' वाचा, सरफरोश सुपरहिट होऊनही नसीर आमीरसोबत काम करणं पसंत का करत नाही. – InMarathi

वाचा, सरफरोश सुपरहिट होऊनही नसीर आमीरसोबत काम करणं पसंत का करत नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एका पिढीला स्पर्धा परीक्षा देऊन IAS IPS बनण्यासाठी प्रोत्साहित करणारा म्हणून सरफरोश या सिनेमाकडे पाहिलं जातं. या सिनेमाने लोकांची करमणूक तर केलीच याशिवाय तत्कालीन राजकीय तसेच समाजव्यवस्थेवर कटाक्ष करणारं भाष्यदेखील केलं.

हा सिनेमा म्हणजे आमीर खानच्या करियरचा माइलस्टोन ठरला होता, तोवर आमीरचे बरेच सिनेमे हे बॉक्सऑफिसवर हिट ठरले होते. अंदाज अपना अपना फ्लॉप झालेला असला तरी इश्क, राजा हिंदुस्तानी, गुलाम अशा सिनेमातून आमीरने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं होतं.

 

sarfarosh inmarathi

 

दीपा मेहताच्या अर्थमध्ये एक वेगळीच भूमिका करून आमीरने स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं होतं, अशातच त्याच्यासमोर सरफरोशची ऑफर आली आणि पुढे काय झालं ते इतिहासात नोंदवलं गेलं.

हे ही वाचा बॉलिवूडला ऋणी करणारा, चिरंतन “सरफरोश”

सरफरोश हा सिनेमा कारगिल युद्धाच्या बरोबर आधी रिलीज झाला असल्याने लोकांचा या सिनेमाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला होता, पण लोकांच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध सरफरोश हा तगडा अॅंटी वॉर सिनेमा निघाला!

आज याच सिनेमाच्या काही खास रंजक गोष्टींविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

निर्माते मिळणं मुश्किल झालं होतं :

या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक जॉन मॅथ्यू हे मुळात एक अॅडफिल्ममेकर, त्यांना एका चांगल्या विषयावर सिनेमा बनवायची इच्छा असल्याने त्यांनी त्यावेळच्या भारत पाकिस्तान मुद्यांवर चर्चा आणि रिसर्च करायला सुरुवात केली.

१९९७ मध्ये त्यांच्या हातात स्क्रिप्ट आली तेव्हा या सिनेमासाठी त्यांची पहिली पसंती आमीर खान होता. आमीर तेव्हा एका वेळी बऱ्याच प्रोजेक्टवर काम करत असल्याने या सिनेमाच्या नरेशनसाठी आमीरने जॉन यांना केवळ १ तासाचा वेळ दिला.

 

john matthew inmarathi

 

पण आपल्याला किमान ३ तास हवेत अशी विनंती जॉन यांनी केल्यावर एक दिवस आमीरने त्यांना नरेशनसाठी बोलावलं, आमीरला कथा खूप भावली पण तरीही या सिनेमावर पैसे लावायला कुणीच तयार नव्हतं.

याच दरम्यान आमीर आणि जॉनची ओळख मनमोहन शेट्टी यांच्याशी झाली. मनमोहनजी त्यावेळेस गोविंद नीहलानि यांचे सिनेमे प्रोड्यूस करत असत. त्यांनाही सरफरोशचं कथानक आवडलं आणि “पैशांच्याखातर हा सिनेमा रखडायला नाही पाहिजे” असं म्हणत पुढे जाण्यासाठी पाठबळ दिलं आणि सिनेमाचं शूटिंग सुरू केलं!

आमीरच्या ट्रांजिशनचा पहिला टप्पा म्हणजे सरफरोश :

गेली कित्येक वर्षं बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट त्याच्या एकाच फॉर्म्युलावर सिनेमे करतो ते म्हणजे वर्षाला एक सिनेमा. पण तुम्हाला माहितीये का आमीरचा हा फॉर्म्युला आत्ताचा नाही.

मेला, मनसारखे कित्येक सिनेमे फ्लॉप ठरले, त्यावर्षी आलेला दीपा मेहताचा ‘अर्थ’चं थोडंफार समीक्षकांनी कौतुक केलं पण त्यानंतर आमीरने एका वर्षाला एकच सिनेमा करायचा हा फॉर्म्युला वापरायला सुरुवात केली.

