' रक्त गोठवणा-या थंडीतही शत्रुवर करडी नजर ठेवणारी भारताची लेक, नक्की वाचा! – InMarathi

रक्त गोठवणा-या थंडीतही शत्रुवर करडी नजर ठेवणारी भारताची लेक, नक्की वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर एका महिला डॉक्टरचा फोटो वा-याच्या वेगात व्हायरल होतोय. कमरेपर्यंत असलेल्या बर्फात ‘ती’ उभी राहिलेली दिसतीय. हाती रायफल, गळ्यात अडकवेला स्टेथस्कोप आणि आश्वासक नजर या तिच्या मुद्रेमुळे भर थंडीतही सीमेवरील शत्रुला कापरं भरणार यात शंका नाही.

काळीज गोठवणा-या थंडीत उभी राहिलेली ती नेमकी कोण? हा प्रश्न अनेकांना पडला असणार. केवळ फोटो पाहतानाच प्रत्येक भारतीयांचा ऊर अभिमानाने फुलून आला असला तरी तिची खरी ओळख, अफाट कर्तृत्व आणि जिद्द या फोटोपेक्षा कितीतरी अधिक आहे.

शहराचं तापमान जरा घसरलं की कपाटातून स्वेटर, जॅकेट्स बाहेर पडतात. घराच्या चार भिंतीत आपण सुरक्षित असल्याची भावना थंडीत अधिक उबदार ठरते. घराघरात हेच चित्र दिसत असलं तरी ‘ती’ मात्र या बर्फात निर्धास्तपणे उभी आहे हे पाहून अनेकांचं काळीज गोठलं.

 

deepshikha inmarathi

 

केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगाला स्त्रीशक्तीचे अनोखे दर्शन घडवणारी विरांगना  म्हणजे लष्कराच्या कॅप्टन डॉ दीपशिखा छेत्री!

जाणून घ्या या रणरागिणीबद्दल…

जिद्दीच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिलांसाठी भारतीय लष्कर क्षेत्रही काही नवे नाही. लष्करातील अनेक पदांचे नेतृत्व करणा-या विरांगनांची यादी मोठी आहे.

गेल्या वर्षी जम्मु काश्मीर सीमेवर महिला सैनिकांना नियुक्त करत भारतीय लष्काराने एक मोठा इतिहास रचला. महिला सैन्याचा वंदे मातरमचा जागर या भागात अजूनगी घुमत असताना आता लष्कराने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

 

women army inmarathi

हे ही वाचा – ‘या’ देशाकडे आहे जगातील सर्वात सुंदर पण तितकेच घातक आणि क्रूर महिला सैन्य!

लष्कराने कॅप्टन डॉक्टर दीपशिखा छेत्री यांची फ्रंटलाईन नियुक्तीसाठी मंजुरी दिली आहे.

मुळच्या सिक्कीम येथिल रहिवासी असलेल्या डॉ दीपशिखा यांना सुरवातीपासूनच लष्करसेवेची इच्छा होती. आपल्या स्वप्नाच्याच दिशेने प्रवास करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. याचेच प्रतिक म्हणजे लष्कराच्या वैद्यकीय सेवेत संपूर्ण देशात सहावा क्रमांक पटकावला. तर महिला उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव दुस-या क्पमांकावर झळकले.

डॉ दीपशिखा यांनी सिक्किमच्या मनिपाल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स मधून एमबीबीएसची पदवी पहिल्या क्रमांकासह उत्तीर्ण झाल्या. मात्र इतर डॉक्टरांप्रमाणे शङरी भागात आपली सेवा न देता लष्करात भरती होण्याची जिद्द त्यांनी कायम ठेवली होती.

लष्करात झालेल्या नियुक्तीमुळे पुढील आठ महिने त्या सियाचीन सीमेवर दक्ष असणार आहेत. सुरक्षेसाठी बंदूक आणि डॉक्टरांचे अस्त्र असलेले स्टेथस्कोप या दोन शस्त्रांच्या साथीनेे त्या सीमारक्षणासाठी सज्ज झाल्या आहेत.

 

dr deepshikha inmarathi

 

सैनिकांच्या आरोग्याची धुरा आपल्या सक्षम खांद्यांवर पेलणा-या डॉ दीपशिखा या देशातील तरुण वर्गासाठी एक आदर्श ठरत आहेत. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या त्यांच्या फोटोला मिळणारा प्रतिसाद हे त्याचेच प्रतिक आहे.

केवळ डॉक्टर म्हणून नव्हे तर त्यासह एक कर्तव्यदक्ष सैनिक अशा दोन्ही भुमिका त्यांना पार पाडाव्या लागणार असल्याने येणारा काळा त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल, मात्र या पदापर्यंतची त्यांची झेप अनेकींना प्रेरणा देईल यात शंका नाही.

हे ही वाचा – कारगिल युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या एकमेव महिला पायलटची थरारक कथा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?