‘चोली के पीछे’साठी डायरेक्टरची लज्जास्पद मागणी: नीना गुप्तांनी सांगितली आठवण…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बॉलिवूडमध्ये बॉडी शेमिंग हा प्रकार काही नवा नाही. हिरॉइनचं वजन अपेक्षेपेक्षा जास्त असेल तर तिला हमखास ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, तर एखादी हिरॉइन बारीक असेल तर तिच्यासाठीही नापसंती व्यक्त केली जाते.
याचाच अर्थ डिरेक्टर, कॅमेरामन आणि प्रेक्षक या सर्वांच्या एकत्रित पसंतीनुसार, म्हणजेच ३६-२४-३६ अशी मापात असलेलीच हिरॉइन ‘परफेक्ट’ मानली जाते. आजही गुण, अभिनय कौशल्य यांपेक्षा हिरॉइनची फिगर आणि रुप यांनाच प्राधान्य दिलं जातं हे वास्तव आहे.
एखाद्या महिलेसाठी शरीराीक अशा प्रकारची चिकित्सा होणं ही अत्यंत अपमानास्पद बाब आहे. तर केवळ तरुण आणि नवख्या मुलींनाच अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याबाबत घडलेला हा विचित्र प्रसंग.
===
- बाई आणि ब्रा – या विळख्यात ‘तिला’ अडकवणाऱ्यांना हेमांगी कवीचा सणसणीत टोला
- संस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका, मनावर वाईट संस्कार होतील…
===
अभिनेत्री निना गुप्ता यांचं ‘सच कहू तो’ हे आत्मचरित्र नुकतंच प्रसिद्ध झालं. अभिनय क्षेत्रातील कारकीर्द, वादग्रस्त लग्न, मुलगी मसाबा आणि त्यांचे नाते अशा वेगवेगळ्या घटनांबाबत त्यांनी उघडपणे या पुस्तकात लिहीलं आहे.
मात्र या सगळ्यापेक्षा त्यांच्या आत्मचरित्रातील एका प्रसंगाने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे त्यांच्या चाहत्यांमध्येही कुजबुज सुरु झाली आहे. आपली कारकीर्द उत्तम सुरु असताना एका प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक आणि स्त्री कडे पाहण्याचा गलिच्छ दृष्टिकोन यांबद्दल नीना गुप्ता यांनी बिन्धास्तपणे आपली कथा मांडली आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
नेमकं काय घडलं
“चोली के पिछे क्या है” हे गाणं आजही गुणगुणलंं जातं. माधुरीच्या अदांनी सजलेल्या या गाण्याच्या अर्थाबाबत त्यावेळीही अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या.
“चोली के पिछे क्या है” या प्रश्नाचा नेमका अपेक्षित अर्थ आंबटशौकिनांना बरोबर कळला अर्थात गाण्यातही तोच अर्थ संगीतकार-गीतकारांना अपेक्षित होता, मात्र “चोली मे दिल है मेरा” असं उत्तर देत तात्पुरतंं समाधान करण्याचा प्रयत्न गाण्यातून करण्यात आला होता.
अर्थात गाण्याच्या अर्थाला अपेक्षित असं दिग्दर्शन करण्याची जबाबदारी सुभाष घई यांनी स्विकारली होती. सुभाष घई यांचा इतिहास लक्षात घेता अशा प्रकारची गाणी, त्याचे अर्थ आणि त्याला न्याय देण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ही बाब अपेक्षितच होती.
तर नेमकं तसंच झालं. या गाण्यात माधुरी दिक्षितसह नीना गुप्ताही सहभागी होत्या. तरुण माधुरीच्या लाडीक अदा असल्या तरी मध्यमवयीन निना यांनी संयत अभिनय करण्याचं ठरवलं.
