताजमहाल “अस्सल” नाहीच! आश्चर्य वाटेल असा अज्ञात इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगातील ७ आश्चर्यांपैकी एक असलेलं, यमुना तिरी वसलेलं ताज महाल, एक प्रेमाची निशाणी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. शाहजहानने आपल्या सर्वात लाडक्या पत्नीच्या, मुमताज महालाच्या आठवणीत हा मकबरा बांधला होता ते आपण सगळे लहानपणापासून ऐकूनच आहोत.

ताजमहल आपल्या डोळे दीपवणाऱ्या सौंदर्यासाठी जगभरातील पर्यटकांचं आकर्षण आहे. ताजच्या निर्मितीसाठी केल्या गेलेल्या वास्तुकलेचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा दुरून दुरून अभ्यासक येत असतात.

त्यात वापरले गेलेले पांढरेशुभ्र संगमरवराचे दगड, त्यावर केलं गेलेलं नाजूक कोरिवकाम एखाद्या पैठणीवर केलेल्या बारीक आणि कठीण नक्षीकामाची आठवण करून देतं.

 

taj-mahal-marathipizza01

 

या ताजमहालात, लाखो खऱ्या हिऱ्यांच्या व खाड्यांचा वापर करण्यात आला होता. पण ब्रिटिशांच्या काळात ते सगळं आपल्याकडून लुटून नेलं गेलं. पण तरीही ताजच्या सौंदर्यात अजिबात घट झालेली नाही. इतकी सुंदर कलाकृती घडवायला कुठून ना कुठून प्रेरणा घ्यावीच लागली असेल नाही? हो, ताजमहल बांधताना सुद्धा ती घेण्यात आलीच होती.

मूळ संकल्पनेला विस्तारित करून नंतर जे तयार झालं ते ताजमहल. ताजमहल बांधण्यासाठी, त्याकाळातील वास्तुविद्याविशारदांनी २ अशाच कलाकृतींवरून प्रेरित होऊन ताजमहल चं डिझाईन तयार केलं होतं. कोणत्या आहेत त्या दोन वास्तू ते पाहुया.

ताजमहल निर्मितीच्या कमीत कमी ५० वर्ष आधी, दिल्लीत रहीम खान, आणि मुघल बादशाह हुमायू यांचे मकबरे बांधले गेले होते. समोर २ घुमट, मिनार, ओट्यावर बांधलेले मकबरे, अशा अनेक सामान गोष्टी ताजमहल मध्ये सुद्धा आढळून येतात.

हे दोन्ही मकबरे दिल्लीत आहेत. यापैकी बादशाह हुमायूचा मकबरा एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातोच, पण रहीमच्या माकबऱ्याची कुठे काही फारशी चर्चा होताना दिसत नाही. कोण रहीम आणि हा मकबरा इतका का महत्वाचा आहे, हा प्रश्न पडणं साहजिक आहे.

अब्दुल रहीम खान-ए-खाना, हे तेच रहीम आहेत ज्यांचे दोहे आपण शाळेत शिकलो आहोत, आपल्या सगळ्यांनाच ते लहान पाणीतोंड पाठ असतीलच. पण संत रहीम, ह्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांची एक वेगळी ओळख आहे. आणि अनेकांना ती माहितीच नाहीये.

 

abdul 1 inmarathi

 

रहीम हे बादशाह अकबरचे मानलेले पुत्र होते. रहीम चे वडील, बैरम खान हे बादशाह अकबराच्या सैन्यातील एक खास सेनापती होते. बादशाह हुमायूच्या मृत्यनंतर, अकबर चं पालन पोषण, प्रशिक्षण सगळं बैरम खान यांनीच केलं. त्यांचं राज्य सुद्धा बैरम खान यांनीच सांभाळलं व विस्तृत केलं. अकबर यांना “खान बाबा” म्हणत असे.

याच बैरम खान ने, एका लढाईत आपले प्राण गमावले होते, व यांचेच सुपुत्र होते अब्दुल रहीम खान, उर्फ रहीम खान-ए-खाना. रहीम, एक निस्सीम कृष्ण भक्त असून, त्यांना अनेक भाषांचं ज्ञान होतं.

 

shree krishna flute inmarathi

 

संस्कृत, फारसी, उर्दू, हिंदी अशा अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. याचबरोबर, ते राजकारण, समाजकारण, रणकौशल्य ह्या सगळ्यात पारंगत होते. असं म्हणतात, अकबर बादशाह ने अनेक युद्ध हे राहिमच्याच नेतृतावत जिंकले आहेत.

