' लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करताय? सावधान! या ५ गंभीर आजारांचा धोका संभवतो – InMarathi

लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करताय? सावधान! या ५ गंभीर आजारांचा धोका संभवतो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘वर्क फ्रॉम होम’मुळे प्रत्यक्ष कामाचे तास वाढले आहेत आणि त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं कठीण झालंय. असं असतानाही या वर्क फ्रॉम होमचा एक मोठा फायदाही सगळ्यांनाच लक्षात आलाय आणि तो म्हणजे आपल्याला हव्या त्या पद्धतीने, हव्या त्या कपड्यात, हव्या त्या जागी, हवं तसं बसून काम करणं सुद्धा शक्य झालं आहे.

व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर फक्त शरीराचा वरचा भाग दिसत असल्याने, हाफ पॅन्ट किंवा शॉर्ट्सवर शर्ट आणि ब्लेझर घालून मिटींग्स अटेंड करण्यापासून ते सोफ्यावर किंवा बेडवर लोळून काम करण्यापर्यंत सारं काही करण्याची सवय कित्येकांना लागली आहे.

एका बाजूला कामाचा वाढलेला व्याप, कुठे पगारात झालेली कपात याचबरोबरीने नाण्याची दुसरी बाजू म्हणून ही आरामदायक कार्यपद्धती सुद्धा हवीशी वाटतेय.

याच कार्यपद्धतीमधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम करणं. आरामात बसायचं असेल, तर  टेबल-खुर्ची घेऊन, लॅपटॉप नीट टेबलावर ठेऊन काम करणं या पद्धती अगदी सहजपणे नाकारल्या जातात.

 

laptop on table inmarathi

 

लॅपटॉप असा मांडीवर ठेऊन काम कारणं सोयीस्कर आणि फायदेशीर वाटतं असलं, तरी त्याचे गंभीर दूरगामी परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. आरोग्यासाठी चुकीच्या असणाऱ्या अनेक पद्धतींमुळे डोकं वर काढणारा कॅन्सर तर डोकेदुखी ठरू शकतोच, मात्र याशिवाय इतरही काही गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.

लॅपटॉप मांडीवर ठेवण्याचे नेमके काय दुष्परिणाम होऊ शकतात, ते आज जाणून घेऊयात.

===

हे ही वाचा – ही लक्षणं म्हणजे एका गंभीर समस्येची सुरुवात… अशा त्रासांकडे दुर्लक्ष करू नका

===

१. त्वचेसाठी धोकादायक

सातत्याने लॅपटॉपचा वापर केल्यास, तो गरम होतो हे तर आपल्याला माहित आहेच. सतत या उष्णतेचा मारा त्वचेवर होत राहिला, तर ते त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय घटक ठरतं.

त्वचेवर रॅशेस येण्याचा धोका संभवतो. यामुळे त्वचेचा रंग कायमचा बदलून जाण्याचा धोकासुद्धा असतो. सतत लॅपटॉप मांडीवर ठेवत असाल, तर नकळतपणे तुम्ही तुमच्या त्वचेची हानी करत आहात. या आजाराला टोस्टेड स्किन सिंड्रोम असं म्हणतात.

 

toasted skin syndrome inmarathi

 

२. पाठदुखी आणि मानदुखी

होय, बरोबर वाचलंत. मांडीवर लॅपटॉप ठेवल्याने पाठदुखी आणि मानदुखीचा धोका संभवतो. मांडीवर लॅपटॉप असेल, तर मान सतत तिरकी करून लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहिलं जाणारं. याशिवाय माडीवर लॅपटॉप ठेऊन बसण्याच्या पध्द्तीमुळे शरीराची ढब काहीशी बिघडते. याचा ताण पाठीच्या स्नायूंवर सुद्धा पडतो.

लॅपटॉप मांडीवर असताना पोक काढून बसण्याची शक्यता असते. यामुळे सुद्धा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.

 

backpain inmarathi

===

हे ही वाचा – पाठदुखीने बेजार झालाय? घरगुती व्यायामाचा फायदा नक्कीच होऊ शकेल…

===

३. पालकत्व धोक्यात

कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण, वापरत असाल तर त्यातून होणाऱ्या रेडिएशन्सचा आरोग्याला नेहमीच धोका असतो. लॅपटॉप सुद्धा वायफायसारख्या सिग्नल्सचा वापर करत असतो. अशावेळी या रेडिएशन्सचा शरीरावर परिणाम होतो.

लॅपटॉप सतत मांडीवर असेल, तर पुरुषांचा स्पर्म काउन्ट कमी होणे, स्त्रियांच्या अंडाशयची क्षमता कमी होणे या गोष्टींचा धोका असतो. असं झाल्यास भविष्यात त्याचे गंभीर परिणाम गर्भधारणेवर होऊ शकतात.

 

pregnancy inmarathi2

 

४. कॅन्सरचा धोका

तंत्रज्ञान विकसित होत असताना, जीवन सुकर करण्याच्या नादात आपण अशा अनेक सवयी लावून घेतल्या आहेत, की ज्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण मिळत असतं.

लॅपटॉप सतत गरम होत असल्याने त्वचेवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो, हे तर आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे. त्वचेवर होणार हा गंभीर परिणाम केवळ टोस्टेड स्किन सिंड्रोमपर्यंत सीमित न राहता, त्वचेचा कर्करोग होण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतो.

 

cancer inmarathi

 

याशिवाय जननेंद्रियांवर सुद्धा लॅपटॉपचा परिणाम होत असल्यामुळे या भागातील कॅन्सरचा धोका सुद्धा संभवतो.

५. झोपेचा बट्याबोळ

दिवसभर आणि विशेषतः झोपण्याच्या वेळेआधी लॅपटॉपचा वापर करणं शरीर स्वास्थ्यच नाही, तर मानसिक स्वास्थ्यासाठीही हानिकारक आहे.

अनेकजणांना लॅपटॉप मांडीवर घेऊन अर्धवट झोपलेल्या स्थितीत लॅपटॉप वापरण्याची सुद्धा सवय असते. अशावेळी लॅपटॉपची स्क्रीन थेट डोळ्यांसमोर आणि डोळ्यांपासून काही अंतरावर असते. यामुळे लॅपटॉपमधून बाहेर पडणारे किरण, थेट डोळ्यात जातात. याचा वाईट परिणाम झोपेवर होऊ शकतो.

 

late night sleeping girl InMarathi

 

अशा पद्धतीने लॅपटॉप वापरत असाल, आणि रात्रीच्या झोपेचं खोबरं झालं असेल, तर काही दिवस अशा पद्धतीने लॅपटॉपचा वापर थांबवून पहा, झोपेवर फरक पडलेला नक्की जाणवेल.

===

हे ही वाचा – लॅपटॉपसमोर बसून डोळ्यांवर ताण येतोय? डोळ्यांची निगा राखण्यासाठी या ७ टिप्स फायदेशीर ठरतील

===

काय  काळजी घ्याल?

लॅपटॉप वापरताना शक्यतो तो मांडीवर ठेवावा लागणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. असं न करणं शक्यच नसल्यास, सतत एकाच ठिकाणी बसून लॅपटॉप मांडीवर राहणार नाही याची काळजी घ्यावी.

 

laptop on lap inmarathi

 

एकाच ठिकाणी बसून सतत स्क्रीनकडे बघत राहिल्याने मागे लागू शकणारी पाठदुखी आणि मानदुखी टाळण्यासाठी मधेमधे ब्रेक घ्या. सतत मान आणि पाठ एकाच स्थितीत राहिल्याने उद्भवणारा धोका कमी होऊ शकेल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?