अभिनेत्रीने केलाय अत्याचाराचा खुलासा, अभिनेत्यांसह राजकारण्यांचाही समावेश
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तीन वर्षांपुर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात #metoo चळवळीचं पेव फुटलं.
बॉलिवूडमध्ये येणाऱ्या नवख्या तरुणींवर होणारे शारिरीक अत्याचार, चित्रपटातील भुमिकेसाठी केली जाणारी शरीरसुखाची मागणी या तक्रारी काही नव्या नाहीत. झगमगत्या बॉलिवूडला मिळालेला हा शाप वर्षानुवर्षापासून कायम आहेत. दुर्दैवी आणि भयावह असला तरी या प्रवाहात अनेक तरुण आल्या आणि हे अत्याचार सहन करत आपल्या ध्येयापर्यंतही पोहोचल्या.
प्रियंका चोप्रा, तब्बु, कंगना राणौत यांसारख्या बड्या कलाकारांना कास्टिंग काऊचसारख्या गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागलं तिथे नवख्या मुलींची काय कथा?
फरक एवढाच होता की अनेकींनी तोंड दाबून हा बुक्क्यांचा मार सहन केला मात्र काहींनी पुढे येऊन या अत्याचाराला वाचा फोडण्याचा किमान प्रयत्न केला.
२०१८ साली तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर भारतीय मिडीयात जसा गोंधळ उडाला, ब्रेकिंग न्यूजने खळबळ माजली आणि बॉलिवूडकरांसह प्रेक्षकांची झोप उडाली तसंच काहीसं सध्या टॉलिवूडमध्ये सुरु आहे.
–
हे ही वाचा – दिग्दर्शकाची प्रियंकाकडे अंतर्वस्त्र दाखवण्याची मागणी – बॉलिवूडचा दबंग आला धावून
–
एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यावर झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचल्याने टॉलिवूडमध्ये मोठा गहजब माजला आहे. मात्र या प्रकरणातलं वैशिष्ट्य म्हणजे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे राजकारण, उद्योगक्षेत्र अशा अनेकांदे धाबे दणाणले आहेत.
कोण आहे ही अभिनेत्री? तिने कोणावर आरोप केलेत? तिच्याबाबत नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात…
नेमकं काय घडलं
मल्याळम अभिनेत्री रेवथी संपथ हिने सोशल मिडीयाचा आधार घेत आपल्यावर झालेल्या अत्याचारांचा खुलासा केला. सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असलेल्या रेवथीचा चाहतावर्ग मोठा आहे मात्र यावेळी तिने केलेल्या फेसबुक पोस्टने अनेकांची झोप उडवली.
रेवथीने सोशल मिडीयाच्या या पोस्ट मध्ये आपल्यावर अनेक वर्षांपासून शारिरीक, मानसिक अत्याचार झाल्याचे म्हटले आहे. या १४ जणांची आज मी थेट नावं जाहीर करत असून या सर्वांनी माझ्यावर शारिरीक, मानसिक तसेच भाविनक आघात केले आहेत. यांच्यापैकी काहींना माझ्यावर शाब्दिक अत्याचार करत वेळोवेळी अपमान केल्याचेही तिने म्हटले आहे.
या चार ओळींच्या फेसबुक पोस्टपेक्षा तिने थेट नोंदवलेल्या १४ नावांमुळे हे प्रकरण सध्या गाजत आहे. विशेष म्हणजे रेवथीने आरोप केलेल्या नावांमध्ये चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळातील कााही नावं असल्याने आता या प्रकरणाचा भडका उडाला आहे.
कोण आहेत आरोपी?
राजेश तौचरेवर (दिग्दर्शक), अभिनेता सिद्धीकी, फोटोग्राफर आशिक माही, अभिनेता शिजू, केरळ फॅशन लीगचे संस्थापक अभील देव, सुप्रसिद्ध डॉक्टर अजय प्रभाकर, डोमॅस्टिक युथ फेडरेशनचे सदस्य नंदु अशोकन अशा काहींचा समावेश आहे.
एकूण १४ नावांचा यात समावेश असला तरी नंदु अशोकन, पुनथुरा पोलिस स्थानकातील सब इन्स्पेक्टर बिनू, प्रसिद्ध अभिनेता सिद्धीकी या तीन नावांचा उल्लेख असल्याने अनेेकांच्या भुवया उंचावल्यात.
राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असल्याने केरळ सरकारमध्येही या प्रकरणाची चर्चा सुरु झाली असून थेट पोलिसाचे नाव आल्याने सुरक्षा यंत्रणेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
–
हे ही वाचा – स्पृहा जोशीचा हा अनुभव मराठी इंडस्ट्रीला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे!
–
रेवथीच्या या पोस्टवर चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील तिचे सहकलाकार, तंत्रज्ञ यांनीही प्रतिसाद दिला आहे. मात्र यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. अनेकांनी रेवथीचे तोंडभरून कौतुक केले असून तिने दाखवलेली धिटाई, निडरता यांसाठी तिची पाठ थोपटली आहे.
मात्र तब्बल १४ जणं अत्याचार करेपर्यंत ही अभिनेत्री शांत कशी बसली? यापुर्वीच तिने तक्रार का केली नाही? तिने केलेली तक्रार खरी आहे की केवळ पब्लिसिटी स्टंट? अशा अनेक चर्चांना उधाण आलंय.
रेवथीच्या या खुलाशाने टॉलिवूडला चर्चेचा नवा विषय मिळाला असल्याने आता या प्रकरणात नेमकी कुणावर कारवाई होते? रेवथीची तक्रार खरी ठरते का? या प्रश्नांच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॉलिवूडमध्ये सध्या शांत असलेल्या या metoo च्या चळवळीला पुन्हा जोर येईल का? रेवथीचा आदर्श समोर ठेवून पुन्हा काही अभिनेत्री पुढे येतील का? अशा चर्चाही नव्याने सुरु झाल्या आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.