' सगळ्यांच्याच मोस्ट फेवरेट फालुद्याचं इराणी आणि मोघलाई कनेक्शन जाणून घ्या! – InMarathi

सगळ्यांच्याच मोस्ट फेवरेट फालुद्याचं इराणी आणि मोघलाई कनेक्शन जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण कुठेही हॉटेलमध्ये जेवायला गेलो की जेवण झाल्यानंतर एक मोठा गहन प्रश्न उभा राहतो तो म्हणजे डेझर्टमध्ये काय मागवायचं? मग आपण लगेच मेनूकार्ड बघून त्यातलं शेवटचं पान काढतो आणि त्यातला मेनू बघून आणखीनच चक्रावून जातो.

आपल्याला मागवायचं सगळंच असतं पण नेमकं काय ते ठरत नसतं. जेवणानंतर डेझर्ट नाकारणारी लोकं काही निराळीच. याच डेजर्टमध्ये आईसक्रीम, कोल्डड्रिंक, कुल्फी, मिल्कशेक, फ्रूट ज्यूस, कोल्ड कॉफी, सीझलिंग ब्राऊनी असे तरतऱ्हेचे पदार्थ आपल्यासमोर असतात.

याच यादीतलं आणखीन एक डेझर्ट म्हणजे फालुदा! बऱ्याच जणांचा फार गोंधळ हा होतो की फालुदा हा नेमका खायचा की प्यायचा? त्यात हे एवढे सगळे प्रकार घालून खरंच तो तितका भारी लागतो का? हा फालुदा नेमका कुठून आला याची मुळं कुठेत?

 

falooda inmarathi

 

या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या लेखात तुम्हाला नक्की मिळतील.

 फालुदाची पाळंमुळं कुठे आहेत?

सध्या सगळ्याच हॉटेल्सच्या मेनूकार्ड मध्ये मानाचं स्थान पटकावणाऱ्या फालुदाचं मूळ हे पर्शियामध्ये आहे. पर्शियामध्ये ‘फालूदे” म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ नंतर पाकिस्तान, बांग्लादेश, असा प्रवास करत भारतात आला.

हे ही वाचा पुणे तिथे काय उणे : या सुप्रसिद्ध झणझणीत मिसळींचा आस्वाद प्रत्येकाने घ्यायलाच हवा!

जेव्हा मुघलांचं साम्राज्य होतं तेव्हाच फालुदाची भारतात एंट्री झाली. अकबर बादशाहचा मुलगा जहांगीर याला फालुदा खूप आवडायचा, शिवाय त्या काळात केवळ शाही घरण्यातच फालुदा मिळायचा. सामान्य लोकांना त्या काळात फालुदा काय ते महितही नसावे!

 

jahangir inmarathi

 

नंतर कालांतराने या पदार्थाला भारतीय cuisine मध्ये मान्यता मिळाली, आणि मग कधी शेवया घालून, आईसक्रीम घालून, वेगवेगळे फ्लेवर्स घालून, फ्रूट ज्यूस घालून फालुदा हा भारतीय पद्धतीत मुरला आणि लोकांची पसंतीस उतरला.

फालुदा हे नेमकं खाद्य आहे की पेय?

फालुदा हा डेझर्टचा प्रकार आहे आणि तो खाल्लाही जातो आणि प्यायलाही जातो. याचं कारण असं की फालुदामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचे एसेन्स, ज्यूस, मिल्कशेक असतो पण त्या बरोबरच आपल्याला एक चमचासुद्धा दिलेला असतो.

त्या फालुदामध्ये घातलेल्या शेवया, काजू बदाम सारखे ड्राय फ्रुट्स, टुटी फ्रूटी, सब्जा हे सगळं खाल्लं जातं आणि या बरोबरीनेच लोकं त्या मिल्कशेकचा आस्वाद घेतात त्यामुळे फालुदा हे तुम्ही खाद्य म्हणूनही खाऊ शकता किंवा पेय म्हणून पिऊ शकता!

 

falooda shev inmarathi

फालुदा कुठे ट्राय करावा?

तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा  आणि फ्लेवर्सचा फालुदा खायचा असेल तर मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही भेट द्यायलाच हवी. मुंबईच्या रखरखत्या उन्हात फिरल्यानंतर क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या बादशाह कोल्ड ड्रिंक्स या प्रसिद्ध दुकानात तुम्हाला ११ वेगवेगळ्या प्रकारचे फालुदा खायला मिळतात.

 

badshah cold drinks inmarathi

 

शिवाय दिल्लीच्या रोशन दी कुल्फी इथेसुद्धा तुम्हाला फालुदाचे अनोखे प्रकार खायला मिळतात. पान फालुदा कुल्फी, शुगर फ्री फालुदा कुल्फी असे अतरंगी प्रकार तुम्हाला इथेच खायला मिळतात.

तसं तर फालुदा हा तुम्ही कुठेही खा, त्याच्या मूळ प्रक्रियेत फारसा फरक नसतो, फक्त त्यात तुम्ही आणखीन कोणते वेगळे पदार्थ घालताय त्यामुळे तो खास फालुदा होतो!

फालुदा घरी कसा कराल?

फालुदा खायला तुम्हाला बाहेर जायला पाहिजे अशी काही अट नाही, आणि सध्या तर सगळं इतकं फास्ट झालं आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट घरी बनवून तिचा आस्वाद घेऊ शकता.

घरात फालुदाच्या शेवया, आईसक्रीम, दूध, सबजा आणि ड्राय फ्रुट्स हे असतातच. दुधात योग्य प्रमाणात साखर घालून ते दूध थंड करत ठेवायचे. ते थंड झाल्यावर त्यात रोज सीरप किंवा आणखीन कुठलंही तत्सम फ्लेवरचं सिरप घालावं.

 

falooda 2 inmarathi

 

नंतर त्यात वेगवेगळ्या शेवया, ड्राय फ्रुट्स, सबजा घालून एकत्र करायचं आणि गरज असल्यास एक स्कूप vanilla आईसक्रीम किंवा थोडीफार जेली घालावी.

बस एवढं साहित्य जरी घरात असेल तर मुघलांच्या या शाही फालुदाचा आस्वाद तुम्ही कधीही घेऊ शकता! या फालुदाची ही भन्नाट कहाणी वाचून तुम्हालासुद्धा आता फालुदा खायची इच्छा झाली असेल नाही का?

===

हे ही वाचा “आज काय स्पेशल?”- “हे” वाचलंत तर रोज पडणाऱ्या या प्रश्नाचं ‘झटपट’ आणि ‘पौष्टिक’ उत्तर मिळेल

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?