' हे ९ पदार्थ एकत्र खाणं म्हणजे डॉक्टरांच्या खेपा वाढवणंच आहे… आजच थांबवा – InMarathi

हे ९ पदार्थ एकत्र खाणं म्हणजे डॉक्टरांच्या खेपा वाढवणंच आहे… आजच थांबवा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण अन्नाला पूर्णब्रम्ह म्हणतो. आपल्या शरीरासाठी अन्न हेच अमृताचे काम करते. शरीराला योग्य मात्रेत अन्न, त्यातले प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स मिळाले तर आपल्या शरीराच्या वाढीत त्यांची मदत होते. पण हे सगळे चांगले गुण मिळण्यासाठी, अन्न अंगी लागण्यासाठी ते योग्य पद्धतीने खाल्ल्या गेले पाहिजे.

अन्न ग्रहण करण्याच्या सुद्धा योग्य पद्धती असतात, नियम असतात. अन्न कोणत्या वेळेस खाल्ले पाहिजे, कोणत्यावेळेत कोणते पदार्थ खावे, ते कसे खावे ह्या सगळ्यांचे नियम असतात.

 

family_eating_InMarathi

 

आपल्या सगळ्यांनाच आपल्या जेवणात व्हरायटी हवी असते. त्यामुळे आपण जेवणात चार ते पाच अन्न पदार्थ घेतो. पण त्याचे कॉम्बिनेशन योग्य असते का ते जाणून न घेता, फक्त चवीला  चांगले लागते ते आपण घेतो. असे चुकीचे फूड कॉम्बिनेशन खाल्ल्याने आपल्याला गॅस, ऍसिडिटी कधी कधी फूड पॉयझनिंग होऊन गंभीर आजार सुद्धा होऊ शकतो.

कोणते आहेत हे घातक फूड कॉम्बिनेशन्स चला ते पाहूया.

१) फळे आणि जेवण 

आपल्यापैकी अनेकांना जेवताना किंवा जेवण झाल्यावर फलाहार करायला आवडतो. त्याने काही तरी गोड खाण्याची उणीव भरून निघते. पण जेवणानंतर किंवा जेवताना फळे खाल्ली तर त्यातली साखर म्हणजेच फ्रुक्तोज शरीरात जास्त वेळ टिकून राहते, ज्यामुळे पोटात ती फरमेन्ट होऊ शकते.

 

rice inmarathi

 

ह्याने अपचन, गॅस असे त्रास होतात व फळांचे पोषण आपल्याला मिळत नाही.

२) अन्न आणि पाणी

आपल्याला भूक लागली, की आपल्या पोटात आपोआपच अन्न पचवणारे ऍसिड तयार होते म्हणजेच पोटातील अग्नी प्रज्वलित होतो.

 

water-health-inmarathi05

 

 

आपण जेवण्याच्या लगेच आधी किंवा जेवताना भरपूर प्रमाणात पाणी प्यायलो तर ह्या ऍसिडची पावर कमी होते. ज्यामुळे अन्न पचन नीट होत नाही तसेच अन्न पोटात सडते. याचा थेट परिणाम प्रकृतीवर होतो.

३) फ्रेंच फ्राईज आणि बर्गर 

फ्रेंच फ्राईज आणि बर्गर हे कॉम्बिनेशन तर प्रचंड फेमस आहे. कॅफेच्या ऑफर्स असतात, आपल्याला सुद्धा बर्गर बरोबर, तिखट, मीठ मसाला लावलेले हे फ्राईज आवडतात. पण हे कॉम्बिनेशन अत्यंत वाईट आहे.

 

burger inmarathi

 

बर्गरमध्ये असणारी पॅटी आणि फ्राईज हे तळलेले असतात आणि भरपूर जड असतात. आपण हे पदार्थ एकत्र खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होते, ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो, स्थूलपणा वाढतो.

जरा आठवून बघा, अतिरिक्त प्रमाणात हे पदार्थ खाणा-यांचे झपाट्याने वाढते वजन हा अनुभव तुम्हीही घेतला असेल.

