पैसे घेऊन फक्त ‘गुन्हेगारांनाच’ नागरिकत्व विकणारा देश! वाचा.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रत्येक देशाची नागरिकत्व प्रदान करण्याची काही ना काही पद्धत असते. काही देशांमध्ये तुम्हाला ७ ते ८ वर्षे वास्तव्य केल्यावर नागरिकत्व मिळते किंवा त्या देशाच्या मूळ निवास्याशी लग्न करूनही ती मिळते. पण जगात असेही काही देश आहेत जिथे पैसे देऊन तुम्ही नागरिकत्व विकत घेऊ शकता.
ह्याला इंग्रजीत CBI म्हणजेच Citizenship by Investment असे म्हणतात. म्हणजे पैसे भरून तुम्ही काही काळासाठी त्या देशाचे नागरिक होता.
तिथल्या नागरिकांना ज्या सवलती आहेत, जसे – टॅक्स माफी, व्यवसाय आणि गुंतवणूक करण्यास कमी प्रतिबंध आणि नियम, ह्या देशाचे नागरिक असल्यामुळे इतर मित्र देशात विझा शिवाय प्रवास, मोफत उपचार, मोफत शिक्षण इत्यादी.
अनेक देश पैसे घेऊन नाकरिकत्व विकतात. ह्याचं कारण देशांची आर्थिक सुबत्ता हे देखील आहे. अनेक देशांमध्ये लोकसंख्या कमी असल्याने हा उपाय तिथल्या सरकारांनी अवलंबला आहे तर काही देशांची अर्थव्यवस्था बुडीत असल्याने ह्या मार्गाने त्यांना जावे लागते आहे.
ह्या प्रकारे नागरीकता देण्यास काहीच हरकत नाही, पण आपण कोणाला नागरिकत्व देतो आहे हे सुद्धा ह्या देशांनी तपासून बघायला हवे. क्रिमिनल रेकॉर्ड असलेले, जगभरात कुप्रसिद्ध असलेले, तडीपार कवलेल्या गुन्हेगारांना नागरिकत्व तर देत नाही आहोत ना हे देसखील तपासणे गरजेचे आहे.
पण एक देश ह्या सगळ्याच नैतिकतेच्या सीमा ओलांडुन आपल्याकडे आलेल्या कोणालाही नागरीकता प्रदान करत सुटला आहे. आणि सध्या त्याची चर्चा जगभरात होते आहे. या देशाचं नाव आहे वैनुआटू.
वरील चित्रात, ही मोत्यांसारखी दिसणारी जी बेटं आहेत ह्या ८० बेटांना मिळून बनतो वैनुआटू. पॅसिफिक महासागरात असलेल्या ह्या देशाचं क्षेत्रफळ हे ११०० किलोमीटर परिसरात पसरलं असुन, इथली लोकसंख्या केवळ ३ लाख इतकी आहे.
ह्या देशाची राजधानी पोर्ट विला आहे. आत्ता हा देश एक लोकतंत्र असला तरी आधी १९८० पर्यंत यावर ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया हे दोन देश मिळून राज्य करत होते. ह्या देशाचं शासन ७४ वर्षे वैनुआटू वर होतं.
१९८० साली ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून तिथे Non Executive Presidency ही शासन पद्धती वापरण्यात आली. या पद्धतीनुसार देशाचा पहिला नागरिक असल्याचा मान हा राष्ट्रपतीला दिला गेला असून, देश चालवण्याची आणि मोठे निर्णय घेण्याची सगळी सत्ता आणि सूत्रं प्रधानमंत्रीकडे दिलेली असतात.
पार्लमेंटमधील मंत्री आपला प्रधानमंत्री निवडतात तर प्रधानमंत्री आपले मंत्री मंडळ निश्चित करतात.
कोरोना महामारीने सध्या सगळे देश त्रस्त असताना, त्यांच्या अर्थव्यवस्था ढासळत चाललेल्या असताना मात्र वैनुआटूची अर्थव्यवस्था बळकट होत गेली.
सगळे देश तोट्यात असताना वैनुआटूने आपण सरप्लसमध्ये असल्याचं सांगितलं. ह्यामागील कारण पाहता त्यांच्या अर्थार्जनात ४२% वाटा हा “गोल्डन सिटीझनशीप” स्कीमचा असल्याचं लक्षात आलं आहे.