 

mela inmarathi

 

एकावेळी एकाच सिनेमावर लक्षकेंद्रित करून quantity पेक्षा क्वालिटीवर फोकस करायला आमीरने सुरुवात केली आणि याच फेजमधला सरफरोश हा पहिला सिनेमा ठरला आणि इथपासून पुन्हा डझनभर सिनेमे करणारा आमीर चोखंदळ झाला!

हे ही वाचा वडिलांचा विरोध पत्करून चोरून चित्रपट पाहणारा मुलगा ते बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट….!

फिल्मसिटीच्या आसपास भटकणारा भुरटा चोर झाला आणि त्याचा नंतर नवाझुद्दीन झाला :

सध्याच्या टॉपस्टार्सपैकी एक नवाझने सरफरोशमध्ये केवळ १३९ सेकंदांचा रोल केला होता, त्यावेळेस नवाझ एक स्ट्रगलिंग अॅक्टर होता आणि काम शोधण्यासाठी तो फिल्मसिटीचे किंवा निर्मात्यांचे उंबरठे झिजवत होता.

सरफरोशच्या त्या सीनमधल्या एका अॅक्टरने आयत्यावेळेस शूटिंगला दांडी मारली आणि नेमकं त्यावेळेस सेटच्या आसपासच नवाज कुठे काम मिळतंय का म्हणून बघत होता, आणि अशा रीतीने त्या इंटेरोगेशनच्या सीनमध्ये १३९ सेकंदांसाठी नवाजची वर्णी लागली.

 

nawaz inmarathi

 

सुरुवातीला हा सीन मुख्य सिनेमातून काढून टाकण्यात आला होता पण नंतर या सिनेमाचा स्पेशल स्क्रीनिंग नंतर हा सिन आणि असे काही सीन पुन्हा जोडण्यात आले.

सिनेमात बऱ्याच कलाकारांना स्क्रिप्टदेखील दिलेली नव्हती :

या सिनेमात काम करणाऱ्या बऱ्याच कलाकारांना जॉन यांनी पूर्ण स्क्रिप्ट दिलेली नव्हती. जेव्हा सोनाली बेंद्रे हिला या सिनेमासाठी कास्ट करण्यात आलं तेव्हा तिला फक्त तेवढ्याच गोष्टी सांगण्यात आल्या जेवढ्या तिच्या पात्रासाठी महत्वाच्या होत्या.

सोनाली बेंद्रेने जेव्हा जॉन यांना विचारलं की नसीरुद्दीन यांची नेमकी कोणती भूमिका आहे तेव्हा जॉन यांनी सोनालीला सांगितलं की ते गझलगायकाची भूमिका करणार आहेत, यापुढे सोनालीला काहीच माहिती नव्हती.

 

sonali bendre inmarathi

 

गझलगायक असूनही नसीर हेच सिनेमाचे मुख्य व्हिलन आहेत हे सोनालीला नंतर समजलं!

नसीरुद्दीन यांना आमीरसोबत काम करायला आवडत नाही :

१९८४ च्या केतन मेहता यांच्या होली सिनेमात नसीर आणि आमीरने एकत्र काम केलं होतं, त्यानंतर थेट सरफरोशमध्ये या दोघांनी एकत्र काम केलं, यात काम करताना नसीर यांनी आमिरवर खास टिप्पणी केली “आमीरचा मेंदू ताळ्यावर आहे, त्यामुळेच तो जे काम करतो ते उत्तम करतो!”

पण यापुढे जाऊन नसीर यांनी एका मुलाखतीत असंही सांगितलं आहे की आमीरसोबत काम करणं ते पसंत करत नाही!

हे ही वाचा हॉलिवूडच्या ‘गॉडफादर’ला अभिनयाचे धडे गिरवायला लावणारा दिग्गज भारतीय अभिनेता

sarfarosh featured inmarathi

 

आजही इतक्या वर्षांनी सरफरोशच्या सिनेमाच्या सीक्वलची चर्चा होताना दिसते, हा सिनेमा आजही लोकं तितक्याच आवडीने बघणं पसंत करतात. वास्तवदर्शी आणि तितकाच देशभक्तीपर असा सिनेमा पुन्हा बॉलिवूडमध्ये कधी झालाच नाही.

या सिनेमाचे दिग्दर्शक जॉन यांनी यानंतर बऱ्याच वर्षांनी आणखीन एक सिनेमा बनवला तो फ्लॉप झाला त्यानंतर ते अजूनतरी या क्षेत्राकडे वळलेले नाहीत. के आसिफ सारकेच जॉनसुद्धा फक्त एकच सिनेमा देऊन या क्षेत्रात स्वतःचं स्थान कीती अढळ आहे हे सांगून गेले!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?