स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज म्हणवणारे काँग्रेसचे ‘ते’ मुख्यमंत्री काळाच्या पडद्याआड!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
धार्मिक गोष्टींचा दाखला देऊन राजकारण करू नये असं राजकीय नेते आपल्या भाषणात सांगत असतात. भारतातील प्रमुख राजकीय पक्षांपैकी भाजपाकडे नेहमीच हिंदुत्ववादी पक्ष म्हणून बघितलं जातं. भाजपा सुद्धा ही गोष्ट आता मान्य करते.
काही वर्षांपूर्वी शिवसेना पक्षसुद्धा केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवायचा आणि आपल्या मतांवर ठाम रहायचा. काँग्रेस हा असा पक्ष आहे ज्याने नेहमीच स्वतःला ‘सेक्युलर’ म्हणजेच ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणून लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न केला आहे.
पण, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, काँग्रेसमध्ये एक वरिष्ठ नेता आहे ज्याने लोकांच्या धार्मिक भावनांना साद देऊन निवडणूक जिंकली आहे. ६ वेळेस हिमाचल प्रदेशचं मुख्यमंत्री पद भुषवणाऱ्या आणि लोकसभा खासदार असलेल्या या नेत्याचं नाव आहे ‘वीरभद्र सिंग’.
आज वीरभद्र सिंग हे कालवष झाले, हिमाचल प्रदेशचे ६ वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले वीरभद्र यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं आहे!
‘वीरभद्र सिंग’ हे स्वतःला श्री कृष्णाच्या १२१ व्या पिढीचे वंशज म्हणवतात. त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण पुत्र प्रद्युम्नने सध्या हिमाचल प्रदेशमध्ये मोडणाऱ्या सोनीतपूर या ठिकाणाहून राज्य केलं होतं अशी इतिहासात नोंद आहे.
सोनीतपूरचं नंतर सराहनपूरमध्ये परिवर्तन झालं. सराहनपूरमध्ये प्राचीन काळातील एक राजवाडा आहे. या राजवाड्यात एक वंशावळ तयार करून ठेवली आहे.
या वंशावळीतील १२१ वी पिढी ही राजा पदम सिंग यांची होती. त्यांची नववी पत्नी होती शांती देवी. ‘वीरभद्र सिंग’ हे त्यांचे सुपुत्र आहेत. या नात्याने ‘वीरभद्र सिंग’ हे श्रीकृष्णाचे वंशज आहेत.
वीरभद्र सिंग यांनी ही ओळख स्थानिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यानसुद्धा वापरली आहे. श्रीकृष्णाच्या नावाने आणि कृपेने वीरभद्र यांची राजकीय कारकीर्द कशी बहरत गेली? जाणून घेऊयात.
वीरभद्र सिंग यांचा जन्म २३ जून १९३४ रोजी सराहनपूर येथे झाला. शिमला मधील कॅम्ब्रिज शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं. ते त्यावेळी शिमलाच्या जवळच्या राज्याचे ‘राजकुमार’ होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या स्टीफन कॉलेज मधून बी.ए.चं शिक्षण पूर्ण केलं.
कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी जुब्बलच्या राजकुमारी सोबत त्यांनी लग्न केलं. इतिहासाचे शिक्षक बनण्याची वीरभद्र यांची इच्छा होती. पण, त्या दरम्यान त्यांची पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत भेट झाली. या भेटी नंतर वीरभद्र यांनी सक्रिय राजकारणात काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
राजेशाही घराण्यात बालपण गेलेल्या वीरभद्र यांना सुरुवातीच्या काळात काँग्रेस पक्षात स्वतःला सामावून घेण्यास परिश्रम घ्यावे लागले होते. त्यांना त्यांच्या मतदार संघात “राजा साहिब” या नावाने सुद्धा ओळखलं जायचं.
–
हे ही वाचा – जेव्हा संघाचा कार्यकर्ता भारताच्या सर्वात शक्तिशाली दलित महिलेची आब्रू वाचवतो…
–
काही काळात त्यांनी लोकांचा संपर्क वाढवला आणि त्यांनी राजकारण कसं चालतं? हे समजावून घेतलं १९६२ मध्ये त्यांनी वयाच्या २८ वर्षी काँग्रेस पक्षाकडून शिमला लोकसभा मतदारसंघातून खासदार पदाची निवडणूक जिंकली.
१९८३ मध्ये शिमलाचं मुख्यमंत्री पदाची निवडणूक त्यांनी स्वबळावर जिंकली होती. सध्या शिमला येथे वास्तव्य असलेल्या वीरभद्र सिंग यांच्या नावावर १९८३ नंतर सर्वात जास्त काळ हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम आहे.
या दरम्यान, १९९० मध्ये जनता दलच्या ‘शांता कुमार’ यांच्याकडून वीरभद्र सिंग यांना पराभव पत्करावा लागला होता. पण, जनता दलचं सरकार अडीच वर्षात पडलं आणि नोव्हेंबर १९९३ मध्ये वीरभद्र यांनी परत एकदा हिमाचल प्रदेशचं मुख्यमंत्री पद मिळवलं.
या विजयानंतर हिमाचल प्रदेशमध्ये ‘वीरभद्र सिंग’ यांना टक्कर देईल असा विरोधी पक्ष नेता तयारच झाला नाही. १९९८ मध्ये भाजपाच्या प्रेमकुमार धुमल यांनी फक्त वीरभद्र यांना सत्तेवरून खाली खेचलं. हे सरकार पाच वर्ष चाललं आणि त्या काळात वीरभद्र यांनी केंद्र सरकार मध्ये आपलं वजन वाढवलं.
