पोलिस असूनही सिस्टिमविरुद्ध कटकारस्थान करणारा पंजाबचा क्रूर ऑफिसर
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पंजाबची भूमी ही खूप शूर वीरांची भूमी आहे. देशातील इतर राज्यांसारखी इथे औद्योगिक प्रगती नाही झाली. पण, तरीही तिथे बेरोजगारीचा दर अगदीच कमी आहे. कारण, पंजाब मधील लोक प्रामुख्याने एक तर शेती करतात किंवा देश संरक्षणासाठी आपल्या मुलांना तयार करतात.
पंजाबमधील प्रत्येक घरातील एक जण हा मिल्ट्री, आर्मी किंवा नेव्ही मध्ये असतो. चांगले असेपर्यंतच चांगले आणि एकदा संयम सुटला की अगदीच वाईट अशी काहीशी पंजाबी लोकांची ख्याती आहे.
‘जनरल लाभ सिंग’ या अश्याच एका तरुणाची कथा सांगत आहोत ज्याचं आयुष्य एखाद्या सिनेमातील नायका प्रमाणे आहे. आधी पोलीस, मग गुंड, अतिरेकी कारवायांमध्ये सहभाग आणि मग एन्काऊंटर असा हा रंजक प्रवास सुरुवातीपासून जाणून घेऊयात.
‘जनरल लाभ सिंग’ उर्फ ‘सुखदेव सिंग’ उर्फ ‘सुखा सिपाही’चा जन्म अमृतसर मधील पट्टी तालुक्यात झाला होता. लहानपणी या मुलाला काही काम नसताना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसायची सवय होती.
अभ्यासासोबत खेळातही तो नेहमीच भाग घ्यायचा. १९७१ मध्ये सुखदेव सिंग हे पोलीस मध्ये भरती झाले. देवींदर कौर या मुलीसोबत त्यांचं लग्न झालं.
–
हे ही वाचा – इंदिरा गांधींसाठी २ काँग्रेस नेत्यांनी केलं होतं भारतीय विमानाचं अपहरण!
–
७० चं दशक हे पंजाब साठी खूप महत्वाचं मानलं जातं. एकीकडे पंजाबमध्ये रोज पॉप गाणे तयार करणारे गीतकार, गायक रोज तयार होत होते. तर दुसरीकडे ‘खलिस्तान’चे लोक पंजाब मधून वेगळं होऊ पाहत होते.
सुखदेव सिंग यांनी १२ वर्ष पोलीस मध्ये नोकरी केली १९८३ मध्ये सुखदेव सिंग हे ‘जर्नाईल सिंग भिंद्रावाले’ यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या आयुष्याने एक नवीन वळण घेतलं. भिंद्रावाले हे ‘खलिस्तान मुक्ती संग्राम’चे प्रमुख होते.
सुखदेव सिंग हे जर्नाईल यांच्या विचारांनी खूप प्रभावित झाले आणि त्यांनी सुद्धा ‘खलिस्तान मुक्ती संग्रामात’ सहभागी होण्याचं ठरवलं. सुखदेव सिंग यांनी १९८३ मध्ये पोलीसची नोकरी सोडली आणि ते ‘लाभ सिंग’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
खलिस्तान मुक्ती संग्राममुळे ९० च्या दशकात पूर्ण पंजाब धगधगत होतं. ‘हिंद समाचार’ या वृत्तपत्राच्या संपादक रमेश चंदर यांची केवळ इतक्यासाठी हत्या करण्यात आली होती की त्यांनी ‘जर्नाईल सिंग भिंद्रावाले’ यांच्या मोहिमेचा आपल्या अग्रलेखातून विरोध केला होता.
‘जर्नाईल सिंग भिंद्रावाले’ यांचा समाजातील एक वर्ग समर्थन करत होता, त्यांना संत म्हणत होता, तर एक वर्ग त्यांचा प्रखर विरोध करत होता.
लाभ सिंग हे या मोहिमेत अडकत गेले आणि आपल्या नेमबाजीच्या कौशल्याचा वापर ते लोकांच्या रक्षणासाठी न करता त्यांचा जीव घेण्यासाठी करू लागले. पंजाबमध्ये दहशत पसरवणे हा एकच त्यांच्यापुढे उद्देश राहिला होता.