===
- अभिनेत्रीने केलाय अत्याचाराचा खुलासा, अभिनेत्यांसह राजकारण्यांचाही समावेश
- “मला छातीचा आकार वाढवण्यास सांगितलं गेलं होतं”: दीपिकाचा धक्कादायक गौप्यस्फोट
===
या गाण्यासाठी त्या दोघींनाही गुजराती पद्धतीचा ड्रेस देण्यात आला. ‘कॉश्चुम अप्रुव्हल’ अर्थात पोषाखाबाबत दिग्दर्शकाची संमती घेण्याची बॉलवूडची प्रथा त्यावेळीही पाळली गेली.
आपला पोषाख दाखवण्यासाठी नीना गुप्ताही सुभाष घई यांच्याकडे गेल्या, मात्र त्यांना पाहताच सुभाष घई किंचाळले, नीना गुप्ता यांच्या छातीकडे बोट दाखवत ते म्हणाले, “इसमे कुछ भरो. ये गाने के लिए ऐसे नही चलेगा”. ही टिका करताना सुभाष घईंचे हावभाव अश्लिल असल्याचेही निना यांनी पुस्तकात मांडले आहे.
–
- दिग्दर्शकाची प्रियंकाकडे अंतर्वस्त्र दाखवण्याची मागणी – बॉलिवूडचा दबंग आला धावून
- विचित्र वाटेल, पण हे अंतर्वस्त्र नको म्हणून महिलांनीच आंदोलन केलं होतं…वाचा
–
याचाच अर्थ गाण्याला अपेक्षित असल्यानुसार नीना यांच्या छातीचा आकार तितकासा योग्य नाही हे सर्वांसमोर सुभाष घईंनी सांगितले. हा प्रसंग घडला तेंव्हा सेटवर अनेक कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.
या सर्वांसमोर अशा प्रकारची टिकाटिपणी सहन करणाऱ्या नीना यांना प्रचंड लाज वाटली. मध्यमवयीन स्त्रीच्या शरीराकडे पाहण्याचा असा घाणेरडा दृष्टिकोन पहिल्यांदाच समोर आल्याने आपण तिथून निघून गेलो, आणि आपला राग व्यक्त करण्यासाठी त्या संपुर्ण दिवसभरात एकही सीन शूट न केल्याचेही नीना यांनी पुस्तकात म्हटलं आहे.
त्यानंतर चित्रपटातील इतर सहकलाकार, कश्च्युम डिझायनर या सर्वांनी नीना यांची समजूत घातली. अखेरिस दुसऱ्या दिवशी त्या सेटवर पोहोचताच त्यांच्या हाती जे कपडे देण्यात आले त्यातील ब्लाऊज हा जाड्या पॅड्सनी भरण्यात आला होता.
हा ब्लाऊज पाहताना नीना यांना धक्का बसला, अखेरिस सुभाष घई यांनी आपलेच म्हणण खरे केले होते. योग्य फिगर नसल्याने पॅड्सचा आधार घेत नीना यांच्यासाठी ‘खास’ ब्लाऊज अर्थात चोली तयार करण्यात आली होती, दिवसभर ते कपडे घालून वावरताना अत्यंत अपमानास्पद वाटत असून स्त्री म्हणून दुःखही होत असल्याचे नीना यांनी सांगितले.
त्यावेळी सुभाष घई यांच्या वागण्याची प्रचंड चीड आली असून पुरुष म्हणून त्यांची घृणाही वाटल्याचे त्यांनी मान्य केले आहे. मात्र कालांतराने हा राग निवळला, त्यांनी ही टिका पुरुष म्हणून केली नव्हती, तर कलाकृती उत्तम व्हावी यासाठी त्यांनी अनवधानाने असे म्हटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना माफ केल्याचेही निना यांनी स्पष्ट केले आहे.
आपल्या आत्मचिरित्रात नीना यांनी यासह इतर अनेक गोष्टींचा बेधडक गौप्यस्फोट केला असून सध्या त्यांचे हे पुस्तक प्रचंड चर्चेत आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.