' IIT विद्यार्थ्यांचा पहिला आणि मोठा यशस्वी डिजीटल ब्रॅंड: TVF ची पडद्यामागील कहाणी! – InMarathi

IIT विद्यार्थ्यांचा पहिला आणि मोठा यशस्वी डिजीटल ब्रॅंड: TVF ची पडद्यामागील कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतात ओटीटीने सध्या नुसता धुमाकूळ घातला आहे. लॉकडाउनमुळे सिनेमागृह बंद असल्याकारणाने बऱ्याच लोकांनी त्यांचा मोर्चा ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मकडे वळवला!

प्रथम प्राइम व्हीडियो, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, झी ५ पासून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मनी त्यांचे ओरिजिनल सिनेमे आणि वेबसिरिज यांची सवय लोकांना लावली, त्यामुळे आता लोक टेलिव्हिजन बघण्यापेक्षा वार्षिक मेंबरशिप घेऊन या प्लॅटफॉर्मवरचे वेगवेगळे शोज, फिल्म्स बघणं पसंत करतायत!

 

ott-logos-inmarathi

 

तुम्हाला माहितीये का, की सर्वप्रथम हा वेब सिरिज नामक प्रकार भारतात कुणी सुरुवात केला? कोणत्या प्लॅटफॉर्मवरुन त्यांनी हा प्रवास सुरू केला? आणि आज एका उत्कृष्ट कंटेंट क्रिएटर म्हणून ते का ओळखले जातात?

या सगळ्या प्रश्नांचं एकमेव उत्तर ते म्हणजे TVF (The Viral Fever)! सध्याच्या घडीला हे नाव माहीत नाही असा तुम्हाला एकही तरुण सापडणार नाही. ज्यावेळेस युट्यूबच्या माध्यमातून बरेच लोकं प्रकाशझोतात येऊ पहात होते तेव्हापासून TVF ने त्यांचं वर्चस्व टिकवून ठेवलं आहे.

आज नेटफ्लिक्स, प्राईम सारख्या दमदार प्लॅटफॉर्मना जे जमत नव्हतं ते TVF ने The Aspirants सारखी सिरिज फुकटात यूट्यूबवर देऊन सिद्ध करून दाखवलं की कंटेंटच्या बाबतीत आजही TVF सगळ्यांपेक्षा वरचढ आहे.

IITians ते कंटेंट क्रिएटर :

तुम्हाला माहितीये का की TVF च्या टीममध्ये काम करणारे बरेचसे कलाकार हे एकेकाळी आयआयटीचे विद्यार्थी होते. आयआयटी खडकपूरमधून पास होऊन बाहेर पडलेल्या अरुणभ कुमार या तरुणाने गडगंज पगाराची नोकरी सोडून कलक्षेत्रात यायचं नक्की केलं.

 

tvf inmarathi

 

आयआयटीच्याच बिस्वापती सरकार आणि अमित गोलानी या दोन मित्रांनी त्यात अरुणभ यांची साथ द्यायची असे ठरवले. वेगवेगळ्या स्तरातून नकार आल्यावर त्यांना काही वेगळ्या शोजची कल्पना डोक्यात आली, त्यापैकीच एक शो म्हणजे MTV Rodies या लोकप्रिय शोचं विडंबन (स्पूफ)!

या कॉन्सेप्टने तरुणांना आकर्षित केलं, दीपक कुमार, नवीन कस्तुरिया असे चेहेर लोकांना ओळखीचे झाले आणि हळू हळू प्रेक्षकांनी TVF (The Viral fever) म्हणून कोणी आयआयटीयन्स काहीतरी वेगळं करू पाहतायत याची दखल घ्यायला सुरुवात केली.

त्यानंतर कोटा पास आऊट समीर सक्सेना, आयआयटी खडकपूरच्या जितेंद्र कुमार यांनीसुद्धा नोकरी सोडून या क्षेत्रात येऊन TVF हे नाव मोठं करायचं ठरवलं आणि तसं झालंदेखील!

हे ही वाचा चिकाटी असावी तर अशी! या अभिनेत्याचा प्रवास तुम्हाला ध्येय पूर्ण करण्याची हिंमत देईल

jeetu and sameer inmarathi

 

वेगवेगळ्या फिल्म्स, तसेच न्यूज शोजचे पॅरडी शोज करून करून TVF हे चॅनल लोकप्रिय झालं आणि यूट्यूबपासून सुरू केलेला प्रवास एक मोठं वळण घेणार होता!

TVF म्हणजे भारतीय वेबसिरिजचे जनक :

आज आपण सगळेच गेम ऑफ थ्रोन्स पासून नारकोज पर्यंत आणि सेक्रेड गेम्स पासून फॅमिलीमॅन पर्यंत सगळ्याच वेबसिरिज आवडीने बघतो किंबहुना सध्या फक्त वेबसिरिजच बघाणारा प्रेक्षक जास्त आहे.