‘अकाली दल’ हा सुद्धा तेव्हा संविधानातील आर्टिकल २५ चा विरोध करत होते. जाळपोळ करत होते. हिंदू आणि शीख यांना एक समान दर्जा देणाऱ्या २५बी या कलमाचा अकाली दल निषेध करत होते.
‘खलिस्तान’ साठी एकत्र आलेल्या लोकांचा हा उद्देश होता की, हे वातावरण असंच रहावं. केंद्र सरकार आणि अकाली दल यांच्यात कधीच शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा होऊ नये. त्याचवेळी तत्कालीन केंद्र सरकारने ‘ऑपरेशन ब्लुस्टार’ची सुरुवात केली आणि त्यामध्ये पूर्ण पंजाब ढवळून निघालं होतं.
–
हे ही वाचा – ऑपरेशन ब्लू स्टार – शिखांच्या पवित्र प्रार्थनास्थळाच्या मुक्ततेचे थरार नाट्य
–
‘जनरल लाभ सिंग’ यांच्या अतिरेकी कारवायांपैकी १२ फेब्रुवारी १९८७ रोजी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेवर घातलेल्या सशस्त्र दरोड्याची सर्वात जास्त चर्चा झाली होती.
लुधियाना शहरातील मिलर गंजच्या शाखेत सकाळी ९.४५ वाजता पोलीसच्या वेशात काही लोक येतात, बँकेच्या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतात आणि बँकेत बंदुकीचा धाक दाखवून ६ करोड ची रोकड लंपास करतात. बँकेचे कर्मचारी, ग्राहक हा थरार बघतात. पण, काहीच करू शकत नाहीत.
खलिस्तान कमांडो फोर्स नावाच्या अतिरेकी संस्थेचे हे लोक होते. ‘जनरल लाभ सिंग’ हे त्यांचं नेतृत्व करत होते. हा दरोडा इतका मोठ्या प्रमाणावर होता की, त्याचं नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंदवण्यात आलं होतं.
रमेश चंदर यांच्या हत्येचा कट रचतानासुद्धा जनरल लाभ सिंग यांचा सहभाग होता असा पोलिसांना संशय होता. १९८६ मध्ये पोलिसांनी जनरल लाभ सिंगला अटक केली. खलिस्तान मुक्ती संग्रामच्या लोकांना ही गोष्ट अजिबात रुचली नव्हती. त्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि त्यांनी ६ पोलिसांची हत्या केली.
‘मनबीर सिंग चचेरु’ यांनी हा हल्ला केला होता आणि जनरल लाभ सिंग यांना पळवून नेण्यास ते यशस्वी झाले होते.
या घटनेनंतर पंजाब पोलिसांनी तातडीची बैठक बोलावली होती आणि त्यांनी लाभ सिंगसाठी ‘दिसताच गोळी’ घालण्याचे आदेश दिले होते. या मिशनला पोलिसांनी ‘बुलेट फॉर बुलेट’ असं नाव दिलं होतं.
१२ जुलै १९८८ रोजी पोलिसांना लाभ सिंग बद्दल आपल्या गुप्तहेरांकडून पक्की माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. लाभ सिंगबद्दलची माहिती खरी होती.
पोलिसांना बघून लाभ सिंग पळाला. पण, पोलिसांच्या गोळीपासून तो स्वतःला वाचवू शकला नाही. खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख एन्काऊंटर मध्ये मारला गेला.
पोलिसांनी लाभ सिंगच्या घरी जाऊन ही बातमी त्यांची पत्नी देवींदर कौर यांना दिली. ३६ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या लाभ सिंग बद्दल प्रत्येकाला हळहळ वाटत होती. देवींदर कौर यांनी लाभ सिंगला गुन्हेगारी जगतात थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
खलिस्तान कमांडो फोर्सला कवलजीत सिंगच्या रुपात नवं नेतृत्व मिळालं होतं. पण, लाभ सिंगच्या कुटुंबात मात्र त्याच्या हत्येमुळे कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली होती.
खलिस्तान हा वेगळा देश व्हावा यासाठी काही समर्थक आजही प्रयत्न करत आहेत. पण, त्यावर अजूनही तोडगा निघाला नाहीये, पण लाभ सिंगसारखे पंजाबमधील कित्येक तरुण अश्या मोहीमांमुळे दिशाहीन झाले आहेत हे मात्र नक्की.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.