' संस्कृत भाषेच्या प्रेमाखातर मुस्लिम राष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घेतला या युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश! – InMarathi

संस्कृत भाषेच्या प्रेमाखातर मुस्लिम राष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घेतला या युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज जगात भारताचं नाव घेतात ते योगा, प्राचीन संस्कृती, आयुर्वेद या गोष्टींसाठी, काही परदेशातील लोक भारतातला कायमच तुच्छतेने बघत आले आहेत. भारतात आजही रस्त्यावर हत्ती घोडे फिरत असतात, असं त्यांचं मत आहे तसेच हॉलिवूड च्या अनेक चित्रपटात सुद्धा भारत म्हंटल की गरिबी दाखवली जाते.

 

sanskuti inmarathi

 

आजकाल हळूहळू भारताबद्दलच्या संकल्पना बदलत आहे. कोरोनाकाळात भारताने अनेक देशांना लशी पाठवल्या आहेत, तसेच आपल्या इथे आरोग्यसेवेची गरज होती तेव्हा अगदी केनिया सारख्या छोट्या देशाने सुद्धा मदतीचा हात पुढे केला.

भारतात आपली संस्कृती धर्म, आपली प्राचीन भाषा संस्कृत शिकण्यासाठी अनेक देशातून तरुण तरुणी येत असतात. बनारस मध्ये तर स्थानिक लोकांपेक्षा बाहेरून आलेले परदेशी नागरिक जास्त आहेत. बनारस मध्ये हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये आजही १५% कोटा परदेशी नागरिकांसाठी आहे.

 

sanskrut inmarathi

 

गुजरातमधील वेरावळ येथे असच एक संस्कृत विद्यापीठ आहे जिथे मुस्लिम राष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच परदेशी विद्यार्थ्याने या संस्कृत विद्यापीठात ऍडमिशन घेतली आहे. विद्यापीठातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे प्रमुख ललित पटेल यांनी असे सांगितले की, एकूण ९ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते मात्र त्यातील विद्यार्थ्यांना हवे असणारे विषय आमच्याकडे उपलब्ध नाहीत.

 

विद्यापीठ कोणतं आहे?

भारतात संस्कृत विद्यापीठ आज अनेक आहेत. त्यात प्रामुख्याने जुने असलेले बनारस मध्ये आहे. गुजरात मध्ये सुद्धा २००५ साली वेरावळ येथे संस्कृत विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाची स्थापना प्रामुख्याने भारताचा सांस्कृतिक, भाषिक वारसा जपणे. पारंपरिक आणि समकालीन ज्ञान एकत्रित करणे.

 

sanskruti inamarathi

हे ही वाचा – मुस्लिम आक्रमणांपासून हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या “नागा साधूंचा” इतिहास ..वाचा

सध्या एकूणच ऑनलाईन शिक्षणचे वारे वाहत असल्याने विद्यापीठाने सुद्धा आता ऑनलाईन शिक्षणाकडे लक्ष देत आहे जेणेकरून भारतातील तसेच परदेशातील लोक आपल्या प्राचीन भाषेचा अभ्यास करू शकतील.

 

कोण आहेत ते विद्यार्थी?

इराणवरून आलेला फरशाद सालेहजीने संस्कृत भाषेतून पदवी घेण्यासाठी कला शाखेत प्रवेश घेतला आहे. अफगाणिस्तान वरून आलेल्या मसूर संगीम सुद्धा प्रवेश घेतला आहे. बांगलादेशमधली एका मुलाने संस्कृत भाषेतील डॉक्टरेट मिळवण्यासाठी प्रवेश घेतला आहे.

 

irfan inmarathi

 

नरेंद्र मोदींशी कनेक्शन काय?

नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी संस्कृत भाषेला जागतिक दर्जा मिळावा यासाठी प्रयन्त करत आहेत. लोकसभेत सुद्धा आपले मुद्दे मांडताना ते संस्कृत श्लोकांचे आधार घेतात. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या विद्यापीठाचे उदघाटन केले होते.

 

narendra modi inmarathi

 

नरेंद्र मोदी प्रामुख्याने संस्कृत भाषेचा पुरस्कार करत आहेत. त्यांनीच उदघाटन केलेल्या स्टॅचू ऑफ युनिटीच्या जवळ असणाऱ्या बागेतील फलक हे संस्कृत भाषेत आहे.

आपली भाषा, संस्कृती याबद्दल आपल्या अभिमान हा असायलाच हवा, भारत आज जगात एक विकसनशील राष्ट्र म्हणून बघितले जाते. आज विज्ञान, अवकाश यासारख्या क्षेत्रात बरीच प्रगती करत आहोत.

अतिथी देवो भव अशी आपली संस्कृती सांगते, त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकाना, विद्यार्थ्याना आधुनिक भारताच्या बरोबरीने प्राचीन भारत देखील तितक्याच उत्तमरित्या पटवून दिला पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?