४) कोला आणि पिझ्झा

फास्टफूड आवडणाऱ्यांचे हे सगळ्यात पसंतीचे कॉम्बिनेशन आहे. पण पिझ्झा हा पूर्णपणे मैद्याने बनलेला असल्याने त्यात स्टार्च आणि फॅट्सचे प्रमाण अधिक असते. कोलामध्ये साखर अधिक असते.

 

pizza inmarathi

 

हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचन पूर्णपणे थांबते, पोटाच्या समस्या उद्भवतात. याच बरोबर शरीरात फॅट डिपॉझिशन सुरु होऊन लठ्ठपणा दुप्पट वेगाने वाढतो.

५) म्युसली आणि ज्यूस 

इंग्रजांच्या पद्धतीने नाश्ता करण्यावर अनेकांचा भर असतो. पोहे, उपमा अशा पारंपरिक पदार्थांपेक्षा म्युझली, सॅलेड, फ्रुटज्यूस असा इंग्लिश ब्रेकफास्ट करणा-यांमध्ये तुम्हीही आहात? तर सावधान!

म्युसली, ओट्स हे पदार्थ अनेकांना आवडतात सुद्धा! जाहिरातीत दाखवल्या प्रमाणे म्युझली दुधात भिजवून खावी लागते. फिट राहण्यासाठी हे असले प्रयत्न करताना तुम्ही स्वतःच्या प्रकृतीचे नुकसान करत नाही ना? याची काळजी घ्या.

 

breakfast inmarathi

 

दुधात भिजवलेला नाश्ता आणि  फ्रुट ज्यूस मध्ये असलेल्या ऍसिड मुळे इतर सगळ्या पदार्थांतील कार्बोहायड्रेट्स पचणे अवघड जाते. त्यामुळे आपल्याला शक्ती मिळण्याऐवजी आपण स्थूल होत जातो.

६ ) पुदिना आणि सोडा 

 

pudina soda inmarathi

 

पुदिना किंवा मिंट असलेले पदार्थ जसे गोळ्या, च्युइंगम आणि सोडा असलेले पेय एकत्र प्यायल्याने पोटात प्रचंड गॅस निर्मिती होते. त्याने फूड पॉइझनिंगही होऊ शकते..

७) अंडी आणि फ्राय केलेलं मांस 

अंडी आणि फ्राईड मीट ही दिसायला फार कूल आणि मॉडर्न डिश वाटते, हो ना?

 

egg and meat inmarathi

 

इंग्लिश सिनेमा, सिरीयलमध्ये दाखवतात त्या प्रमाणे फॅन्सी जेवण जेवावे, प्रोटीन मिळवावे यासाठी आपण अंडी आणि फ्राय केलेले मांस असे कॉम्बिनेशन खातो. पण ह्यातील प्रोटीनची मात्रा भारतीय शरीराला लागणाऱ्या प्रोटीनपेक्षा खूप अधिक होते. ज्यामुळे पंचनसंस्थेवर खूप भार पडतो.

ह्या दोन्हीपैकी एक काही तरी बदलून त्या ठिकाणी भाज्यांचा वापर केला की आपल्याला फायदा होऊ शकतो.

८) मफीन्स आणि फ्रुट ज्यूस 

कोणतेही बेकरी आयटम आपण जर फळांच्या रसाबरोबर खाल्ले तर त्याचे विपरीत परिणामच आपल्याला भोगावे लागतात.

 

या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला अतिरिक्त मात्रेत कार्बोहायड्रेट्स आणि साखर मिळते. ज्याने त्वरित शक्तीतर मिळते पण लगेच ती संपूनही जाते, कार्बोहायड्रेट आणि साखरीचे फॅट्स मध्ये परिवर्तन होते.

९) पास्ता आणि टोमॅटो 

हे काय? रेड सॉस पास्ता बनवण्यासाठी टोमॅटो तर लागतातच आणि अनेक लोक हे दोन्ही एकत्रच खातात.

 

red souce pasta inmarathi

 

पास्ता हा स्टार्चने भरलेला असतो टोमॅटो ऍसिडीक असतो. ज्यामुळे दोन्ही घटक एकत्रित आल्याने आपले पचन कमजोर होते. आपल्याला गॅस आणि पोट दुखीचा त्रास होऊ शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?