“मला तहान लागली आहे, विमान इथेच लँड करा” – लालूप्रसाद यांनी केली अजब मागणी…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
विमान धावपट्टीकडे वळायला सुरुवात होते, आणि तेवढ्यात एका प्रवाशाचा फोन वाजतो. त्याला फोन बंद करण्याची सूचना देण्यात येते, तरीही तो फोनवर बोलत राहतो. एव्हाना विमानाने उड्डाण केलेलं असतं आणि त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावरील भाव बदली लागतात. चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसू लागतो.
विमान उड्डाण पूर्ण करतच असतं, इतक्यात तो प्रवासी सीट बेल्ट काढून उठतो. चेहऱ्यावर अस्वस्थ अधिक अस्वस्थ भाव, उजवा हातात छातीच्या डाव्या बाजूला गच्च धरून ठेवतो आणि तसाच तो खाली कोसळतो. प्रवाशाला हार्ट अॅटॅक आल्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात येतं. हे दृश्य कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय ना?
ज्यांना आठवलं, नसेल त्यांच्यासाठी हे पुढचं दृश्य सांगतो. तो प्रवासी आता व्हीलचेअरवर आहे, सोबतीला एक डॉक्टर, विमानतळावरील स्टाफमधील एक महिला आहे आणि अचानक व्हीलचेअरवरून उठून प्रवासी उड्या मारायला सुरुवात करतो. ‘मी आता एकदम ओके आहे’ असं म्हणत जे धावत सुटतो, ते थेट विमानतळाबाहेर धूम ठोकतो.
बरोब्बर… थ्री इडियट्स चित्रपटाचा पहिला सीन…!! चित्रपट प्रदर्शित होऊन आज अनके वर्षं झाली, तरीही हा सीन तुम्हाला आठवत असेल.
===
हे ही वाचा – विमानात बसल्यावर मोबाईल ‘फ्लाईट मोड’ वर सेट करतात – कारण जाणून घ्या!
===
हे असं फक्त चित्रपटात घडू शकतं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही साफ चूक आहात. ही अशी विचित्र मागणी आपल्या देशातील एका राजकारण्याने सुद्धा केली होती. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी चक्क तहान लागली म्हणून विमान लँड करण्याची विनंती केली होती.
चला तर मग, जाणून घेयात नेमकं काय घडलं, आणि त्यांची ही मागणी पूर्ण झाली की नाही…
त्यांचे किस्से लईच भारी…
लालू प्रसाद यादव हे नाव राजकीय विश्वात नेहमीच चर्चेचा विषय ठरलं आहे. मग ते त्यांचे घोटाळे असोत, त्यांना तुरुंगवास झालेला असताना त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळणं असो, लालूजी यांची अपत्यांची मोठी थोरली फौज असो, किंवा मग पाकिस्तानी पत्रकार महिलेशी फ्लर्ट करणं… एकूणच त्यांचे किस्से हसून हसून पुरेवाट होण्यासाठी पुरेसे आहेत.
त्यातलाच हादेखील एक किस्सा… बिहारी बाबू लालू यांना ट्रोल करण्यासाठी तुमच्या ज्ञानात भर पाडणारा!
===
हे ही वाचा – लालू प्रसाद फ्लर्ट करत पाकिस्तानी अँकरला चक्क “आती क्या घुमने?” म्हणाले होते…
===
काय घडलं त्यादिवशी?
ही गोष्ट आहे १९९१ सालची… त्याकाळी लालूप्रसाद यादव हे जनता दल युनायटेडचा भाग होते. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली होती. ओडिसामध्ये एका अधिवेशनात उपस्थित असलेले बिहारचे मुख्यमंत्री, त्यांचे काही सहकारी आणि पत्रकारांसह एका खाजगी विमानाने पटनाकडे निघाले होते.
विमानात बसल्यावर मुख्यमंत्री महोदयांनी जेवण पूर्ण केलं, आणि मग त्यांना तहान लागली. त्याकाळात, बाटलीमध्ये ‘मिनरल वॉटर’ विकलं जाण्याची पद्धत सुरु झाली नव्हती. लालूप्रसाद यादव यांना तहान तर फार लागली होती. आता आली का पंचाईत… पाणी मिळणार कसं हा मोठाच प्रश्न होता.
आज अस्तित्वात असलेलं झारखंड राज्य तेव्हा बिहारपासून वेगळं झालेलं नव्हतं. त्यामुळे रांची ही सध्याची झारखंडची राजधानी तेव्हा बिहारचाच भाग होता. पटनाकडे जाणारं विमान रांचीत थांबवता येईल, असा विचार लालू प्रसाद यादव यांनी केला आणि पायलटकडे रांचीमध्ये विमानाचं लँडिंग करण्याची विनंती केली.
पायलटचा नाईलाज आणि नाकारलेली परवानगी…
आता मुखमंत्री साहेबच विमान लँड करा म्हणतायत म्हटल्यावर पायलटचाही नाईलाज झाला. त्याने रांची विमानतळाला तशा सूचना पाठवल्या. तत्कालीन गृहराज्यमंत्री सुबोध कांत सहाय त्यावेळी रांची विमानतळावर उपस्थित होते. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विमान रांचीला उतरवण्यास मनाई करण्यात आली.
परवानगी नाकारेपर्यंत रांचीच्या विमानतळावर घिरट्या घालत राहिलेलं लालू प्रसाद यांचं ते विमान, मग पटनाच्या दिशेला निघून गेलं.
शेवटी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाणी पिण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली.
===
हे ही वाचा – ग्लासभर पाणी आणि एका वेड्यामुळे (!) शक्य झालं विमानाचं सेफ emergency लँडिंग…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.