' लसीकरणाच्या सर्टिफिकेटमध्ये घोळ झालाय? आता फिकर नॉट… अशी करता येणार दुरुस्ती.. – InMarathi

लसीकरणाच्या सर्टिफिकेटमध्ये घोळ झालाय? आता फिकर नॉट… अशी करता येणार दुरुस्ती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोनाची दुसरी लाट येण्याआधीच देशात लसीकरणाला सुरवात झाली होती, सुरवातीला लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला. कारण ज्या लोकांनी लस घेतली होती त्यांना लसीचे दुष्परिणाम जाणवले, त्यामुळे लोक लसीबाबत धास्तावलेले.

दुसऱ्या लाटेने जेव्हा थैमान घालण्यास सुरवात केली, तेव्हा अचानक लोक लसीकरण केंद्राकडे धावू लागले. सुरवातीला ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना लस देण्याचे आदेश दिले होते. ‘१ मे नंतर १८ वर्षाच्यापुढील लोकांना लसी द्यायला सुरवात करा’, असे आदेश आले आणि मग गोंधळ उडाला तो लसीचा.

 

modi vaccination inmarathi

 

आपला देश भौगोलिकरीत्या अमेरिकेपेक्षा लहान असला तरी आपली लोकसंख्या अमेरिकेपेक्षा जास्त आहे, त्यामुळे साहजिकच लसींचा तुटवडा होणार, काही तज्ज्ञांच्या मते किमान २ वर्ष लागतील पूर्ण देशातील लोकांचे लसीकरण करायला.

नुकताच पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधून विविध मुद्द्यांबद्दल सविस्तर माहिती दिली, त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे मोफत लसीकरण, सरकारी ठिकाणी लस मोफत दिली जाणार आहे तर खाजगी रुग्णालयात लस १५० रुपयांच्या आतच दिली जाईल.

 

corona vaccination center inmarathi

हे ही वाचा – कोरोनाची दुसरी लस घेण्यास उशीर झाला तर? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरं

काही लोकांनी लस थेट सरकारी रुग्णालयात जाऊन घेतली तर काही लोकांनी कोव्हीन अँप्लिकेशनवर अपॉइंटमेंट बुक करून घेतली. अनेकांच्या कोव्हीन अँपमध्ये अडचणी आल्या होत्या. लस घेतल्या घेतल्या काही जणांनी तर लसीचे सर्टिफिकेट लगेचच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकले.

अँप्लिकेशन मध्ये सरकारने काही अपडेट आणले आहेत. वाढता गोंधळ लक्षात घेता, सरकराने ही पाऊले उचलली आहेत. या अपडेटमध्ये सर्टिफिकेट एखादी चूक झाल्यास ती सुधारू शकतो, हा अपडेट करण्यात आला आहे.

 

काय आहे नवीन अपडेट?

आपल्या सर्टिफिकेटमध्ये जर आपण दिलेल्या माहितीमध्ये जर बदल करायचे असल्यास, कुठे ही धावाधाव करायची गरज नाही, घरबसल्या आपण ते बदल करू शकतो. कसे ते जाणून घ्या..

 

aarogysetu 1 inmarathi

 

  • सर्वात प्रथम कोव्हीनच्या अधिकृत वेबसाइट वर जावे. www. cowin.gov.in
  • त्यांनतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरने लॉग इन करावे.
  • लॉग इन केल्यांनतर अकाउंट डिटेल्स मध्ये जावे.
  • आपण जर पहिला अथवा दुसरा लसीचा डोस घेतला असल्यास Raise an issue हे बटन दिसेल.
  • यावर क्लिक करून changes in certificate वर क्लिक करावे.
  • त्या नंतर आपण आपले नाव, वय, लिंग यामध्ये बदल करू शकता.

 

आरोग्य सेतूवर ब्लू टिक:

मागच्याच महिन्यात सरकारने आरोग्य सेतू अँप वर ब्लू टिक आणण्याचे ठरवले, ब्लू टिक म्हणजे त्या व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याचा फायदा असा की तुम्हाला ठिकठिकाणी जाताना सर्टिफिकेटची गरज नाही. अँपवरील ब्लू टिक म्हणजे त्या व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

 

aarogysetu aap inmarathi

हे ही वाचा – ‘या’ उपायांनी कोरोना रुग्णांची ऑक्सिजन पातळी काही काळापुरती राहू शकते सामान्य

 सर्टिफिकेट शेअर न करण्यास सांगितले आहे:

वाढते सायबर क्राईम लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे की ‘कोणत्याही व्यक्तीने लसीचे सर्टिफिकेट सोशल मीडियावर टाकू नये’,त्या व्यक्तीच्या नावाचा, गैरवापर होऊ शकतो. खरबदारी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?