ह्या स्कीम नुसार, कोणालाही ह्या देशाचं नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी १ ते १.५ करोड रुपये सरकारकडे जमा करावे लागतात मग त्याला ६ ते ८ आठवड्यातच वैनुआटूचं नागरिकत्व प्राप्त होतं. तेही कायमचं!
हे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी कोणती व्यक्ती अर्ज करते आहे ह्याचं त्या देशाला काहीच देणं घेणं नसतं. त्यांची मोडस ओप्रेंडीच अशी आहे की त्यांना फक्त पैसे घेण्याशी सबंध असतो. व्यक्तीचा क्रिमिनल रेकॉर्ड काय, जागतिक दर्जा काय हे काहीच न बघता त्याला नागरिकत्व दिले जाते.
२०२० साली ह्या देशाने तब्बल २००० हुन अधिक लोकांना सिटीझनशीप दिल्याचं सांगितलं आहे. ह्या लोकांमध्ये जगभरातून पळून आलेले, इंटरपोल, इतर देशांचे पोलीस मागावर असलेले गुंड आणि क्रिमीनल्स ह्यांचा पहिला क्रमांक आहे. काही उदाहरणे बघूया –
१. काजी भावंडं –
रईस काजी आणि अमीर काजी हे मूळ आफ्रिकेचे नागरिक आहेत. तिथे त्यांनी आफ्रिक्रीप्टो नावाचं क्रीप्टो करन्सीमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करण्याचं एक पोर्टल काढलं. त्यात अनेक लोकांनी क्रीप्टो करन्सी टोकन्स घेऊन आपले पैसे गुंतवले.
ही रक्कम जवळपास २७ हजार करोड इतकी होती. मग २०२१ च्या सुरुवातीला ह्या भावंडांनी आपलं पोर्टल हॅक झाल्याचं सांगितलं आणि सगळे पैसे हॅकर्स घेऊन फरार झाले असं गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सांगितलं.
त्या लोकांच्या म्हणण्यानुसार काजी भावंडं हे खोटं बोलत आहेत व आमचे पैसे ह्यांनीच लुबाडले असा त्यांनी आरोप केला. २०२० सालीच ह्या काजी भावंडांनी वैनुआटूचं नागरिकत्व विकत घेतल्याचं समोर आलं आहे.
२. हय्याम गरिपोगलु –
तुर्कीचा राहणारा हय्याम गरिपोगलु हा तिथला ‘सुमेर बैंकेचा’ मालक व एक उद्योगपती होता. २०१३ साली हय्यामला अरबो रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी दोषी करार करून शिक्षा ठोठावण्यात आली होती. ह्या व्यतिरिक्त त्याच्यावर अनेक खून, इत्यादींचे सुद्धा आरोप आहेत.
त्याच्या पुतण्याने आपल्या शाळेतील एका १७ वर्षीय मुलीचा खून करून तिचे तुकडे करून कचऱ्याच्या ढिगात फेकले होते, ह्या प्रकरणात हय्याम त्याला वाचवताना आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पण तिथून पळून हय्याम वैनुआटूत येऊन तिथला नागरिक झाल्याचं समोर आलं. ज्यामुळे तो सतत ११३ मित्र देशात पळून जात असतो आणि ह्यामुळे त्याला पकडणे कठीण होऊन बसले आहे.
ही तर दोनच उदाहरणे झाली. अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे अनेक मोठ्या क्रिमीनल्सनी वैनुआटूच नागरिकत्व घेऊन स्वतःला वाचवलं आहे. तिथे राहणारी व्यक्ती आपलं नावसुद्धा बदलू शकते.
यासाठी त्या व्यक्तीला सरकारला फक्त एक चिट्ठी द्यायची असते ज्यात, नाव बद्दलण्यामागे काय कारण आहे ते स्पष्ट करावे लागते. पण कोणत्याही प्रकारची पडताळणी, तपासणी, चौकशी केली जात नाही.
क्रिमीनल्सना अशा अनेक मोकाट वाटा देण्याचं काम वैनुआटू करतो आहे. पण त्या देशाला ह्या गोष्टीचा, किंवा कोणता देश आपल्याला काय म्हणेल किंवा जग काय म्हणेल याचा काहीही फरक पडत नाही. निव्वळ पैशांसाठी अनैतिकतेचा बाजार त्याने मांडून ठेवला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.