२००३ मध्ये ‘वीरभद्र सिंग’ यांनी पुन्हा वापसी केली आणि हिमाचल प्रदेशचं मुख्यमंत्री पद परत एकदा मिळवलं. ते खासदार असलेल्या मंडीच्या लोकसभा मतदारसंघात वीरभद्र यांनी आपल्या दुसऱ्या पत्नी प्रतिभा सिंग या २००४ मध्ये खासदार म्हणून नियुक्त केलं.
त्यांच्या पहिल्या पत्नी रतन कुमारी यांचं १९८३ मध्ये निधन झालं होतं. रतन कुमारी आणि वीरभद्र यांना ४ मुली होत्या. पण, राजकीय वारस मुलगा असावा म्हणून ‘वीरभद्र सिंग’ यांनी १९८५ मध्ये त्यांच्यापेक्षा २५ वर्षांनी लहान प्रतिभा सिंग यांच्याशी विवाह केला.
प्रतिभा सिंग यांच्यापासून वीरभद्र यांना एक मुलगा ‘विक्रमादित्य’ आणि एक मुलगी ‘अपराजिता’ ही आपत्य आहेत.
२००७ मध्ये प्रेमकुमार धुमल यांच्याकडून हरल्यानंतर ‘वीरभद्र सिंग’ यांनी पुन्हा केंद्राची वाट धरली. प्रतिभा सिंग यांना खासदारकीचा राजीनामा द्यायला लावून त्यांनी स्वतः मंडीमधून खासदारकीची निवडणूक जिंकून केंद्रात सक्रिय राहण्याचं ठरवलं.
भ्रष्टाचाराचे आरोप :
वीरभद्र सिंग हे तत्पूर्वी २००९ ते २०११ मध्ये केंद्र सरकरमध्ये उद्योगमंत्री म्हणून कार्यरत होते. २०१२ मध्ये वीरभद्र यांना काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे सचिव म्हणून नेमण्यात आलं. काँग्रेसच्या विजयानंतर त्यांना ६ व्या वेळी २०१२ मध्ये परत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून नेमलं.
८ वेळेस लोकसभा खासदार आणि ६ वेळेस मुख्यमंत्री पद भुषवणारे ते एकमेव राजकीय नेते आहेत. हे पद टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी कौल सिंग ठाकूर यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्यापासून रोखून ठेवलं.
प्रत्येकवेळी कौल सिंग ठाकूर या हिमाचल प्रदेशच्या दुसऱ्या मोठ्या नेत्याला बढतीचे संकेत मिळायचे, तेव्हा वीरभद्र हे काँग्रेस ‘हाय-कमांड’ कडे आपला राजीनामा पाठवायचे. वीरभद्र यांना समजावून सांगितलं जायचं आणि त्यांचं हिमाचल प्रदेशमधील सर्वोच्च स्थान टिकून ठेवलं जायचं.
२००९ मध्ये वीरभद्र सिंग आणि त्यांची पत्नी प्रतिभा सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. २००७ पासून विरोधी पक्षाने चौकशीची मागणी सुरू केली होती ज्यावर २००९ मध्ये कार्यवाही करण्यात आली होती.
२०११ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपातून काँग्रेस पक्षाने लक्ष घालून वीरभद्र सिंग यांची सर्व आरोपातून मुक्तता करवून घेतली आणि त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पद दिलं.
२०१५ मध्ये वीरभद्र सिंग यांना सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. ६ करोडची रोकड आणि ११ अवैध मालमत्ता असा आरोप सिंग दाम्पत्यावर करण्यात आला होता.
प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं. सुप्रीम कोर्टाने या चौकशीवर तब्येतीच्या कारणावरून स्थगितीचा निर्णय दिला. २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाने सिंग दाम्पत्याला सीबीआयच्या चौकशीला पुन्हा सामोरं जाण्यासाठी सांगितलं आहे.
१९८९ मध्ये अंबुजा सिमेंटला हिमाचल प्रदेशमध्ये दिलेल्या जागेवरून सुद्धा वीरभद्र सिंग यांना मोठ्या वादाला सामोरं जावं लागलं होतं. प्रतिभा सिंग यांनी अंबुजा सिमेंटकडून स्वतःच्या नावावर खूप मोठी मालमत्ता करून घेतली होती.
या प्रकरणातून ‘वीरभद्र सिंग’ यांनी आपली व पत्नीची सुटका करवून घेतली होती. पण, ईडीच्या चौकशीतून मात्र त्यांना बाहेर पडणं शक्य झालं नाही. कारण, यावेळी पूर्ण सिंग कुटुंबावर चौकशीचे अधिकार ईडीकडे होते. ४० करोडच्या अवैध मालमत्तेवर ईडी ने जप्ती आणली होती.
हिमाचलच्या लोकांचा विरोध :
हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या एका ‘गुडीया गॅंग रेप’ प्रकरणानंतर मात्र लोकांचा वीरभद्र यांच्या नेतृत्वावरून विश्वास पूर्णपणे उठला. २०१७ मध्ये झालेल्या हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपाच्या राम ठाकूर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
सध्या ते अरकि मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार म्हणून कार्यरत आहेत.
राजकीय कारकिर्दीत असतांना ‘वीरभद्र सिंग’ यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा आपलं योगदान दिलं आहे. संस्कृत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवलं आहे.
वीरभद्र हे खरंच जर श्रीकृष्णाचे वंशज असतील तर त्यांच्याकडून झालेला इतका भ्रष्टाचार आणि सत्तेसाठी इतर नेत्यांची थांबवलेली प्रगती ही कोणालाही मान्य होणार नाही हे नक्की!
पण असो कालाय तस्मै नमः म्हणायचं, वीरभद्र यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
===
हे ही वाचा – “सुपुत्राने” असे काही ‘गुण उधळले’, की त्यांचं पंतप्रधानपदाचं स्वप्नच धुळीला मिळालं…!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.