बाळासाहेबांचं मंत्रीपद “दादा कोंडकेंनी” एका खास कारणामुळे नाकारलं होतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘दोन तलवारी एकाच म्यानात कधीही एकत्र राहू शकत नाहीत’ हे पठडीतलं वाक्य खोटं ठरवणाऱ्या अनेक यशस्वी जोड्या देशात सापडतात. एकाच क्षेत्रातल्या तरीही कायम एकमेकांची सोबत करणारे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची जोडगोळी असो वा संगीतविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांच्या जोड्या.
मात्र महाराष्ट्रातील एका जोडीचं नाव घेतल्याशिवाय ही यादी पुर्ण होणं निव्वळ अशक्य आहे. एक अशी जोडगोळी जिने महाराष्ट्राला हसवलं, निर्भिड व्हायला शिकवलं.
एकानं राजकीय मैदान गाजवलं तर दुस-याने विनोदाच्या षट्कारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
ही जोडी म्हणजे अर्थातच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अभिनेते दादा कोंडके. मात्र दोन विरुद्ध प्रकृतीच्या, विरुद्ध मताच्या, वेगवेगळ्या क्षेत्रातील बादशहा असणाऱ्या या व्यक्तींचं नातं इतकं घट्ट कसं? या प्रश्नाने उभ्या महाराष्ट्राला कोड्यात टाकलं होतं.
‘सोंगाड्या या चित्रपटाचे प्रक्षेपण कोहिनूर सिनेमात केले जाणार नाही’ याची तक्रार घेऊ बाळासाहेबांकडे दादा गेले आणि या पहिल्यावहिल्या भेटीतून निळख मैत्रीची सुरुवात झाली.
एक निर्भिड, काहीसा रागीट तर दुसरा मात्र मिश्किल, या दोन भिन्न प्रवृत्तींचे अनेक किस्से आजही आठवले जातात. असाच एक धमाल किस्सा या दोघांच्या मनाचा मोठेपणा दाखवून जातो.
–
- जेव्हा पुलंच्या एका पत्राने बाळासाहेबांसकट सर्वांचे धाबे दणाणले होते…
- “शिवसेनेचे हात नसतात, “पाय” असतात” : मराठी मनाची नस पकडलेला अवलिया : बाळासाहेब ठाकरे
–
मंत्रीपदाची ऑफर, दादांचा नकार आणि…
ही गोष्ट तेंव्हाची जेंव्हा राज्यात युतीचं सरकार आलं. नव्या मंत्रीमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी अनेक बड्या नेत्यांची खलबत, प्रयत्न सुरु झाले. बाळासाहेबांकडे अनेकांनी तशी स्पष्ट विचारणाही केली. शिवसेनातर्फे कुणाला स्थान द्यावं यासाठी मातोश्रीवर अहोरात्र बैठका सुरु झाल्या.
राजकारणातले नसूनही दादा कोंडके मात्र बाळासाहेबांच्या प्रत्येक आमंत्रणाला आवर्जून हजेरी लावत. दादांची केवळ उपस्थितीही त्या बैठकांमधील ताण हलका करायची.
अशाच एका मोजक्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा सुरु असताना खुद्द बाळासाहेबांनी दादांना मंत्रीपदाची विचारणा केली, “तुम्हाला कोणतं पद हवं दादा?” या त्यांच्या प्रश्नावर काहींच्या भुवया उंचावल्या तर काहींमध्ये धाकधूक वाढली.
कलाक्षेत्रात मुरलेल्या दादांवर सांस्कृतिक मंत्रीपदाचा भार सोपवावा अशी बाळासाहेबांची इच्छा होती, त्यानुसार त्यांनी दादांकडे मतही मांडले. आता सगळ्यांचं लक्ष दादांच्या उत्तराकडे लागलं होतं.
मात्र क्षणाचाही विलंब न लावता आपल्या ठरलेल्या हजरजबाबाी शैलीत दादांनी बाळासाहेबांना प्रश्न केला, “तुम्ही कोणते मंत्रीपद घेणार आहात?”. त्यांच्या या प्रतिप्रश्नावर बाळासाहेब शांत झाले मात्र लगेचच उत्तरले, “मी कोणतेही पद घेणार नाही. मला शिवसेना प्रमुख म्हणूनच रहायला आवडेल”.
