स्वभाव आणि होणाऱ्या आजाराचा संबंध असतो का? बघा १४ फोटो, मित्रालाही सांगा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
स्वभावाचा आणि आजारांचा खरंच संबध आहे? हा प्रश्न आपल्या मनात कधीतरी डोकावतो. अनेकदा डॉक्टरांकडूनही आपल्याला आनंदी, सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुम्हाला वाटत असेल की आजार आणि स्वभाव, मनातील विचार, त्याप्रमाणे होणारी कृती यांचा संबंध नाही, तर तुम्ही चुकताय.
मनाचा, भावनेचा, विचारांचा, स्वभावाचा आरोग्यावर कसा परिणाम होतो? कुठली वृत्ती काशी घातक ठरू शकते? काही प्रकारच्या वागणुकी आरोग्याला कशा घातक ठरतात? त्यावर काय तोडगे आहेत? चला तर, जाणून घेऊयात…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
१. अभिमान आणि अहंकार यात एक सूक्ष्म रेषा असते, हे सगळ्यात आधी लक्षात घ्यावे.
२. हट्टीपणा फक्त लहान मुलेच करतात, असे नाही. तरुण, प्रौढ देखील हट्टीपणा करतात. कुटुंब सदस्य म्हणून अश्या वृत्तीला प्रोत्साहन देऊ नका.
३. चिडचिडेपणा हे प्रगती खुंटण्याचे खूप मोठे लक्षण आहे. अती रागामुळे सौहार्दाचे संबंध कायमस्वरूपी संपुष्टात येऊ शकतात.
४. काही गोष्टी ‘कृष्णार्पणमस्तू’ म्हणून सोडून द्यायच्या असतात, फार ताण घेऊन आयुष्य कमी करण्यात काय साध्य? वाचन करा, मित्रांशी बोला. पण काही झाले तरी ताण-तणावापासून दूर रहा.
–
हे ही वाचा – अतिविचार एक धोकादायक सवय; सावध व्हा, मनःशांती मिळवण्याचे ८ उपाय!
–
५. अज्ञान, माहिती आणि अभ्यासाचा अभाव, कल्पनाशक्तीचा गैरवापर, निश्चित, अढळ ध्येय नसणे ही भीतीची काही मुख्य कारणे आहेत. श्वसनावर योग्य ताबा हा देखील एक भीती घालवण्याचा रामबाण उपाय आहे.
६. कपटीपणा एक दिवस तुम्हाला स्वतःच्याच जाळ्यात अडकवतो. कपटी वृत्ती म्हणजे बुद्धीचा गंज. म्हणून वेळीच सावध असावं.
७. ‘मी ही गोष्ट करु शकतो’ हा झाला कॉन्फिडन्स आणि ‘फक्त मीच’ ही गोष्ट करु शकतो हा झाला ओव्हर कॉन्फिडन्स. मला सगळं सगळं कळतं म्हणून आपण नवीन गोष्टी शिकण्यापासून वंचित राहतो.
८. नैराश्य, एकटेपणा, व्यक्त होण्यासाठी जवळची व्यक्ती नसणे, स्वतःच्या आयुष्याची सतत दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करणे, न्यूनगंड, या कारणांमुळे बरेच जण मनातल्या भावना/त्रास/दुःख मनातच ठेवतात.
९. सध्याचे युग फास्ट फूडचे आहे, आपल्याला सगळं लवकरात लवकर हवं असतं. परंतु धीराने घेण्याच्या गोष्टी धिरानेच घ्याव्या लागतात.
१०. स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त आजार होतात कारण त्यांना काही द्यायची इच्छा नसते त्यामुळे शरीराला नको असलेली घातक द्रव्ये नीट बाहेर टाकली जात नाहीत पचन नीट होत नाही.
११. शांत मन म्हणजे उत्तम मानसिक व शारीरिक आरोग्याची हमी!
१२. स्मित हास्य असो वा सातमजली हास्य… ते आरोग्याला पोषक असं औषध असतं.
–
हे ही वाचा – नैराश्य, बॅड-मुड मधून बाहेर येण्यासाठी हे मस्त खाद्यपदार्थ खा आणि आनंदी राहा!
–
१३. मानवी मनाला कायम ऐकून घेणारा कान हवा असतो, तो कान व्हा. ऐकून घ्या… आधार द्या…
१४. रात्र कितीही अंधारमय असली तरी सूर्य उगवणारच… हा विश्वासच माणसाला स्फूर्ती देतो… सोनेरी किरणे आयुष्य सोनेरी करतील, विश्वास ठेवा.
तर मग आता आपल्या रागावर, विचारांवर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, हट्टीपणावर विजय मिळवा. हसत-खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट रहा म्हणजे निरोगी रहाल. तुम्ही निरोगी रहाल तर सभोवतालही सकारात्मक होईल, निकोप होईल.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.