राणेंच्या मुलाने ओव्हरटेक केलं, म्हणून आदित्य ठाकरेंनी पोलिसांकडे धाव घेतली, तेव्हा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
केंद्रीय मंत्री मंडळात पोचलेले नारायण राणे, खऱ्या अर्थाने घडले ते शिवसेनेत; म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारात! असं असूनही नारायण राणे यांचा तापट स्वभाव काही बदलला नाही. त्याच बाळासाहेबांचा पुत्र उद्धव ठाकरे, हे मात्र शांत आणि संयमी स्वभावाचे! राणेंनी शिवसेना सोडली आणि ठाकरे आणि राणे कुटुंबात कलह निर्माण झाले, हे काही वेगळं सांगायला नको.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
‘बाप तसा बेटा’ म्हणतात ना, त्या न्यायाने नारायण राणे यांचा मुलगा नितेश याने त्यांचा तापट आणि आक्रमक स्वभाव घेतला आणि ठाकरेंच्या सुपुत्राचा, म्हणजेच आदित्य ठाकरे यांचा शांत स्वभाव नेहमीच पाहायला मिळतो.
सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे नितेश राणे असोत, किंवा संयमी पण स्पष्टपणे मुद्दे मांडणारे आदित्य ठाकरे असोत. विरोधी पक्षात असल्यावर, या नव्या पिढीचे, नव्या दमाचे हे युवा नेते एकमेकांसमोर आले, तर त्यांच्यातील राजकीय मतभेद पाहायला मिळणार नाहीत, असं होऊच शकत नाही.
आज आम्ही असाच एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. ज्यावेळी त्यांच्या राजकारणातील राजमार्गावर नव्हे, तर सर्वसामान्य मंडळी जातात त्या रस्त्यावर, केवळ गाडीचा ताफा ओव्हरटेक केला, म्हणून त्यांच्यात चकमक झाली होती.
काय घडलं त्यादिवशी?
मंडळी, ही गोष्ट आहे २०११ च्या सप्टेंबर महिन्यामधली! म्हणजे जवळपास १० वर्षांपूर्वीची… नितेश राणे म्हणजे गरम डोक्याचा माणूस, हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. घटना आहे दहा वर्षांपूर्वीची; म्हणजे आदित्य ठाकरे सुद्धा ऐन विशीतील तरुण! मग अशा या युवकांमध्ये ‘राडा’ होणं म्हणजे काही, फार आश्चर्य वाटणारी गोष्ट ठरू नये, नाही का?
दक्षिण मुंबईकडे निघालेले आदित्य ठाकरे त्यांच्या बीएमडब्लूमधून वरळीमध्ये पोचले होते. त्यांच्या मार्गाने त्यांच्या वाटेवरून ते प्रवास करत असतानाच नितेश राणे यांच्या ४ गाड्यांचा एक ताफा तिथे पोचला. या ताफ्याने रस्त्याच्या डाव्या बाजूने आदित्य ठाकरे यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि तो ताफा पुढे निघून गेला.
पोलीस स्टेशनपर्यंत पोचलं प्रकरण
हे घडल्यानंतर, आदित्य ठाकरे यांचे बॉडीगार्ड थेट पोलीस स्टेशनला पोचले. आदित्य यांची गाडी डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्यात आली, आणि एवढंच नाही तर गाडीला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दाबण्याचा प्रयत्न नितेश यांच्या ताफ्याकडून करण्यात आला, अशी तक्रार त्यांनी पोलिसठाण्यात दाखल केली.
या हाय प्रोफाइल केसबद्दल कुठलीही माहिती देण्यास आणि त्यात हस्तक्षेप करण्यास पोलिसांनी मात्र नकार दिल्याचं म्हटलं जातं. त्यावेळी नेमकं काय घडलं, याविषयी तपास करून या केसबद्दल निर्णय घेण्यात येईल, असं थातुरमातुर उत्तर देऊन पोलिसांनी मात्र यातून हात झटकले. या केसविषयी पुढे काय झालं हे मात्र गुलदस्त्यातच राहिलं.
ही पहिलीच घटना नसल्याचं मत
आपली गाडी दाबण्यात आल्याची ही पहिलीच घटना नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणत आहेत, अशी चर्चाही त्यावेळी तुफान रंगली होती. याआधी सुद्धा बांद्रा-वरळी सी-लिंकवर अशाच चुकीच्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांची गाडी कोपऱ्यात दाबण्यात आली होती, असंही त्यावेळी अनेकजण म्हणत होते.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला होता. वरळी पोलीस स्टेशनबाहेर गर्दी करत, त्यांच्याकडून नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
अर्थात, निव्वळ गाडी ओव्हरटेक करणं हे पोलिसात तक्रार दाखल करण्याचं कारण ठरलं असल्यामुळे, या घटनेची तुफान चर्चा झाली. त्यावेळी काँग्रेसमध्ये असणारे नारायण राणे, हे तत्कालीन महाराष्ट्र सरकारमध्ये अवजड उद्योगमंत्री म्हणून कार्यरत होते. हेदेखील कारण या हाय प्रोफाइल केसची अधिक चर्चा होण्यात महत्त्वपूर्ण ठरलं.
नेमकं काय घडलं होतं, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी हा खाली दिलेला व्हिडिओ बघता येईल.
India TV ने या प्रकरणावर पोलिसांशी चर्चा केलेली होती. आपण या व्हिडिओमध्ये याबद्दल पाहू शकतो.
या दोन्ही युवा नेत्यांमध्ये कुठलीही चकमक अथवा वाद झाले नाहीत, असं त्यानंतर पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. याविषयावर पुढे मात्र काहीही घडलं नाही. हेच युवा नेते आज ट्विटर आणि इतर प्रसार माध्यमांच्या मदतीने अनेक शाब्दिक चकमकी घडवत असतात हे मात्र खरं…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.