हे ऐकताच पुढच्याच क्षणी दादा म्हणाले, ” मग मलाही शिवसैनिक म्हणूनच रहायला आवडेल “. दादांच्या या उत्तराने उपस्थित नेतेच नव्हे तर बाळासाहेबही थबकले. आपण मंत्रीपद देऊनही दादांनी ते नाकारले, मात्र त्यांनी दिलेले त्यामागील कारण ऐकल्यानंतर बाळासाहेबांच्या चेह-यावर समाधानाचं हसू उमटलं.
एकीकडे मंत्रीपदासाठी झटणा-या अनेक नेत्यांमध्ये दादांचं वेगळेपण, शिवसेनेवरील त्यांची निष्ठा आणि शिवसैनिक म्हणून कायम झटण्याची धडपड यांबाबत बाळासाहेबांनी अनेकदा गौरवोद्गार काढले.
शिवसेनेवर टिका? जमणार नाही!
दादा कोंडक्यांची विनोदी शैली आणि डबल मिनींग अर्थात द्वैअर्थी भाषणं यांनी महाराष्ट्राला हसवलं. आजही युट्युबसारख्या माध्यमातून ही भाषणं पुन्हापुन्हा ऐकली जातात. सच्चा शिवसैनिक असलेल्या दादांचा स्वभाव मुळातच निडर, बेफिकीर, त्यात शिवसेनीची साथ मिळाल्याने भर राजकीय सभेत विरोधी पक्षातील नेत्यांव केली जाणारी टिका ही अनेकदा वादाचा मुद्दा ठरायची.
राजकारणात नसूनही राजकीय सभांमधील त्यांच्या या भाषणाने अनेकांची मनं दुखावली तर काहींनी थेट आरोपही केले. यशवंतराव चव्हाण, शरद पवार अशा दिग्गज नेत्यांनीही दादांच्या कोपरखळ्यांचा धसका घेतला होता.
–
- बाळासाहेब ठाकरे – शरद पवार मैत्रीचे, जनतेसमोर न आलेले महत्वपूर्ण पैलू
- बाळासाहेबांमुळे एका रात्रीत नारायण राणे ‘बेस्ट’चे चेअरमन कसे झाले?
–
एकदा एका कार्यक्रमात एका नेत्याने दादांकडे,” सगळ्या राजकीय पक्षांवर तुमच्या खास शैलीत टिका करा ” अशी मागणी केली. प्रेक्षकांनीही त्यांना दुजोरा दिला. मात्र हजारोंच्या गर्दीतही न डगमगता दादांनी उत्तर दिले, मी कोणत्याही राजकीय पक्षावर टिका करेन, मात्र शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टिका करणे मला जमणार नाही आणि आवडणारही नाही. दादांंच्या याच गुणामुळे बाळासाहेब आणि दादा हे समीकरण अधिकाधिक घट्ट होत गेलं.
बाळासाहेबांनीही दादांच्या या निष्ठेचा मान कायम ठेवला. दादांच्या निर्भिडवृत्तीमुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची भिती असल्याने बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची फोज कायम दादांना सोबत असायची. रात्री दादा घरी सुखरूप पोहोचले की नाही याची खात्री केल्याशिवाय खुद्द बाळासाहेबांना चैन नसे.
तापट बाळासाहेब एकदा चिडले की इतर कुणाचाही धडगत नसायची. त्यांचा राग शांत होईपर्यंत त्यांच्या खोलीत जाण्याची ना कुणाला परवानगी असे ना कुणाची हिंमत. मात्र अशा वेळी ही परवानगी केवळ दादांनाच होती.
बाळासाहेबांच्या खोलीत एकदा दादा शिरल्यानंतर त्यांचा राग शांत झाल्यावरच परतायचे. बाळासाहेबांचा राग शांत करण्याची हातोटी दादांमध्येच होती ही बाब तेंव्हा भल्याभल्यांनीही मान्य केली होती.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.