' जाणून घ्या लग्नाआधी वधू-वराच्या अंगाला हळद लावण्यामागे काय आहे कारण – InMarathi

जाणून घ्या लग्नाआधी वधू-वराच्या अंगाला हळद लावण्यामागे काय आहे कारण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आणि संस्मरणीय टप्पा आहे. आपले लग्न अविस्मरणीय होण्यासाठी प्रत्येक जणं प्रयत्नशील असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न आणि लग्नाच्या सर्व विधींना अनन्यसाधारण महत्व.

आपल्या देशात लग्न उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत लग्न कोणत्याही पद्धतीचे असले तरी त्यात हळद हा समारंभ होतो म्हणजे होतोच. लग्नाचा कार्यक्रम छोटेखानी असला काय आणि मोठा सोहळा असला काय तरी हळद होणारच. मागील काही काळापासून लग्नांना एक ग्लॅमर रूप मिळाल्याने हळदीचा कार्यक्रम हा मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो.

 

halad 8 in marathi

==

हे ही वाचा : तुमच्या घरात असलेला हा एक पदार्थ तुम्हाला सुंदर बनवू शकतो!

==

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की वधू आणि वराला हळद का लावली जाते. आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या या परंपरे मागे नक्की काय कारण असावे? आज आम्ही तुम्हाला या लेखातून या हळद समारंभाच्या मागचे कारण सांगणार आहोत.

हळद ही आपल्या हिंदू संस्कृतीत खूप महत्वाची मानली जाते. हळद ही पिवळ्या रंगाची असते. पिवळा रंग हा मैत्री, त्याग आणि समृद्धीचे प्रतिक मानला जातो. हळद लावण्यामागे उपवर वधू वराला त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि संसारासाठी हळद लावून त्यांचा संसार समृद्ध होण्याचा आशीर्वाद दिला जातो.

 

halad in marathi

 

विविध गुणांनी संपन्न असलेल्या हळदीचे दान हिंदू शास्त्रात खूप मोठे मानले गेले आहे म्हणून मुलाला लावण्यासाठीची हळद मुलीकडून येते आणि मुलीला लावण्यासाठीची हळद मुलाकडून येते.

 

halad 7 in marathi

 

भारतात काही ठिकाणी हळदीचा वापर हा दृष्ट काढण्यासाठी सुद्धा केला जातो. लग्नाच्या आधी हळदीने नवरा आणि नवरीची दृष्ट काढली जाते. यामागचे मुख्य कारण म्हणजे हळद लावल्याने नव्याने आयुष्य सुरु करणाऱ्या वधू- वराचे वाईट नजरेपासून रक्षण होते.

 

halad 5 in marathi

 

आपल्याकडे पिवळ्या रंगाला शुभ समजले जाते, शिवाय लग्नात वधूवरांची सौभाग्य गाठ बांधली जाते. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. हळदीला सर्वच धार्मिक विधीत एक महत्त्वाचे स्थान आहे. हळद पवित्र मानली जात असल्यामुळे लग्नात वधूवरांना हळद लावली जाते.

 

halad 3 in marathi

==

हे ही वाचा : जाणून घ्या ‘गोल्डन मिल्क’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या दुधाचे ७ फायदे!

==

हळदीच्या वापरामुळे स्त्रियांचा मासिक धर्म सुरळीत होऊन त्यांची गर्भधारणतेची क्षमता वाढते. हळद ही प्रजननशक्तीचे दर्शक समजले जाते. हळद लावून मुलीस सासरी पाठ्वण्यामागे त्या घरात लवकर निरोगी संतती येऊन भरभराट व्हावी असा देखील विचार असतो.

 

halad 4 in marathi

 

हळद लावल्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते आणि रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे वधू वराची त्वचा एकदम फ्रेश दिसते. सोबतच त्वचेला पुरेसा रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे तुम्ही रिलॅक्स होता. लग्नाचा ताण कमी करण्यास देखील हळद महत्वाची ठरते.

 

halad 6 in marathi

 

हळद लावल्यामुळे वधू वराची त्वचा अधिक उजळ दिसते. हळदीमध्ये असे अनेक अॅंटीसेप्टिक गुणधर्म असतात ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि निर्जंतूक होते. त्यामुळे लग्नाच्या दिवशी तुम्ही अधिक सुंदर दिसतात.

 

halad 9 in marathi

==

हे ही वाचा :  जखम झाल्यास नुसती हळद न लावता करा हा उपाय… भारतीय शास्त्रज्ञाचा भन्नाट शोध!

==

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?