इंदिरा गांधींनंतर आता कंगना आणणार देशात ‘आणीबाणी…’ वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आजचा दिवस सहसा कुणीही भारतीय विसरू शकत नाही, आजच्याच दिवशी तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली यांच्या सहीनंतरच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती.
यामागे बराच मोठा राजकीय इतिहास आणि संघर्ष होता, पण आणीबाणी हा काही त्यावर उपाय नव्हता, यावरून इंदिरा गांधींची खूप आलोचना झाली. एकंदरच सगळीकडे अराजकता पसरली, मोठमोठ्या नेत्यांना तुरंगवास झाला, सामान्य जनतेचे हाल झाले, प्रसारमाध्यमांवर अत्याचार झाले.
“इंदिरा गांधी त्यागपत्र दो” अशाप्रकारचे नारे लागत होते, सगळ्यांच्याच मनात इंदिरा गांधी सरकारबद्दल एक आक्रोश होता, आज इतकी वर्षं होऊनही लोकांच्या आठवणीतून तो काळा दिवस काही केल्या जात नाही.
–
हे ही वाचा – इंदिरा गांधींसमोर झुकलेले राष्ट्रपती : बस्स हीच आहे यांची आठवण…!
–
पण तुम्हाला माहितीये की तीच आणीबाणी आपल्याला पुन्हा बघायला मिळणार आहे, तीही मोठ्या पडद्यावर! आणीबाणीच्या काळावर लवकरच एक सिनेमा येणार आहे आणि त्याचं दिग्दर्शन करणार आहे खुद्द कंगना रनौत.
कंगनाने नुकतंच याविषयी तिच्या कु अकाऊंटवरुन लोकांना ही माहिती दिली आहे, नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया!
कंगना आणि तिची वादग्रस्त विधानं आपल्यासाठी काही नवीन नाहीत. उद्धव ठाकरेंचा अपमान असो, बंगाल निवडणुकीवरून केलेलं ट्विट असो किंवा ट्विटर अकाऊंट डिलीट होणं असो, कंगना या सगळ्या संकटाच्या नाकावर टिच्चून काम करू पाहतीये याचं कौतुक करायलाच हवं.
नुकतंच तिने इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या Emergency वर आधारीत प्रोजेक्टवर काम करत असल्याचं जाहीर केलं आहे. ती या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून यात ती मुख्य इंदिरा गांधींची भूमिकासुद्धा साकारणार आहे.
कंगना म्हणते – “पुन्हा एकदा दिग्दर्शनाची संधी मिळाली आहे, १ वर्षाच्या मेहनतीनंतर ‘एमर्जन्सिचं’ दिग्दर्शनाचं काम माझ्याकडेच आलंय, माझ्याशिवाय आणखीन कोण ते उत्तम करू शकणार नाही, या आगामी प्रोजेक्टसाठी मी खूप एक्सायटेड आहे!”
या सिनेमाचं लेखन रितेश शहा करणार असून, ज्यांनी याआधी पिंक, डी-डे, रॉकी हॅंडसम, कहानी सारख्या सिनेमांसाठी काम केलं आहे.
Emergency हा कोणताही बायपीक नसून तो एक पोलिटिकल ड्रामा आहे असंही कंगनाने स्पष्ट केलं आहे, “हा सिनेमा म्हणजे एक पोलिटिकल थ्रिलर ड्रामा आहे, हा सिनेमा कोणत्याही व्यक्तीवर आधारीत नसून माझ्या आणि पुढच्या पिढीला आणीबाणीविषयी माहिती हवी यासाठीच हा सिनेमा आम्ही बनवत आहोत” असं कंगनाने सांगितलं आहे.
सध्या सोशल मीडियावर कंगनाचे या सिनेमासाठीच्या लुक टेस्टचे फोटोज बरेच व्हायरल होत आहेत. या सिनेमात इंदिरा गांधी यांचं पात्र हुबेहूब वठवलं पाहिजे यासाठी कंगना मनापासून प्रयत्न करताना दिसत आहे.
याबरोबरच कंगनाचा ‘थलैवी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, हा तामिळनाडूची पोलिटिकल लीडर जयललिता यांचा बायोपिक असून यात कंगनाने मुख्य भूमिका साकारली आहे, सिनेमाच्या ट्रेलरला लोकांनी पसंती दर्शवली असून कंगनाचा अभिनय बघण्यासाठी सध्या सगळेच उत्सुक आहेत.
आणीबाणीवर आधारित असलेल्या सिनेमाचं दिग्दर्शनही कंगना करणार हे ऐकून बऱ्याच लोकांनी भुवया उंचावल्या आहेत. मणिकर्णिका सिनेमाच्या वेळेस झालेला वाद, मूळ दिग्दर्शकाचं क्रेडिट घेण्यावरुन त्यावेळेस कंगनावर बरेच आरोप लागले होते.
तो सिनेमा करताना एक प्रकारची कंगनाची मनमानी चालायची असंही त्या सिनेमाच्या पहिल्या डायरेक्टरने बऱ्याच मुलाखतीत सांगितलं आहे.
आता या आणीबाणीच्या सिनेमाविषयीसुद्धा अशाच वावड्या उठायची शक्यता आहे, म्हणूनच हा सिनेमा कंगना दिग्दर्शित करणार हे समजताच बऱ्याच लोकांनी हा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.
–
हे ही वाचा – इतरांचं ते फ्रीडम ऑफ स्पीच, कंगना करेल ते हेट स्पीच : वाह रे ट्विटर अजब तुझे नियम!
–
पण हे असं काही ऐकायला न मिळता एक उत्तम कलाकृती लोकांना पाहायला मिळेल आणि हा सिनेमा कुठेही एकसूरी किंवा प्रोपगंडा वाटणार नाही याची खात्री याच्या मेकर्सनी घेतली असेलच.
बाकी सिनेमा कसा असेल, कंगनाचं यात कितपत योगदान असेल, हा सिनेमादेखील तिच्या इतर फिल्मप्रमाणे सुपरहीट होणार का? हे सगळं येणारा काळच ठरवेल!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.