पण यूट्यूबच्या घवघवीत यशानंतर TVF हेच एकमेव चॅनल होतं ज्यांनी सर्वप्रथम वेबसिरिज या प्रकाराशी भारतीयांची ओळख करून दिली. २०१४ मध्ये त्यांनी परमनन्ट रूममेट्स ही वेबसिरिज काढली. यात काम करणाऱ्या सुमित व्यास आणि निधी सिंग यांना कोण ओळखत नाही?

 

permanent roommates inmarathi

 

यानंतर Barely Speak with Arnab सारखे टॉक शोज काढून त्यांनी लोकांना जाम हसवलं आणि शाहरुख खानपासून सनी लियॉनी पर्यंतच्या सगळ्या सेलिब्रिटीजना य टॉकशोवर यायला भाग पाडलं!

यानंतर TVF ने कधीच मागे वळून पाहिलं नाही. Pitchers, Trippling, Flames, Fathers, अशा वेगवेगळ्या सिरिजमधून त्यांनी तरुणांना आकर्षित केलंच शिवाय त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या चॅलेंजेसना या सिरिजच्या माध्यमातून मांडलं!

प्रभावी लेखनशैली आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द यामुळेच एका यूट्यूब चॅनलपासून स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंतचा प्रवास यांनी अवघ्या काही वर्षात पार पाडला.

या ३ वेबसिरिजमुळे आज TVF यशाच्या शिखरावर आहे :

ये मेरी फॅमिलीसारखी नितांतसुंदर सिरिज केल्यानंतर त्यांनी गुल्लक या सिरिजच्या माध्यमातून पुन्हा लोकांच्या काळजाला हात घातला.

त्यानंतर ज्या कोटा शहरातून या तरुणांनी त्यांचं करीयर सुरू केलं त्याच कोटा शहराचा इतिहास एका अप्रतिम कथानकातून मांडायचा प्रयत्न त्यांनी कोटा फॅक्टरी या सिरिजमधून केला, आणि कलाक्षेत्रातल्या कित्येकांनी या कलाकारांची आणि TVF ची दखल घ्यायला सुरुवात केली.

 

kota factory inmarathi

 

याच कोटा फॅक्टरीचा दूसरा सीझन आता नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून यात काम करणाऱ्या जितेंद्र कुमारला याच सिरिजमधून बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळाला! गुल्लकसारख्या सिरीजचा दूसरा सीझनसुद्धा लोकांनी डोक्यावर घेतला!

नुकतीच रिलीज झालेली The Aspirants च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्ट्रगलची कहाणी TVF ने दाखवली!

आयएमडीबीच्या टॉप ५० मध्ये ५ शोज TVF चे आहेत :

IMDB या साईटवर जगभरातल्या वेगवेगळ्या कालाकृतींची नोंद घेतली जाते, आणि जगभरातून कित्येक प्रेक्षक या कलाकृतींचा आढावा घेऊन त्यांना रेटिंग देऊ शकतात.

 

imdb1-inmarathi

 

आज याच साईटच्या टॉप ५० कलाकृतींच्या यादीत TVF च्या एक दोन नाही तर तब्बल ५ शोजचा समावेश आहे, यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हे शोज कीती लोकप्रिय आहेत ते!

हे ही वाचा भारतीय तरुणाईचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या ह्या ५ युट्यूब सिरिज नाही बघितल्या तर काय बघितलं?

सिरिजच्या माध्यमातून शिक्षणाचं महत्व पटवून देणारा प्लॅटफॉर्म :

मनोरंजनाबरोबरच TVF शिक्षणाचं महत्व पटवून देण्यातही कमी पडत नाही. कोटा फॅक्टरी किंवा नुकत्याच आलेल्या The Aspirants सारख्या सिरिज करताना त्यांनी Unacademy या कोचिंग क्लासेससोबत पार्टनरशिप करून विद्यार्थ्यांना एक नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

आयआयटी असो किंवा स्पर्धा परीक्षा, कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यात कसलीच अडचण येऊ नये म्हणून TVF ने उचलेलं हे पाऊल कौतुकास्पदच आहे.

 

unacademy inmarathi

 

उच्च शिक्षण घेऊन आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडून केवळ स्वतःची आवड म्हणून या क्षेत्रात उतरणं आणि कसलंही पाठबळ नसताना एवढं मोठं यश मिळवणं हे वाटतं तितकं सोप्पं नव्हे.

३ इडियट मधल्या आमीर खानने सांगितल्याप्रमाणे या लोकांनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडला खरा, पण कठोर परिश्रम आणि जिद्द यामुळेच ही लोकं आज एका हौशी स्टार्टअपला एवढा मोठा ब्रॅंड बनवण्यात यशस्वी झाले हेदेखील तितकंच खरं आहे!

 

tvf team inmarathi

 

आज TVF ची स्पर्धा नेटफ्लिक्स आणि प्राईम सारख्या बड्या स्पर्धकांशी आहे, तरी कुठेही न डगमगता केवळ दर्जेदार कंटेंट देऊन ते आज कित्येकांच्या गळ्यातला ताईत बनले आहेत, त्यांच्या या स्ट्रगलला हॅट्स ऑफ, आणि TVF हा याहूनही आणखीन मोठा ब्रॅंड व्हावा अशी अपेक्षा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?