रहीमला लहानपणापासूनच वाचनाचा, लिखाणाचा छंद होता. त्यांनी अनेक कविता आणि गोष्टींची रचना केली आहे. रहीम हे अकबरचे सगळ्यात लाडके होते. ह्याच सगळ्या गुण- कौशल्यांमुळे रहीमने अकबरच्या दरबारातील नावरत्नांनपैकी एक होते.

 

rahim makbara inmarathi

 

रहीमने आपल्या पत्नीच्या म्हणजे माह बानो बेगमच्या मृत्यू पश्चात, १५९८ साली, तिच्या आठवणीत बांधला होता. मुघल राजवटीत, कोणत्या स्त्रीसाठी बांधण्यात आलेल्या हा पाहिला मकबरा होता. आजपर्यंत ताजमहलला प्रेमाची निशाणी म्हणून आपण सगळे ओळखत आलोय. पण त्याच्या ही ५० वर्ष आधी, खान-ए-खाना रहीम यांनी हे काम केलं होतं.

हा मकबरा बादशाह हुमायूच्याच शेजारी बांधण्यात आला होता. त्याकाळात, अत्यंत महागडे व क्वचितच मिळणारे दगड जसे लाल वाळू पासून बनलेले दगड व मौल्यवान रत्न, त्या माकबऱ्याच्या बांधकामात वापरण्यात आले होते.

 

rahim akbara 1 inmarathi

हे ही वाचा – ब्रिटिश जुलूम; भारतात नजरकैदेत प्राण सोडलेल्या पतीला, ती मायदेशी नेऊ शकली नाही

अकबरच्या निधना नंतर मात्र रहीमप्रति असलेली, मुघल सत्तेचं वर्तन बदललं. अकबरचा मुलगा जहांगीर, याला गादीवर बसण्यास रहीमने विरोध दर्शविला म्हणून त्याच्या दोन्ही मुलांचा जहांगीरने खून केला. आणि काही काळातच, म्हणजे १६२७ साली रहीमचं सुद्धा निधन झालं.

तेव्हा त्यांना सुद्धा ह्याच माकबऱ्यात दफन करण्यात आलं. तेव्हापासून हा मकबरा, माह बानोच्या नावाने ओळखला जात नसून, रहीमच्या नावाने ओळखला जाऊ लागला.

पुढे तब्बल १५० वर्षांनंतर, दिल्लीच्या सफदरजंग येथे, अवधचे नवाब अबुल मसूर मिर्जा अली खान उर्फ सफदरजंग यांचा मकबरा बांधण्याचे काम सुरु असताना, त्याला लागणारे लाल वाळूचे दगड कमी पडले.

तिथे दगड पुरवण्यासाठी, सौजुदुल्लाह खान म्हणजे, सफदरजंग यांचे पुत्र, यांनी रहीमच्या माकबऱ्याचे दगड काढून आणायचे आदेश दिले होते.

आधीच जीर्ण झालेला मकबरा आणखीनच खराब झाला. २०१४ पासून, आगा खां ट्रस्ट फॉर कल्चर आणि आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ह्या दोन संस्था मिळून खान-ए-खाना रहिमच्या माकबऱ्याच्या जिर्णोद्धाराचं काम करतायत.

 

rahim 2 inmarathi

 

खान-ए-खाना रहीमचा मकबरा, बादशाह हुमायूचा मकबरा आणि ताज महाल यांच्यात भरपूर साम्य आहे. ताजच स्ट्रक्चर असू देत, किंवा त्यात वापरली जाणारी सामग्री, सगळंच जवळपास ह्या दोन माकबऱ्यांसारखं आहे. फक्त फरक इतका आहे, की ताज महल ही आकाराने भरपूर मोठी, आणि व्यवस्थित संवर्धन झालेली अशी वास्तू आहे.

मध्यंतरी, तिथे जवळ स्थापित झालेल्या कारखान्यामुळे ताजचा चंद्रासारखा पांढरा रंग पिवळसर होत होता, पण आता तो कारखाना दुसरीकडे हलवण्यात आला आहे. ताज आपल्या नावाप्रमाणेच भारताचं ताज बनून, पूर्ण जगात आपली चकाकी पसरवतंय.

ताजमहालला भेट दिल्यावर तिथून मिळणारा अनुभव, त्याच अवाढव्य आणि डोळ्यात कायमचं भरणारं सौंदर्य हे आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातात.

तुम्ही ताजला भेट दिली आहे का? नसेल, तर लवकरात लवकर भेट द्या व त्याचं सौंदर्य आपल्या स्मृतीत कायमचं टिपून ठेवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?